Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील बेफिकीर आणि ढिसाळ कारभाराचा प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी रुग्णालय प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. प्रशासनाने यात सुधारणा न केल्यास शिवसेनेच्या वतीने घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयासमोर तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून हा प्रकार तात्काळ थांबवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. विनोद सूर्यवंशी हे आपल्या लहान बाळाला अँटी रेबीज लसीकरणासाठी रुग्णालयात घेऊन गेले असता, तेथे आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बालरोग विभागातील तज्ज्ञ डॉक्टर न्यायालयीन कामकाजाचे कारण सांगून गैरहजर होते, यामुळे अनेक पालक आपल्या आजारी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मोहसीन शेख | संगमनेर अतिक्रमण निर्मूलनाच्या नावाखाली प्रशासनाने हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या टपऱ्या, हातगाड्या आणि लहान दुकाने क्षणाचाही विलंब न लावता जमीनदोस्त केली. वर्षानुवर्षे कष्टाने उभा केलेला आपला उदरनिर्वाहाचा मार्ग डोळ्यांसमोर उद्ध्वस्त होताना पाहून अनेक गरीब व्यावसायिक भावनिक झाले होते. या कारवाईदरम्यान संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संगमनेर नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात नुकतीच अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. मात्र, ही मोहीम अत्यंत पक्षपाती आणि निवडक पद्धतीने राबवली गेल्याची भावना संगमनेरकरांमध्ये निर्माण झाली असून प्रशासनाविरोधात तीव्र संताप…

Read More

प्रवीण पुरो अनेक वर्षांच्या ब्रिटिश गुलामगिरीतून बाहेर पडलेला भारत आपल्या स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा करत असताना, या देशाच्या मॅगसेसे पुरस्कार विजेत्या बुजुर्ग शास्त्रज्ञाला लोकशाहीच्या बचावार्थ आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागतो ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट होय. दिल्लीतील मध्यवर्ती सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या असंख्य घटना या देशात घडूनही यंत्रणा मख्ख बनल्या आहेत. मुसोलिनीच्या सत्तेला जाब विचारणे त्याला अव्यवहारी वाटत होते. सत्तेविरोधात आंदोलन केले की ते दडपून टाकण्याची पद्धत होती; तीच पद्धत आता मध्यवर्ती सरकारने अवलंबलेली दिसते. मुसोलिनीप्रमाणेच मोदींनाही प्रश्न नकोसे झाले आहेत. दिल्लीत होणारी सरकारविरोधातील आंदोलने चिरडून टाकण्यासाठी साम, दाम, दंड, भेद या नीतीचा उघड वापर करून कुठल्याही परिस्थितीत आंदोलकांना दाद द्यायची नाही,…

Read More

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येणारा ठरेल. तुमच्या गुणांमुळे आणि प्रतिभेने तुम्ही लोकांना प्रभावित करू शकाल, ज्यामुळे समाजात तुमचे वर्तुळ वाढेल आणि महत्त्वाचे संबंध प्रस्थापित होतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या नवीन कल्पनांचे आणि कार्यशैलीचे कौतुक होईल. आर्थिक दृष्ट्या विचार केल्यास, जर तुम्ही हुशारीने निर्णय घेतले तर तुम्हाला अतिरिक्त धनलाभ होऊ शकतो. नोकरी आणि व्यवसायामध्ये यश मिळण्याची उत्तम चिन्हे आहेत, मात्र भागीदारीच्या कामात किंवा सहकाऱ्यांशी बोलताना ताणतणाव वाढणार नाही याची दक्षता घ्यावी. मानसिक पातळीवर आज काहीशी चिंतेची किंवा तणावाची भावना राहू शकते, त्यामुळे आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि कुटुंबातील सदस्य तुमच्यावर खुश…

