Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
सामाजिक

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

या सर्व सोहळ्याला माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/09/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन –

काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अमृत सांस्कृतिक मंडळाच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सव काळामध्ये कारखाना कार्यस्थळावर १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विविध दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. 

या महोत्सवात प्रसिद्ध कलाकारांची नाटके, मनोरंजक स्पर्धा आणि संगीतमय कार्यक्रमांची रेलचेल असणार असल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील घुले, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर व कार्याध्यक्ष रामदास तांबडे यांनी दिली.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या प्रेरणेतून अमृत सांस्कृतिक मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सवात या उपक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी सोमवार, १४ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या महोत्सवांतर्गत बुधवारी, १६ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजता संतोष पवार, विनय येडेकर, आनंदा कारेकर यांसारख्या नामवंत कलाकारांच्या उपस्थितीत ‘ए भाऊ डोकं नको खाऊ’ हे विनोदी नाटक रंगणार आहे.

गुरुवारी, १७ सप्टेंबर रोजी दुपारी रांगोळी व मेहंदी स्पर्धा पार पडेल. त्यानंतर शनिवारी, १९ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजता प्रसिद्ध अभिनेते संजय नार्वेकर व विजय पटवर्धन यांच्या अभिनयाने सजलेले ‘भ्रमाचा भोपळा’ हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

महोत्सवाच्या दुसऱ्या आठवड्यात सोमवार, २१ सप्टेंबर रोजी सत्यनारायण महापूजा व अमृतेश्वर भजनी मंडळाचे भजन आयोजित करण्यात आले आहे. मंगळवारी, २२ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजता ‘रंगतरंग’ हा ऑर्केस्ट्रा रंगेल, तर बुधवारी, २३ सप्टेंबर रोजी दुपारी संगीत खुर्ची व चमचा-लिंबू या खेळांच्या स्पर्धा रंगतील. गुरुवारी, २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता महिलांसाठी विशेष ‘राहणे प्रस्तुत खेळ पैठणीचा… हा लय भारी संगमनेरी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शेवटी शुक्रवारी, २५ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता श्रींच्या भव्य मिरवणुकीने आणि विसर्जनाने या उत्सवाची सांगता होईल.

या सर्व सोहळ्याला माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या गणेशोत्सवातील विविध कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी अमृतनगर, घुलेवाडी, मालदाड, वेल्हाळे, गुंजाळवाडी, सुकेवाडी आणि संगमनेर परिसरातील सर्व नागरिक, महिला व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अमृत सांस्कृतिक मंडळ व कारखाना प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 166
गणेशोत्सव थोरात कारखाना
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

By Annant Ppangarkar11/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या…

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.