Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आता अजितदादांचा नवा वादा… महिलांना मिळणार पिंक ई-रिक्षा, लाडकी बहीण योजनेत जावेचाही समावेश करणार
राजकारण

आता अजितदादांचा नवा वादा… महिलांना मिळणार पिंक ई-रिक्षा, लाडकी बहीण योजनेत जावेचाही समावेश करणार

महिलांनी विधानसभेत महायुतीचे बटन दाबले तरच या योजना सुरू राहतील
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/07/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार, २३ जुलै

लाडकी बहीण योजनेच्या प्रचार व प्रसारासाठी सोमवारी पारनेरमध्ये (अहमदनगर) आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांना पिंक रंगाची ई-रिक्षा देण्याची घोषणा केली. राज्यातील प्रमुख १७ शहरात पहिल्या टप्प्यात ही योजना राबविली जाणार असून त्यानंतर जिल्हा नियोजन विकास मंडळाद्वारे टप्प्याटप्प्याने राज्यात सर्वत्र योजना राबविण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान लाडकी बहीण योजनेत एकत्रित कुटुंबातील जावेचाही समावेश करण्याबाबत भविष्यात विचार करण्याचे सुतोवाचही त्यांनी केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंदाच्या राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या योजनेत दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत. योजनेच्या प्रचार व प्रसाराची सुरुवात त्यांनी सोमवारी पारनेरमधून केली. यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे उपस्थित होते. यावेळी महिलांनी विचारलेल्या प्रश्नांना अजितदादांनी उत्तरे दिली.

अजितदादाचा वादा…

अजितदादाचा वादा आहे, महिलांसाठीच्या योजना बंद होऊ देणार नाही. महिलांसाठी पिंक गुलाबी रंगाची ई-रिक्षा दिली जाणार असून तिला पेट्रोल डिझेलचा खर्च लागणार नाही. आपल्या घरातील थ्री पिन प्लगवर ही रिक्षा चार्ज होईल. साडेतीन लाख रुपये किमतीच्या या रिक्षासाठी एक लाख पाच हजाराचे डाऊन पेमेंट करावे लागेल. यातील दहा टक्के रक्कम म्हणजेच ३५ हजार रुपये संबंधित महिलेला भरावे लागतील राहिलेले ७० हजार रुपये राज्य शासन भरेल. उर्वरित अडीच लाखाच्या कर्जाला शासन हमी देईल. ६,२५० रुपयांचा मासिक हप्ता संबंधित महिलेला भरावा लागणार असून प्रवासी सेवेतून हे उत्पन्न तिला मिळेल. सुरुवातीला मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव अशा मोठ्या १७ शहरातून ही योजना राबविली जाईल. त्यानंतर जिल्हा नियोजन मंडळाच्या पुढाकारातून तालुकानिहाय लोकसंख्या व प्रवासी संख्या पाहून ही योजना राबविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महायुतीचे बटन दाबले तरच योजना सुरू…

यावेळी अजित पवारांनी महायुती सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. लेक लाडकी योजनेत मुलीला अठरा वर्षानंतर एक लाख एक हजार, उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना शिष्यवृत्ती, मुला मुलींना एक वर्षाच्या नोकरीनंतर अनुभव प्रमाणपत्र, 15 लाख महिलांना लखपती दीदी केले. गॅस सिलेंडरचे अन्नपूर्णा योजना, लाडकी बहीण योजनेत दरमहा दीड हजार रुपये, महिला बचत गटांना तीस हजाराचे अनुदान अशा योजनांची त्यांनी माहिती दिली. महिलांनी विधानसभेत महायुतीचे बटन दाबले तरच या योजना सुरू राहतील असेही स्पष्ट करत त्याचा विचार आवर्जून करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 665
अजित पवार पारनेर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

By Annant Ppangarkar11/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या…

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.