Read More

संगमनेर: तालुक्यात जून महिना कोरडा गेल्यावर जुलैच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्यांना वेग आला असून, गेल्या दहा ते बारा दिवसांत सुमारे ७५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील २५,०२४.८ हेक्टर क्षेत्रापैकी आतापर्यंत एकूण २५ हजार ४.८ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक कल सोयाबीन आणि मका लागवडीकडे असून, बाजरीच्या क्षेत्रात मात्र घट झाली आहे. निळवंडे कालव्याच्या पाण्याचा लाभ मिळाल्याने काही भागात ऊस लागवडही वाढत आहे, तर बदलत्या वातावरणामुळे शेतकरी कमी कालावधीत येणाऱ्या भाजीपाला पिकांकडे वळत आहेत. सध्या तालुक्यात सोयाबीन ८,९४७.१ हेक्टर, मका ९,३४६ हेक्टर, बाजरी ३,६२५.९ हेक्टर, कापूस १,५९१ हेक्टर, भुईमूग…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत संगमनेर तालुका आणि शहर काँग्रेस कमिटीच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. पक्षाने नव्या आणि जुन्या फळीचा मेळ घालत आगामी काळासाठी आपली नवी टीम मैदानात उतरवली आहे. या नव्या नियुक्त्यांनुसार, संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी अजय नारायण फटांगरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर, शहराध्यक्ष म्हणून सोमेश्वर सूर्यभान दिवटे यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. याचसोबत पक्षाचा लढाऊ चेहरा म्हणून ओळखले जाणारे अमोल भारत शेलकर यांची संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ…

Read More

नवी दिल्ली: देशातील विविध परीक्षांमधील अनियमिततेच्या विरोधात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत दिल्लीतील जंतरमंतर येथे बेमुदत उपोषणाला बसलेले प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना शनिवारी पहाटे दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या उपोषणाचा आज २१वा दिवस होता. जंतरमंतरवर प्रचंड गोंधळ आणि लाठीचार्जचे आरोप – पहाटेच्या वेळी जंतरमंतर मैदानाभोवती मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस जेव्हा वांगचुक यांना रुग्णालयात नेण्यासाठी आले, तेव्हा आंदोलक आणि पोलिसांमध्ये तीव्र वाद व शाब्दिक चकमक झाली. ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियाद्वारे असा आरोप केला आहे की, आंदोलनस्थळी उपस्थित विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि…

Read More

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत आनंद आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला असेल. वैवाहिक जीवनात परस्पर विश्वास वाढल्याने नाते अधिक घट्ट होईल. आर्थिक प्रगतीसाठी तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील आणि जुने कर्ज फेडण्याच्या दृष्टीने महत्त्वाची पावले उचलली जातील. परंतु, इतरांच्या खाजगी गोष्टींमध्ये विनाकारण हस्तक्षेप करणे टाळलेले बरे राहील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणि वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. वृषभ – कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला अपेक्षित प्रगती पाहायला मिळेल. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मनाला मोठा आनंद मिळेल आणि दिवस प्रसन्न राहील. घेतलेली कामे तुम्ही अत्यंत जबाबदारीने आणि कौशल्याने पूर्ण कराल, ज्यामुळे वरिष्ठ आनंदी राहतील. आर्थिक आवक चांगली असली तरी वाढत्या खर्चावर थोडे…

Read More

प्रवीण पुरो | मुंबई: राज्यात डिजिटल शिक्षण, स्मार्ट क्लासरूम आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मोठ्या घोषणा केल्या जात असल्या, तरी महाराष्ट्रातील हजारो शाळा आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे विदारक चित्र केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या ‘यू डायस २०२५-२६’ च्या अहवालातून समोर आले आहे. राज्यातील एकूण १ लाख ८ हजार १३९ शाळा, २ कोटी १६ लाखांहून अधिक विद्यार्थी आणि साडेसात लाख शिक्षकांच्या या अथांग शैक्षणिक परिघात अनेक गंभीर त्रुटी उघड झाल्या आहेत. सरासरी एका शाळेत २०० विद्यार्थी आणि सात शिक्षक कार्यरत असतानाही, ग्रामीण व दुर्गम भागातील शिक्षण व्यवस्था पुरती कोलमडल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. डिजिटल शिक्षणाचा पाया असलेल्या वीज आणि इंटरनेटची राज्यात प्रचंड दुरवस्था…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अकोले: अकोले तालुक्यातील कोतुळ गावात संगमनेरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने मोठी कारवाई करत ६ लाख ११ हजार २३० रुपयांचा बेकायदेशीर गुटखा, सुगंधित तंबाखू आणि एक कार जप्त केली आहे. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. डॉ. कुणाल सोनवणे यांना कोतुळ गावातील रहिवासी शोएब शावीद काझी याने आपल्या घराजवळ एका स्विफ्ट कारमध्ये गुटखा आणि सुगंधित तंबाखू विक्रीसाठी साठा करून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी उपविभागीय कार्यालयाच्या पथकाला तातडीने कारवाईचे आदेश दिले. पोलीस पथकाने पंचांसमक्ष…

Read More