Author: अनंत पांगारकर
अहमदनगर – शिर्डी अहमदनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या निर्देशांनुसार अहमदनगर – शिर्डी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये मतदानाचे प्रमाण वाढण्यासाठी स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या संकल्पनेतून मोबाईलला डीपी, स्टेटस व रिंगटोन लावण्याच्या “डीपी बोले तो… डेमोक्रेसी पार्टिसिपेशन” या उपक्रमाचे विमोचन जिल्हा आढावा बैठकीत जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या हस्ते करण्यात आले. यांची उपस्थिती… यावेळी अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील आदी उपस्थित होते. असा आहे उपक्रम… मोबाईलचा वापर सध्या मोठ्या प्रमाणावर केला जातो. डीपी ठेवणे, स्टेटस बदलणे व विविध रिंगटोन लावणे या सामान्य माणसाच्या…
शुक्रवार, दि. १० मे महिलेला जबरदस्तीने दारू पाजून तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करणाऱ्या सुरेश लहानू नाईक आणि विशाल कृष्णा म्हात्रे या दोघांना जिल्हा न्यायालयाने प्रत्येकी १० वर्ष कैद आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अलिबाग तालुक्यातील तळाशेत गावच्या हद्दीत वडवली रस्त्यावर नेटको कंपनीच्या टेकडीवर रविवारी १९ डिसेंबर २०२० रोजी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. पीडित महिला तिच्या मुलीकडे तळाशेत वाडीवर गेली असता ती एकटी असल्याचा फायदा घेत सुरेश लहानू नाईक आणि विशाल कृष्णा म्हात्रे यांनी तिला पाठीमागून पकडून झाडाझुडपात खेचत नेले. तेथे तिला जबरदस्तीने दारू पाजून दोघांनी तिचे कपडे काढून तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला होता.…
शुक्रवार, दि. १० मे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्याप्रकरणी पुण्याच्या विशेष कोर्टाने पाच आरोपींपैकी दोघांना दोषी ठरवत सश्रम जन्मठेपेची शिक्षा दिली. तर उर्वरित तिघांची निर्दोष मुक्तता केली आहे. तब्बल ११ वर्षानंतर त्या प्रकरणाचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांनी डॉ. दाभोळकरांची हत्या केल्याचे सिद्ध झाल्याने त्यांना दोषी ठरवत सश्रम जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तर डॉ. वीरेंद्र तावडे, ॲड. संजीव पुनाळेकर आणि त्यांचा सहाय्यक विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता केली. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्याप्रकरणी पाच आरोपीविरोधात पुण्याच्या सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू…
गुरुवार, दि. ९ मे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या महिला उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या वाहनावर अकोले तालुक्यात दगडफेक करत हल्ल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता संगमनेर तालुक्यातील पठार भागात त्यांचे प्रचाराचे बॅनर अज्ञाताने फाडल्याचे समोर आले आहे. शिर्डीत लोकसभा निवडणुकीमध्ये सदाशिव लोखंडे व भाऊसाहेब वाकचौरे या आजी-माजी खासदारांसह उत्कर्षा रुपवते निवडणूक लढवत असून सुरुवातीला सरळ आणि दुरंगी वाटणारी निवडणूक रुपवतेंमुळे तिरंगी बनली आहे. त्यामुळे लाटेवर आपलाच विजय निश्चित असं मानणाऱ्या आजी-माजी खासदारांना धडकी भरली असल्याचे दिसते. रूपवते यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नानंतर मतदार संघात त्यांच्या सहानुभूतीत वाढ झाली आहे. असे असतानाच तगडे आव्हान निर्माण करणाऱ्या रूपवते यांचे निवडणूक बॅनर फाडले जात…
गुरुवार, दि. ९ मे रस्त्याने जाणाऱ्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीस शाळेत सोडतो असे सांगून तिचे अपहरण करत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळच्या गोंधेवाडी येथील रवींद्र वसंत गोंधे (वय २७ वर्ष) याला संगमनेरचे जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी २० वर्ष सक्तमजुरी आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. घारगाव परिसरातील या खटल्याकडे पठार भागातील संगमनेरकरांचे लक्ष लागले होते. १२ डिसेंबर २०१८ रोजी पीडित मुलगी कच्च्या रस्त्याने शाळेत जात असताना तेथे मोटरसायकलवर आलेल्या रवींद्र गोंधे याने असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेत तिला माझ्यासोबत घारगावला चल, तुला शाळेत सोडतो. असे सांगून आपल्या मोटरसायकलवर बसवून घारगावच्या दिशेने नेले. मात्र शाळेकडे…
