Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेत ‘एक विद्यार्थी, एक बेंच’ उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद; आठवडाभरात ६८ हजारांच्या लोकसहभागातून ४० बेंचचे लोकार्पण

08/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमिषाला बळी पडलेलेच शिवसेना सोडून गेले; त्यांची चिंता नको, संघटन वाढवा : संपर्कप्रमुख शिंदेंचा शिवसैनिकांना सल्ला
राजकारण

आमिषाला बळी पडलेलेच शिवसेना सोडून गेले; त्यांची चिंता नको, संघटन वाढवा : संपर्कप्रमुख शिंदेंचा शिवसैनिकांना सल्ला

निवडीनंतर प्रथमतः संगमनेरात
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/08/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – केवळ सत्तेची लालसा आणि आमिषाला बळी पडून काही लोक मूळ शिवसेना सोडून गेले आहे. ग्रामीण भागातील शिवसैनिकांचे नाव शिवसेनेसोबत जोडलेली आहे. त्यामुळे पक्षाबाहेर जाणाऱ्यांची चिंता करू नका. पक्षाचे संघटन वाढवा, असा सल्ला शिवसेनेचे संगमनेर विधानसभा संपर्कप्रमुख सूर्यकांत शिंदे यांनी शिवसैनिकांना दिला.

संवाद : शिवसेनेच्या संगमनेर विधानसभा मतदार संघाच्या संपर्कप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर शिंदे शनिवारी संगमनेरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांच्याशी संवाद साधला.

यांची होती उपस्थिती : गोंदिया जिल्हा संपर्कप्रमुख नरेश माळवे, उत्तर नगर जिल्हा शिवसेनाप्रमुख मुजीब शेख, तालुकाप्रमुख संजय फड, ज्येष्ठ मार्गदर्शक रावसाहेब गुंजाळ, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, युवा सेनेचे शहर प्रमुख गोविंद नागरे, दिव्यांग सेनेचे जिल्हाप्रमुख जालिंदर लहामगे, संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजय सातपुते, ग्राहक पक्षाचे उपजिल्हा संघटक प्रवीण कुलट, माजी नगरसेवक सुनील दिवेकर, बाळासाहेब घोडके, सुर्दशन इटप, विकास डमाळे, रंगनाथ फटांगरे, पप्पू कानकाटे, शोएब शेख, राजू सातपुते, वैभव अभंग, संकेत खुळे, निलेश गुंजाळ, सचिन पावबाके, सोहेल पठाण, विलास भोंडवे, सलमान शेख, अक्षय गाडे, प्रकाश क्षत्रिय, शरद पावबाके आदी यावेळी उपस्थित होते.

आगामी निवडणुकात राज्यात पक्षाची ताकद वाढलेली असेल : शिंदे म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचारांशी शिवसैनिक कायम जोडले गेले आहेत. ठाकरे यांच्यापेक्षा कुणीही मोठा नाही. ग्रामीण भागातील शिवसैनिकांची मुळ शिवसेनेसोबत नाळ जोडलेली आहे. शिवसेना सोडून गेलेले जर आपल्या साहेबांच्या विचारांची प्रामाणिक असते तर, त्यांनी शिवसेना सोडलीच नसती.

कोरोना काळात मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामाची देशात दखल घेतली गेली. आदित्य ठाकरे यांचा महाराष्ट्र दौऱ्याने संपूर्ण महाराष्ट्रातील युवा शिवसेनेशी जोडला जातो आहे. पक्षात येणाऱ्या युवकांची संख्या अधिक आहे. ग्रामीण भागात शिवसेनेला मोठे बळ मिळते आहे. जुने-नवे शिवसैनिक एकत्र आल्याने निश्चित आगामी सर्वच निवडणुकांमध्ये राज्यात शिवसेनेची ताकद वाढलेली दिसेल.

गोंदिया जिल्हा संपर्कप्रमुख नरेश माळवे यांनी प्रास्ताविक केले. विकास डमाळे यांनी सूत्रसंचलन केले. जिल्हाध्यक्ष मुजीब शेख यांनी आभार मानले. संगमनेर शहर, संगमनेर तालुका शिवसेना, युवा सेना, दिव्यांग सहाय्य सेना आदी अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

बबनराव घोलप यांना पक्षाने उमेदवारी द्यावी…

पक्ष संघटन वाढवण्यासाठी काम करत असताना माजीमंत्री बबनराव घोलप, संपर्कप्रमुख सूर्यकांत शिंदे यांचे मार्गदर्शन आम्हाला लाभते आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून बबनराव घोलप यांना पक्षाने उमेदवारी द्यावी, अशी मागणी शिवसैनिक करत आहेत. संपर्कप्रमुख सुर्यकांत शिंदे यांच्याकडेही तशी मागणी आम्ही करत आहोत.
मुजीब शेख, जिल्हाप्रमुख.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 641
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

By Annant Ppangarkar08/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शहरातील महिलांची सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने संगमनेर नगर…

शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेत ‘एक विद्यार्थी, एक बेंच’ उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद; आठवडाभरात ६८ हजारांच्या लोकसहभागातून ४० बेंचचे लोकार्पण

08/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026

कोपरगाव आणि संगमनेरमधील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस; दोन सराईत चोरट्यांकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, अहिल्यानगर एलसीबीची कामगिरी

08/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.