सोमवार, २२ जुलै
मराठा आरक्षणाच्या सगेसोयऱ्याच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असून उपोषण स्थळी वैद्यकीय पथकाकडून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे तसेच सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी जरांगे यांनी पाचव्यांदा उपोषण सुरू केले आहे. सोमवारी त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस होता.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास ओबीसी नेते विरोध करत आहे. लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर जरांगे यांनी आपल्या मागणीसाठी पुन्हा उपोषण सुरू केले आहे.


