Author: अनंत पांगारकर
आजचे राशिभविष्य मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीकारक आणि धनलाभ घडवून आणणारा ठरेल. गजकेसरी योगामुळे कामाच्या ठिकाणी मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील, मात्र कोणाशीही बोलताना कठोर शब्दांचा वापर करणे टाळावे. वृषभ- आज तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि जुनी अडकलेली कामे मार्गी लागतील. नवीन हितसंबंध जोडले जातील, ज्यामुळे मनाला आनंद मिळेल. नवीन गुंतवणूक किंवा मोठा निर्णय घेताना घाई गडबड करू नका, अनुभवी लोकांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. मिथुन- आज मनात कोणताही संभ्रम न ठेवता कामावर लक्ष केंद्रित केल्यास यश निश्चित मिळेल. कौटुंबिक जीवनात सुख-शांती नांदेल आणि घरातील जुन्या समस्या दूर होतील. तब्येतीची थोडी काळजी घ्या आणि…
पुणे: सासवड-जेजुरी रस्त्यावरील बेलसर टोलनाक्याजवळ टोलनाक्याजवळ दिंडीच्या ट्रकने धडक दिल्यामुळे सांगली जिल्ह्यातील तीन महिला वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून चार जणी गंभीर जखमी झाल्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा जेजुरी येथे मुक्कामी आल्यानंतर हा अपघात घडला. नांदेड जिल्ह्यातील एका दिंडीच्या ट्रकने रस्त्याच्या कडेला असलेल्या वारकरी महिलांना धडक दिली. या अपघातात सांगली जिल्ह्यातील नंदा पवार, माधवी सलगरे आणि राजश्री भोसले या तीन महिलांचा मृत्यू झाला, तर अन्य जखमींवर जेजुरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करत अपघात करणाऱ्या ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी तातडीने…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. चालू खरीप हंगामात सरासरी उत्पादन उंबरठा उत्पादनापेक्षा कमी झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. हवामान खात्याचा अंदाज पाहता शेतकऱ्यांनी ३१ जुलै २०२६ पूर्वी या योजनेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी आयुक्तालयाचे संचालक विनयकुमार आवटे यांनी केले आहे. या योजनेअंतर्गत खरीप हंगामातील भात, ज्वारी, बाजरी, नागली, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, तीळ, कारळे, सोयाबीन, कापूस आणि खरीप कांदा अशा एकूण १४ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. सर्वसाधारण पिकांसाठी विमा संरक्षित रकमेच्या दोन टक्के…
आजचे राशिभविष्य मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि उर्जावान राहील. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी वेळ उत्तम असून केलेल्या मेहनतीला चांगले यश मिळेल. दुपारनंतर आर्थिक अडचणी दूर होतील, मात्र महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती झाल्यास घाईगडबड न करता तो निर्णय पुढे ढकलणे योग्य ठरेल. नोकरी बदलू इच्छिणाऱ्या लोकांसाठी आजचा काळ शुभकारक ठरेल. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील आणि कुटुंबासोबत उत्तम भोजनाचा आनंद घेता येईल. वृषभ- तुमच्यासाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आणि फलदायी असणार आहे. कामाच्या ठिकाणी नवीन आणि मोठ्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात, ज्यामुळे तुमचा प्रभाव वाढेल. व्यवसायाच्या निमित्ताने नवीन प्रवासाचे योग जुळून येत आहेत. आज तुम्ही तुमच्या गोड…
नाशिक: जयहिंद लोकचळवळीच्या कृषी विभागातर्फे आयोजित ‘राज्यस्तरीय युवा शेतकरी सन्मान सोहळा २०२६’ उत्साहात पार पडला. नाशिक येथे झालेल्या या सोहळ्यात राज्यभरातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या युवा शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. हरितक्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे यंदा दहावे वर्ष होते. लोकनेते बाळासाहेब थोरात आणि जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमदार सत्यजीत तांबे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येतो. कार्यक्रमाला राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे, सह्याद्री फार्म्सचे संस्थापक विलास अण्णा शिंदे, आमदार मनोज कायंदे, जयहिंद महिला मंचच्या अध्यक्ष…
