Author: अनंत पांगारकर
पंतप्रधानपदाचा सर्वाधिक काळ कारभार केल्याच्या कारणास्तव नरेंद्र मोदी यांचा सुरू असलेला उत्सव कमालीचा चर्चेचा बनला आहे. एखाद्या व्यक्तीने अधिक काळ कार्यभार सांभाळला म्हणून त्याचे कौतुक करायला कोणाची ना नाही. यासाठी त्याच्या नावावर कामेही जमा असावीत. निमित्तमात्र आणि हौसमौज म्हणून असले कार्यक्रम होतच असतात, तसे या उत्सवाचे व्हायला नको. दुर्दैवाने त्यामागे असलेला कुटील डाव पाहिला की, या उत्सवाचा उबग आल्याशिवाय राहत नाही. मोदींनी अधिक काळ पंतप्रधानपद सांभाळले असे दाखवताना ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याहून किती महान होते, हे पुढे आणण्याचा पद्धतशीर आटापिटा सुरू आहे. कोणाचा कार्यकाळ किती, याहून त्याचा कार्यकाळ ‘कसा’ होता, याची मोजदाद करायची असते. पण आजकाल त्याचा विचार करण्याचा…
आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी कमालीचा ऊर्जावान राहील. नवीन कामांची सुरुवात करण्यासाठी वेळ अतिशय अनुकूल आहे. कार्यक्षेत्रात तुमच्या कामगिरीचे कौतुक होईल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. आर्थिक बाजू मजबूत राहील, परंतु विनाकारण खर्च करणे टाळावे. आरोग्याची काळजी घ्या आणि आहारावर नियंत्रण ठेवा. वृषभ: आज तुम्हाला संमिश्र फळे मिळतील. दिवसाच्या सुरुवातीला काही मानसिक तणाव जाणवू शकतो, परंतु दुपारनंतर परिस्थिती सुधारेल. संयम आणि शांतता राखणे आज हितकारक ठरेल. व्यापार्यांना आज मोठा आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाबावी लागेल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद राहील. जोडीदाराची उत्तम साथ लाभल्याने मन प्रसन्न राहील. मिथुन: आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा आणि नवनवीन…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: सरकार दारूबंदी करणार नाही आणि लोक सहजासहजी दारू सोडणार नाहीत, त्यामुळे महिलांनीच पुढाकार घेऊन घरातील व्यसनाला आळा घातला पाहिजे, देश जर महासत्ता करायचा असेल, तर आधी गाव आणि शेतकरी समृद्ध करणे गरजेचे असून आपले गाव हेच आपले खरे तीर्थक्षेत्र मानले पाहिजे, असे प्रतिपादन पाटोदा गावचे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले. संगमनेर येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहातील शनिवारच्या व्याख्यानात ते बोलत होते. आपल्या व्याख्यानात पेरे पाटील यांनी अन्नभेसळ, प्लास्टिक प्रदूषण, बालविवाह, भ्रष्टाचार आणि ग्रामविकास यांसारख्या गंभीर विषयांवर अत्यंत रोखठोक भाषेत विचार मांडले. सध्या बाहेरच्या अन्नामध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असून धने, जिरे, हळद, तिखट,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन श्रीरामपूर: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या श्रीरामपूर येथील भरारी पथक क्रमांक २ ने एका कारवाईत बनावट परदेशी दारू तयार करणाऱ्या व्यक्तीला रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी घटनास्थळावरून पोपट भास्कर पवार याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ च्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे. श्रीरामपूर येथील आशीर्वाद नगर भागात एका व्यक्तीकडून नामांकित ब्रँडची बनावट दारू तयार केली जात असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने तातडीने सदर ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात ‘इम्पेरियल ब्लू’ आणि ‘रॉयल स्टॅग’ या नामांकित ब्रँड्सच्या व्हिस्कीच्या बनावट असलेल्या एकूण ११७ बाटल्या, एक दुचाकी वाहन आणि इतर साहित्य असा एकूण…
आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. नवीन कामाला सुरुवात करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. व्यवसायात धनलाभाचे योग दिसत आहेत, परंतु घाईघाईने कोणतेही आर्थिक निर्णय घेऊ नका. कुटुंबातील सदस्यांसोबत सुसंवाद साधल्यास मनाला शांतता लाभेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. आरोग्याकडे थोडे लक्ष देणे गरजेचे आहे, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयी सुधारा. वृषभ: आज आर्थिक नियोजनावर भर देणे फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या अंगावर येऊ शकतात, ज्यामुळे तुमचा मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलताना संयम बाळगणे आवश्यक आहे. मित्रांकडून महत्त्वाची मदत मिळू शकते. जुन्या वादांवर पडदा पडेल आणि कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. संध्याकाळच्या