Author: अनंत पांगारकर

विकसित भारत संकल्पनेला बळ पंतप्रधानांनी कोट्यावधी देशवासियांचा विश्वास ठरविला सार्थ ‘नवरत्न’ अर्थसंकल्पात युवा भारताचे प्रतिबिंब मंगळवार, २३ जुलै कररचनेत मोठे बदल करून सर्वसामान्यांना दिलासा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यवधी देशवासियांचा विश्वास सार्थ ठरविला. केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प शेतकरी, महिला, युवा, कौशल्य विकास, रोजगार, पायाभूत सुविधांची उभारणी, शहरांचा विकास अशा विविध नऊ घटकांवर लक्ष केंद्रीत करणारा नवरत्न अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करतानाच युवकांच्या कल्याणासाठी भरीव तरतूद, रोजगाराला चालना देणारा आणि ‘विकसित भारत’ संकल्पनेला बळ देणारा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. शेतकऱ्यांना बळ… केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग सातव्यांदा आज केंद्रीय अर्थसंकल्प मांडला…

Read More

मंगळवार, २३ जुलै  काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून संगमनेर तालुक्यातील ८४ हजार ९३० शेतकऱ्यांना तब्बल १२८ कोटी ९८ लाख रुपयांचा पिक विमा मंजूर झाला असल्याची माहिती सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी दिली आहे. थोरात म्हणाले, आमदार बाळासाहेब थोरात कृषिमंत्री असताना महाराष्ट्रातून सर्वाधिक कृषी उत्पन्न झाले. याचबरोबर त्या काळात सातत्याने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या गेल्या. महसूल मंत्री आणि कृषिमंत्री म्हणून आमदार थोरात हे संपूर्ण राज्यात लोकप्रिय राहिले राज्याचा व्याप सांभाळत असताना त्यांनी संगमनेर तालुक्यात सातत्याने विकासाच्या योजना राबवल्या असून या विकासातून संगमनेर तालुका मॉडेल ठरला आहे. याचबरोबर उत्तर अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरणारे निळवंडे…

Read More

मंगळवार, २३ जुलै पोलीस प्रशासना विरोधात विशेषत: वादग्रस्त ठरलेल्या एलसीबी विरोधात खासदार निलेश लंके यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा मंगळवारी दुसरा दिवस होता. दरम्यान आंदोलन करू नको म्हणून पाच कोटी रुपये आणि महिन्याला पॅकेज देतो अशी ऑफर आपल्याला देण्यात आल्याचा गौप्यस्फोट करत आपण मॅनेज होणाऱ्यांपैकी नसल्याचे खासदार निलेश लंके यांनी स्पष्ट केले आहे. लंके यांनी पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर सुरू केलेल्या आंदोलनामुळे अहमदनगर एलसीबी आणि जिल्हा पोलीस प्रशासनाची पुरती नाचक्की झाली असून सामान्य माणसाच्या मनातून पोलीस दलाची प्रतिमा खालावली आहे. लंके यांच्या आंदोलनात नागरिकांच्या तक्रारीचा आणि त्यांना आलेल्या पोलीस दलाच्या वाईट अनुभवाचा अक्षरश: पाऊसच पडला आहे. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक…

Read More

मंगळवार, २३ जुलै महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून रविवारी रात्री तरुणाची हत्या करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघाजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान सोमवारी आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी मोठा जमाव कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात जमला होता. मिळालेल्या माहितीनुसार कोपरगाव शहरात महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून सोहेल हरून पटेल (वय २८ वर्षे, रा. आयशा कॉलनी, कोपरगाव) या तरुणाचे अपहरण करून त्याला मारहाण करत हत्या केल्याचा आरोप सोहेल पटेलच्या कुटुंबियांनी केला आहे. या संदर्भात मयत सोहेलचा भाऊ शाहरुख खान पटेल याने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर…

Read More

मंगळवार, २३ जुलै लाडकी बहीण योजनेच्या प्रचार व प्रसारासाठी सोमवारी पारनेरमध्ये (अहमदनगर) आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांना पिंक रंगाची ई-रिक्षा देण्याची घोषणा केली. राज्यातील प्रमुख १७ शहरात पहिल्या टप्प्यात ही योजना राबविली जाणार असून त्यानंतर जिल्हा नियोजन विकास मंडळाद्वारे टप्प्याटप्प्याने राज्यात सर्वत्र योजना राबविण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान लाडकी बहीण योजनेत एकत्रित कुटुंबातील जावेचाही समावेश करण्याबाबत भविष्यात विचार करण्याचे सुतोवाचही त्यांनी केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंदाच्या राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या योजनेत दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत. योजनेच्या प्रचार व प्रसाराची सुरुवात त्यांनी सोमवारी पारनेरमधून केली. यावेळी कृषी मंत्री…