अमोल शेलकर अयोध्या राम मंदिराची उभारणी हा कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचा आणि अस्मितेचा विषय आहे. देश-विदेशातून सामान्य नागरिकांनी आपल्या कष्टाची कमाई या मंदिरासाठी दान केली. परंतु, गेल्या काही दिवसांत समोर आलेले मीडिया रिपोर्ट्स, मंदिराचे माजी कर्मचारी आणि स्थानिक साधू-संतांचे दावे पाहिले तर या श्रद्धेला भ्रष्टाचाराचे ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाचा आढावा घेतल्यास दोन मुख्य प्रकारच्या गंभीर गडबडी समोर येतात, ज्यामध्ये पहिली पैशांच्या व दागिन्यांच्या चोरीची आणि दुसरी जमीन खरेदीतील कोट्यवधींच्या घोटाळ्याची आहे. राम मंदिरामध्ये भक्तांची प्रचंड गर्दी असते आणि तिथे एकूण ३५ दानपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. या पेट्या भरल्यानंतर त्यातील दान सुरक्षित लोखंडी पेट्यांमध्ये साठवले जाते आणि तिथून अवघ्या…
पुण्याच्या द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ला पहिल्याच पावसाने दिलेल्या तडाख्याने राज्य सरकारची चांगलीच फजिती झाली. या घटनेवर झालेल्या टिकेने ‘महाराष्ट्राची बदनामी झाली’ अशी ओरड करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सत्तेत बसलेल्यांच्या अंदाजाचा पुरता फजितवाडा झाला. कॅनडापासून अमेरिकेपर्यंतच्या पायाभूत सुविधांमध्ये (इन्फ्रास्ट्रक्चर) प्रगती गाठणाऱ्या पाश्चात्य देशांची मदत घेऊनही व्हायचं तेच झालं. प्रचंड मोठी आश्वासनं दिल्यावरही ती खोटी ठरावीत ही तर लाजीरवाणी गोष्ट आहे. अतिपावसाने मिसिंग लिंकला लागलेली गळती आणि त्याच्या कमानीला बसलेले हादरे ही प्रशासनाच्या एकूणच कारभाराच्या चिंधड्या उडवणारी घटना आहे. आता टीका झाल्यावर नमतं घेण्याऐवजी सत्ताधारी ज्या प्रकारची भाषा वापरत आहेत, ती पाहता यांना झाल्या प्रकारचा ना खेद आहे ना चिंता. राज्य…
आजचे राशिभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. मानसिक दृष्ट्या तुम्ही अतिशय सक्षम असाल आणि रखडलेली कामे मार्गी लावण्यावर तुमचा भर राहील. कार्यक्षेत्रात तुमच्या कल्पकतेला वाव मिळेल आणि वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची बाजू उत्तम असली तरी खाण्यापिण्याच्या सवयींवर थोडे नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. आर्थिक गुंतवणूक करताना घाईगडबड करू नका. वृषभ – आज तुम्हाला आर्थिक बाबतीत अत्यंत सावध राहावे लागेल. नको असलेल्या खर्चांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, अन्यथा बजेट बिघडू शकते. व्यावसायिक पातळीवर कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी लोकांचा सल्ला नक्की घ्या. कुटुंबातील सदस्यांशी संवाद…
संगमनेर: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर येथील यशोधन जनसंपर्क कार्यालयामार्फत मागील चार ते पाच वर्षांपासून असंघटित, बांधकाम व घरेलू कामगारांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने काम केले जात आहे. या सेवा कक्षामधून आतापर्यंत तब्बल १८ हजार कामगारांची यशस्वी नोंदणी करण्यात आली असून, मागील अवघ्या एका वर्षात शिष्यवृत्ती योजनेंतर्गत तब्बल २ कोटी २० लाख रुपयांचा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाला असल्याची माहिती असंघटित कामगार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय कोल्हे यांनी दिली आहे. यशोधन जनसंपर्क कार्यालयातून अधिकृत नोंदणी झाल्यामुळेच तालुक्यातील या गोरगरीब कामगारांना भांडे व विविध घरगुती साहित्याचा लाभ मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. लोकनेते…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन श्रीरामपूर: शहरातील नेवासा रोडवरील हॉटेल लक्ष्मीनारायण येथे हॉटेलच्या बिलाच्या किरकोळ वादावरून एका तरुण हॉटेल चालकाची कोयत्याने वार करून भरदिवसा निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना शनिवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्राणघातक हल्ल्यात हॉटेलचे तरुण चालक-मालक आकाश शेखर दुबय्या (वेंकटरामन) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा चुलत भाऊ कुणाल कैलास दुबय्या हा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सुरेश सतीश जाधव (रा. खिलारी वस्ती) याला ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नेवासा रोडवरील हॉटेल लक्ष्मी नारायण येथे काहीजण जेवणासाठी आले होते. जेवण झाल्यानंतर बिलाच्या रकमेवरून त्यांची हॉटेल कर्मचाऱ्यांशी हुज्जत सुरू…