गुरुवार, दिनांक ९ मे अहमदनगरमध्ये पुन्हा एकदा वकिलावर प्राणघातक हल्ल्याचा प्रकार समोर आला आहे. बुधवारी दुपारी साडेचार वाजता जुन्या कोर्टाजवळ लोणी हवेली (ता. पारनेर) येथील वकील अशोक कोल्हे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. पोलिसांनी तातडीने तपास यंत्रणा राबवत गुन्हा दाखल करण्यापूर्वीच हल्लेखोरास पकडण्यात यश मिळविले असल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिली आहे. अधिक माहिती अशी, ॲड. मयूर अशोक कोल्हे हे आपल्या वकील असलेल्या वडिलांसह न्यायालयीन कामकाजानिमित्त लोणी हवेली (ता. पारनेर) येथून अहमदनगरला आले होते. ॲड. अशोक कोल्हे अहमदनगरमधील जुन्या न्यायालयाजवळ असताना दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास काही एक कारण नसताना त्यांचा पक्षकार अनिल गायकवाड यांने…
बुधवार, दि. ८ मे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या पाठोपाठ गुरुवारी कोपरगावमध्ये वंचितचे नेते सुजात आंबेडकर यांची सभा होत आहे. शिर्डीतून आपलाच विजय निश्चित या विजयाच्या हवेत असलेल्या आजी-माजी खासदारांना वंचितच्या उमेदवाराने चांगलेच जेरीस आणल्याचे दिसत आहे. दोन्ही आजी-माजी खासदारांच्या तुलनेत रूपवते मतदारांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरत असून शिर्डीतील पहिल्या महिला उमेदवार म्हणून मतदार दोघात तिसरा असा विचार करताना दिसत आहे. विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांची मदार राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आहे. मतदार संघात निवडणुकीदरम्यान मिस्टर इंडिया म्हणून परिचित झालेले लोखंडे निवडणुकीनंतर परत दिसतील की नाही याची साशंकता आहे.…
बुधवार, दि. ८ मे नवऱ्याचे बाहेरच्या महिलांशी अनैतिक संबंध असल्याने नवरा-बायकोतील वादाची परिणती बायकोने गळफास घेऊन आत्महत्या करण्यात झाली. मोनिका मधुकर ओव्हाळ (वय ३८ वर्ष) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. मृत महिलेचा भाऊ प्रशांत चाबुकस्वार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मधुकर लक्ष्मण ओव्हाळ (वय ४५ वर्ष रा. येरवडा, पुणे) यांच्या विरोधात पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा येरवडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराची बहीण मोनिका आणि मधुकर ओव्हाळ यांच्या लग्नानंतर देखील मधुकर ओव्हाळ याचे बाहेरच्या महिलांशी अनैतिक संबंध होते. यावरून नवरा-बायकोत सातत्याने वाद होत तसेच नवरा मधुकर हा सतत त्रास देत असल्याने या त्रासाला कंटाळून मोनिका राहत्या घरात गळफास घेऊन…
बुधवार, दि. ८ मे पती-पत्नीच्या वादाचा अंत अखेर पत्नीने दोन्ही मुलींचा गळफास देत खून करत स्वतः इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्यात झाला. पत्नीने स्वतः चिमुकलीचा आत्महत्या पूर्व व्हिडिओ नातलगांना पाठवत आत्महत्या केल्याची ही दुर्दैवी घटना नाशिकमध्ये घडली आहे. अश्विनी स्वप्निल निकुंभ (वय ३०), आराध्या स्वप्निल निकुंभ (वय ८) आणि अगस्त्या स्वप्निल निकुंभ (वय २) अशी मृत मायलेकींची नावे आहेत. बुधवारी सकाळी सात वाजता आडगाव मधील जत्रा हॉटेल जवळील इच्छामणी नगरमध्ये असलेल्या हरीवंदन सोसायटीत ही दुर्दैवी घटना घडली. मृत अश्विनी हिने आत्महत्येपूर्वी पती स्वप्निल निकुंभ देत असलेल्या त्रासाच्या माहितीचा आराध्या आणि स्वत:चा व्हिडीओ नातलगांना पाठविला. तसेच पती स्वप्निल आणि…
बुधवार, दि. ८ मे ७ जुलै २०२४ रोजी विधान परिषदेच्या चार सदस्यांचा कार्यकाल संपत आहे. शिक्षक मतदार संघातील दोन आणि पदवीधर मतदारसंघातून दोन जागांचा यात समावेश आहे. निवडणूक आयोगाकडून या चार जागांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून त्यासाठी १० जूनला मतदान होणार आहे. मंगळवारी राज्यातील तिसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडले. त्या पाठोपाठ निवडणूक आयोगाने विधान परिषद निवडणुकीची ही मोठी घोषणा केली आहे. विधान परिषदेतील मुंबई पदवीधर विधान परिषद मतदार संघाचे आमदार विलास विनायक पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघाचे निरंजन वसंत डावखरे, नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे किशोर भिकाजी दराडे आणि मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघातील कपिल हरिश्चंद्र पाटील यांचा कार्यकाल संपणाऱ्यामध्ये समावेश आहे.…