Read More

मंगळवार, २३ जुलै  विशेष प्रतिनिधी / मुंबई भारतीय जनता पक्षाचे सरकार हे अदानीसाठी काम करत असून महाराष्ट्रातील एकएक करून सर्व प्रकल्प अदानींच्याच घशात घालण्याचा सपाटा सुरु आहे. मुंबईतील महत्वाच्या जमिनी अदानीला कवडीमोल भावाने देण्याचे निर्णय होत असताना आता ऊर्जा प्रकल्पही अदानीलाच देण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्या निर्देशाने १६०० मेगावॅटचा औष्णिक व ५००० मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प अदानी समुहाला देण्यासाठी पायघड्या घातल्या जात आहेत. ६० हजार कोटी रुपयांचे हे दोन ऊर्जा प्रकल्पासाठी एकच टेंडर काढून अदानीला बहाल करण्याचा महायुती सरकारचा डाव आहे, असा गंभीर आरोप प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेश शर्मा यांनी केला आहे. यासंदर्भात अधिक…

Read More

सोमवार २२ जुलै  गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या मार्गदर्शक, तत्वज्ञ, पाठीराख्यांचा विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. गुरुचरणी आपली श्रद्धा लीन करून पुढील आयुष्य सुखकारक व्हावे ह्या आशिर्वादासह शिष्य गुरुचरणी प्रार्थना करतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुंची म्हणजे अध्यात्मिक अधिष्ठान असलेल्या व्यक्तिमत्त्वाचे पूजन बऱ्याचदा केले जाते. आई-वडील यांच्यानंतर आपण आयुष्याचे गुरु मानत असलेले गुरुचरण हे अकलापूर येथील स्वयंभू श्री. दत्तमहाराज व त्यांच्यानंतर राजकीय गुरु म्हणून आमदार सत्यजीत तांबे यांची मोलाची भूमिका असल्याचा विचार संगमनेर तालुका विद्यार्थी कांग्रेसचे अध्यक्ष गौरव डोंगरे हे मानतात. आमदार सत्यजीत तांबे हे विधानपरिषदेवर निवडून यावेत यासाठी गौरव डोंगरे यांनी मतदानावेळी अकलापूर येथील जागृत दत्त देवस्थानाला अभिषेक करुन नवस केला होता.…

Read More

सोमवार, २२ जुलै सर्व काही लाडक्या खुर्चीसाठी सुरू आहे… बघा हा व्हिडिओ…

Read More

सोमवार, २२ जुलै मराठा आरक्षणाच्या सगेसोयऱ्याच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असून उपोषण स्थळी वैद्यकीय पथकाकडून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे तसेच सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी जरांगे यांनी पाचव्यांदा उपोषण सुरू केले आहे. सोमवारी त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस होता. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास ओबीसी नेते विरोध करत आहे. लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर जरांगे यांनी आपल्या मागणीसाठी पुन्हा उपोषण सुरू केले आहे.

Read More

सोमवार, २२ जुलै  नगर जिल्ह्याच्या उत्तर भागाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणारे भंडारदरा धरण रविवारी निम्मे भरले. मुसळधार नसला तरी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. धरण परिसर सततच्या पावसाने चिंब भिजला आहे. सुट्टी असल्यामुळे भंडारदरा घाटघर परिसरात पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. गेल्या काही दिवसांपासून कळसुबाई, रतनगड, हरिचंद्रगडाच्या डोंगररांगेत पाऊस सुरू आहे. विशेष जोर नसला तरी पाऊस सातत्य टिकवून आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात नियमितपणे वाढ सुरू आहे. ११ हजार ३९ दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणाचा पाणीसाठा सायंकाळी ५ हजार ५०८ दलघफू झाला होता. धरण ४९.९० टक्के भरले होते. निळवंडे धरण २१ टक्के भरले असून, या धरणाचा पाणीसाठा आज सकाळी २०.६९ टक्के…

Read More