Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पतसंस्थेला दिलेला धनादेश न वटल्याने संगमनेरच्या न्यायालयाने जामीनदार असलेल्या श्याम मयूर या आरोपीस दिली कारावासाची शिक्षा
न्यायालय

पतसंस्थेला दिलेला धनादेश न वटल्याने संगमनेरच्या न्यायालयाने जामीनदार असलेल्या श्याम मयूर या आरोपीस दिली कारावासाची शिक्षा

आई आणि पत्नीच्या नावावर घेतले होते कर्ज
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/07/2024Updated:12/07/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार, ०८ जुलै

आई आणि पत्नीच्या कर्ज थकबाकीपोटी पतसंस्थेला दिलेला धनादेश न वटता परत आल्याने दाखल असलेल्या खटल्यात श्याम दिगंबर मयूर (रा. मयूर ज्वेलर्स, संगमनेर) या आरोपीला संगमनेरच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी गुरुवारी एक वर्ष साध्या कारावासाची आणि १० लाख ६० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची शिक्षा ठोठावली.

अधिक माहिती अशी, आरोपी श्याम दिगंबर मयूर यांची आई वत्सलाबाई दिगंबर मयूर आणि पत्नी संगीता शाम मयूर यांनी संगमनेर शहरातील गृहलक्ष्मी महिला सहकारी पतसंस्थेकडून प्रत्येकी एक वर्षाच्या कालावधीसाठी २ लाख ७५ हजार रुपये कर्ज घेतले होते. या कर्जासाठी आरोपी शाम मयूर हा जामीनदार होता.

कर्जदार कर्जाची रक्कम भरण्यात अपयशी ठरल्याने ते संस्थेत थकबाकीदार झाले. त्यामुळे वारंवार मागणी केल्यानंतर आरोपीने आई आणि पत्नीच्या कर्जाचे कायदेशीर दायित्व पूर्ण करण्यासाठी त्याच्या खात्याचा एचडीएफसी बँकेचा पाच लाख तीस हजार रुपयांचा धनादेश पतसंस्थेला दिला होता. मात्र खात्यात पुरेसा निधी नसल्याच्या कारणावरून हा धनादेश न वटता परत आला. त्यामुळे तक्रारदार पतसंस्थेने आरोपीकडे पैशाची मागणी केली. यासाठी वकिलामार्फत नोटीस देखील पाठविली मात्र आरोपीने रक्कम भरली नाही.

त्यामुळे श्याम दिगंबर मयूर याच्या विरोधात संगमनेरच्या न्यायालयात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटच्या कलम १३८ अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली होती. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जी. बी. देशमुख यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान आरोपीने तो दोषी नसल्याचे सांगत फिर्यादी पतसंस्थेच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या नावाचा धनादेश संगमनेरच्या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातून पत्नीकडून दबावाने नेला असल्याचा बचाव न्यायालयात केला. मात्र न्यायालयाने हा बचाव फेटाळून लावला.

सुनावणी दरम्यान फिर्यादी पतसंस्थेचे वकील ॲड. व्ही. बी. वाकचौरे आणि आरोपीचे वकील यांनी न्यायालयात विविध खटल्यांचा संदर्भ दिला. तक्रारदार पतसंस्थेच्या व्यवस्थापक सुनिता सुरेश आरोटे यांची देखील साक्ष या खटल्यात नोंदविण्यात आली. दोन्ही पक्षाच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपी श्याम दिगंबर मयूर याला दोषी ठरविले.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

गुरुवारी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी देशमुख यांनी या खटल्याचा निकाल दिला. त्यांनी आरोपी मयूर याला फिर्यादी पतसंस्थेला दहा लाख साठ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. तसेच एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. नुकसान भरपाई न दिल्यास आरोपीला आणखी तीन महिने कारावास भोगावा लागणार आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 12,019
कारावास न्यायालय
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- कमी पावसामुळे संकटात सापडलेली खरीप पिके आणि आगामी गणेशोत्सवाची…

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.