Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हेगारी

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक नागरिकांकडे चौकशी केली असता ही जनावरे कुरण येथील रहिवासी जमील उर्फ जमालुद्दीन शेख, अशपाक राजू शेख, तनवीर मुन्ना पठाण, आदिल शेख आणि सलमान शेख यांच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/09/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन –

अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या १४ लहान-मोठ्या गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे. या कारवाईत सुमारे १ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पाच फरार आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव, पोलीस अंमलदार विजय पवार, रिचर्ड गायकवाड, राहुल डोके, भगवान थोरात, सुनील मालणकर आणि महादेव भांड यांच्या पथकाने संगमनेर शहरात तपासाची चक्रे फिरवली.

तपासादरम्यान, कुरण येथील रहिवासी जमील शेख याने आपल्या पत्र्याच्या शेडमध्ये आणि मोकळ्या जागेत गोवंशीय जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसमक्ष तात्काळ घटनास्थळी छापा टाकला. तेथे १४ लहान-मोठी गोवंशीय जनावरे अत्यंत निर्दयीपणे बांधून ठेवल्याचे आढळून आले.

स्थानिक नागरिकांकडे चौकशी केली असता ही जनावरे कुरण येथील रहिवासी जमील उर्फ जमालुद्दीन शेख, अशपाक राजू शेख, तनवीर मुन्ना पठाण, आदिल शेख आणि सलमान शेख यांच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस पथकाने सर्व फरार आरोपींचा शोध घेतला, मात्र ते मिळून आले नाहीत.

याप्रकरणी सर्व आरोपींविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम आणि प्राण्यांना निर्दयतेने वागवल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व जनावरे ताब्यात घेण्यात आली असून, या कारवाईमुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुढील तपास संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 119
अहिल्यानगर एलसीबी कत्तलखाना कारवाई गुन्हेगारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026

कोपरगाव आणि संगमनेरमधील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस; दोन सराईत चोरट्यांकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, अहिल्यानगर एलसीबीची कामगिरी

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संगमनेर शहर पोलीस…

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.