Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » एलसीबीच्या वादग्रस्त पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांवर नगर पोलिस अधीक्षकांची मर्जी, खासदारांच्या आक्षेपानंतरही पोलीस अधीक्षक बदली झालेल्यांना सोडेनात!
पत्रकारिता

एलसीबीच्या वादग्रस्त पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांवर नगर पोलिस अधीक्षकांची मर्जी, खासदारांच्या आक्षेपानंतरही पोलीस अधीक्षक बदली झालेल्यांना सोडेनात!

नेमणूक नसतानाही काहीजण पथकात
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/07/2024Updated:09/07/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार, ०९ जुलै | संगमनेर

महाराष्ट्र पोलीस दलातील डीवायएसपी, एसीपी बढती घोटाळ्याची चर्चा असतानाच आता नगर जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि त्यांना बदल्याच्या ठिकाणी नियुक्त न करणे, बदल्याच्या ठिकाणी न सोडणे याबाबतच्या घोटाळ्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहे. नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी आदेश देवूनही अद्यापही बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी सोडण्यात आले नाही. तसेच दोन गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची बदली व नेमणूक नसतानादेखील त्याला पोलीस अधीक्षकांचे खास मर्जी असल्याने नगर एलसीबीच्या विशेष पथकात वर्षभरापासून ठेवले असल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे या कर्मचाऱ्याची तक्रार खासदार निलेश लंके यांनी देखील केलेली आहे.

नगर जिल्ह्यातील पोलीस पथकांच्या विविध कारवाया आणि त्यामागे होणाऱ्या संशयास्पद हालचाली हा नेहमीचा चर्चेचा आणि गुंतागुंतीचा विषय ठरलेला आहे. स्थानिक गुन्हे शाखा एलसीबीच्या पथकाचे विविध संशयास्पद कारणामे जिल्ह्यातील वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाले आहेत. पोलीस दलामध्ये विविध पथके असून देखील जिल्ह्यातील गुन्हेगारी मात्र वाढती आहे. फक्त कागदावरच कारवाया केल्याचे दाखवले जात आहे. अवैध धंद्यांसाठी कुप्रसिद्ध असलेला नगर जिल्हा आता संपूर्ण महाराष्ट्रात नंबर वन असल्याचे आढळून येत आहे. गावठी कट्टे आणि गोळीबार यात तर जिल्हा आघाडीवर आहे.

स्थानिक गुन्हे शाखेतील (नगर एलसीबीच्या) अनेक कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊन देखील त्यांना बदलीच्या ठिकाणी सोडण्यात आलेले नाही. यावर येथील सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी तक्रार केली होती. त्या तक्रारीनुसार विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांनी सात दिवसाच्या आत सदर कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी पाठविण्यात यावे असे आदेश दिले होते. आदेश देऊन चार महिने होऊन गेले तरीही पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी त्याबाबत कुठलीही कार्यवाही केलेली नाही. या कर्मचाऱ्यांची मात्र जिल्ह्यात एलसीबीच्या माध्यमातून धुळवड चालू असल्याचे आरोप होत आहेत.

याच पथकांमध्ये पोलीस नाईक पदावर एक कर्मचारी असून या कर्मचाऱ्यावर दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याच्याविरुद्ध अनेक तक्रारी असून देखील आणि त्याची नगरमध्ये बदली झालेली नसताना देखील पोलीस अधीक्षकांनी खास त्याला एलसीबीच्या पथकात विना बदलीचे आणून ठेवलेले आहे. हा कर्मचारी वेगवेगळ्या प्रकारच्या वसुली उद्योगात आघाडीवर असल्याचे बोलले जात असून थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये देखील हस्तक्षेप करून सेटलमेंट करण्यात मध्यस्थाची भूमिका बजावत असल्याने या कर्मचाऱ्यावर पोलीस अधीक्षकांची खास मर्जी असल्याचे देखील सांगण्यात येते.

एलसीबी मधील सुमारे २५ ते ३० कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या असून त्यांना अद्यापपर्यंत बदलीच्या ठिकाणी सोडलेले नाही. या बदल्या होऊन एक वर्षापेक्षा अधिक कालावधी झालेला आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर यांना सोडण्यात येईल असे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सांगितले होते. निवडणुका होऊन खासदारांचा शपथविधी देखील झाला आहे.  त्यातीलच नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी देखील एलसीबीचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. तरीही पोलीस अधीक्षक या कर्मचाऱ्यांना  पाठीशी घालीत असल्याचे चित्र आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4
anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,216
एलसीबी नगर पोलीस राकेश ओला
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्हाधिकारी साहेब एकदा रस्त्यावर पायी फिराच! संगमनेरातील अतिक्रमण हटाव मोहीम दिखावा की केवळ समाधान?

05/08/2026

संगमनेरमध्ये रेशनच्या धान्याचा काळा बाजार? पोलीस अन् पुरवठा विभागाच्या संशयास्पद भूमिकेने संभ्रम!

05/08/2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

19/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- विजयादशमीच्या मंगलपर्वानिमित्त संगमनेरमधील अकोले रोडवरील मालपाणी इंडस्ट्रियल पार्कमध्ये मंगळवारी, (२० ऑक्टोंबर)…

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.