वेळी थोडा थकवा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई | विशेष प्रतिनिधी: राज्यातील गुटखा, तंबाखू आणि निकोटीनयुक्त पानमसाल्याच्या अवैध छुप्या साम्राज्याला मुळासकट उखडून टाकण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने आतापर्यंतचे सर्वात मोठे आणि आक्रमक पाऊल उचलले आहे. राज्यातील गुटखा माफियांचे नेटवर्क पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी आता थेट ‘मकोका’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कारवाई करण्याचे धाडसी आदेश एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले आहेत. तुकाराम मुंढे यांच्या २१ वर्षांच्या धडाकेबाज प्रशासकीय कारकिर्दीतील हा सर्वात मोठा आणि ऐतिहासिक निर्णय मानला जात असून, या एकाच निर्णयाने राज्यातील गुटखा माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. आतापर्यंत गुटख्यावरील कारवायांमध्ये केवळ लहान-मोठे पानटपरी चालक किंवा किरकोळ विक्रेतेच पोलिसांच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर – सध्याच्या विवाह पद्धतीमध्ये मुहूर्ताकडे होणारे दुर्लक्ष, अनावश्यक खर्च, दिखाऊपणा आणि यामुळे वधूपित्याला सहन करावा लागणारा मानसिक त्रास यावर रामायणाचार्य ढोक महाराज यांनी अत्यंत परखड शब्दांत टीका केली आहे. विवाह सोहळ्यांमध्ये शिस्त राखण्यासाठी गावागावांत युवकांचे ‘दांडके मंडळ’ स्थापन करण्याची महत्त्वपूर्ण सूचना त्यांनी केली. गुंजाळ मळा येथे आयोजित प. पू. गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहातील रामकथेच्या आठव्या पर्वात ते बोलत होते. या सोहळ्यात ढोक महाराज यांनी आपल्या ओजस्वी, अभ्यासपूर्ण आणि भावस्पर्शी निरूपणातून रामकथेचे विविध पैलू उलगडले. त्यांच्या वाणीतील सात्त्विकता आणि कथनशैलीमुळे संपूर्ण धर्ममंडप भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. गगनगिरी महाराजांच्या कृपाशीर्वादाने उभे राहिलेले हे रामकथा सत्संगाचे…
संगमनेर: देशात सध्या सुरू असलेली लढाई ही केवळ सत्तेची नसून विचारधारेची आहे, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आणि काँग्रेसची विचारधारा पूर्णपणे एकच असून राज्यघटना, संतांचे विचार, बहुजन समाज आणि पुरोगामी विचारसरणी हा आपल्या सर्वांचा सामायिक पाया आहे, आम्ही फक्त दोन वेगवेगळ्या ठिकाणी आहोत इतकाच काय तो फरक आहे, शरद पवार हे प्रतिगामी विचारधारा कधीही स्वीकारू शकत नाहीत, असा विश्वास राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. संगमनेर तालुका दूध संघाच्या कार्यक्रमावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काँग्रेसमधील संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना थोरात यांनी ही महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. थोरात यांच्या या राजकीय विधानामुळे राजकारणात नवे संकेत जुळण्याची चिन्हे दिसू लागली आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई | विशेष प्रतिनिधी: राज्यात बहुचर्चित असलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’वरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षाताई रूपवते यांनी महायुती सरकारच्या आर्थिक नियोजनावर आणि या योजनेच्या निधी वाटपावर तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी शासनाने समाज कल्याण विभागाचा कोट्यवधी रुपयांचा निधी वळवल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला असून सरकारच्या या कारभाराचा जाहीर निषेध केला आहे. उत्कर्षाताई रूपवते यांनी सरकारवर टीका करताना म्हटले आहे की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी समाज कल्याण विभागाचे तब्बल ३४४.७४ कोटी रुपये एका शासन निर्णयाच्या (जीआर) माध्यमातून लुबाडण्यात आले आहेत. ही केवळ निधीची…
आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. आर्थिक बाबतीत नशिबाची साथ लाभल्याने जुनी रखडलेली कामे मार्गी लागतील. आरोग्याची बाजू उत्तम राहील, मात्र खाण्यापिण्याच्या सवयींवर थोडे नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. जोडीदारासोबत वैचारिक सुसंवाद साधल्याने मन प्रसन्न राहील. वृषभ: आज तुम्हाला मानसिक शांतता आणि समाधान लाभेल. व्यवसायात नवीन योजनांवर काम करण्यासाठी अनुकूल काळ आहे. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळेल आणि मन हलके होईल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. आर्थिक व्यवहारात घाईगडबड करणे टाळावे, अन्यथा नुकसान…
