Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!

29/09/2026

दुष्काळ, जिल्हा बँक आणि राजकारण : नाण्याच्या दोन बाजू एकत्र आल्या! पुढे काय…

29/09/2026

मंगळवार २९ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरकर विद्यार्थी जगात देशाचा नावलौकिक वाढवतील: उद्योगपती राजेश मालपाणी
शिक्षण

संगमनेरकर विद्यार्थी जगात देशाचा नावलौकिक वाढवतील: उद्योगपती राजेश मालपाणी

उच्च शिक्षणासाठी विदेशात जाणार्‍या विद्यार्थ्यांचा संगमनेर मर्चंट बँकेतर्फे सत्कार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/08/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – उच्च शिक्षणासाठी विदेशामध्ये जात असलेले संगमनेरचे विद्यार्थी आपल्या चमकदार कामगिरीने जगामध्ये देशाचा नावलौकिक वाढवतील, असा विश्वास उद्योगपती राजेश मालपाणी यांनी व्यक्त केला.

संगमनेर मर्चंटस बँकेच्यावतीने अमेरिका आणि इंग्लंडमध्ये उच्च शिक्षणासाठी जात असलेल्या दहा विद्यार्थ्यांचा सत्कार आणि निरोप समारंभ बँकेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात संपन्न झाला. याप्रसंगी मालपाणी बोलत होते. यावेळी मालपाणी उद्योग समूहाचे संचालक जय मालपाणी, स्किनवेस्ट या ब्युटी ब्रँडच्या प्रणेत्या दिव्या मालपाणी, चेअरमन संतोष करवा, व्हाईस चेअरमन प्रकाश कलंत्री आदी उपस्थित होते.

हे १० विद्यार्थी जाताहेत परदेशात : सिमरन अत्रे, जय गाडे, गंधार पानसरे, चिदंबर धापटकर, प्रणव पगडाल, तन्मय राठी, ओम कोळपकर, धनंजय सोनवणे, आयुष पडतानी या विद्यार्थ्यांनी विविध विद्याशाखांमधील उच्च शिक्षणासाठी अमेरिका आणि इंग्लंड येथील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतला आहे. त्यासाठी येणारा खर्च बराच मोठा असल्याने संगमनेर मर्चंट बँकेच्यावतीने त्यांना आर्थिक पाठबळ देण्यात आले आहे.

चाळीस वर्षांपूर्वी अमेरिकेमध्ये शिक्षण घेताना आलेले अनुभव विद्यार्थी आणि पालकांसमोर सांगताना मालपाणी म्हणाले, हे सर्व विद्यार्थी बुद्धिमत्तेच्या बळावर जागतिक स्तरावर आपल्या मातृभूमीचे नाव झळकविणारे ‘टॉप टेन’ विद्यार्थी ठरतील. आपण केवळ विद्यार्थी नाही तर भारताचे अँबेसिडर म्हणून जात आहे. या माध्यमातून आपण देशाचे नाव नक्की उंच कराल.

जय मालपाणी यांनी इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये शिक्षण घेताना कोणकोणत्या दक्षता घेतल्या पाहिजेत याची माहिती दिली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आहार आणि व्यायामाकडे लक्ष देऊन सर्वांनी शंभर टक्के तंदुरुस्त राहण्याची काळजी घ्यावी. ग्रंथालयांचा व जिमचा पुरेपूर उपयोग करावा. अर्धवेळ नोकरी करून कमवा व शिका या धोरणाचा अवलंब करावा. विदेशामध्ये विद्यार्थी म्हणून प्रत्येक क्षेत्रात मिळणार्‍या सवलतींचा लाभ घ्यावा, यासह अनेक महत्त्वपूर्ण टिप्स दिल्या.

दिव्या मालपाणी यांनीही विद्यार्थ्यांना तुमचे स्वप्नं साकार करण्याची सुवर्णसंधी तुमच्या गुणवत्तेमुळे मिळाली. संगमनेरमधून थेट विदेशात जात असल्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व आता ग्लोबल होणार आहे. कोणतेही काम कमीपणाचे नसते, मीही तिथे जिमसुपरवायझरचे काम करून अनुभव व अर्थसहाय्य मिळविलेची माहिती दिली.

यांनीही दिल्या शुभेच्छा : चेअरमन संतोष करवा, व्हाईस चेअरमन प्रकाश कलंत्री मुख्य कार्यकारी अधिकारी दुनाखे यांनीही आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांच्या उज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा ४० फुटाच्या हाराने गौरव : कार्यक्रमाची सुरुवात श्री साईबाबांच्या प्रतिमेला जय मालपाणी व दिव्या मालपाणी यांच्या हस्ते माल्यार्पण करून करण्यात आली. विद्यार्थ्यांना सत्कारामध्ये भेटवस्तू म्हणून करवा यांच्यावतीने छानश्या लॅपटॉप बॅग समवेत राजेश मालपाणी तर्फे ओपन सिक्रेट हे आत्मचरित्र आणि स्वर्गीय उद्योगपती ओंकारनाथजी मालपाणी यांनी त्यांना देश विदेशात शिकत असताना लिहिलेल्या पत्रांचे पत्र संस्कार ही पुस्तके व सोबत एक प्रेरक पत्र देण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना एकत्रितपणे भव्य चाळीस फुटांचा भव्य पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी उच्च शिक्षणासाठी मर्चंटने दिलेल्या अर्थसहाय्याबद्दल भाषणातून कृतज्ञता व्यक्त केली. सूत्रसंचालन संचालक महेश डंग यांनी केले. आभार प्रदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुनाखे यांनी मानले. कार्यक्रमाला बँकेचे संचालक राजेंद्र वाकचौरे, मधुसूदन नावंदर, मुकेश कोठारी, रवींद्र पवार, श्याम भडांगे, कीर्ती करवा, डेप्युटी जनरल मॅनेजर विजय बजाज, असिस्टंट जनरल मॅनेजर विठ्ठल कुलकर्णी आदींसह मान्यवर उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 970
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!

By Annant Ppangarkar29/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – नागरिकांच्या अज्ञानाचा आणि अंधश्रद्धेचा फायदा घेत ‘पैशाचा पाऊस’ पाडण्याचे आमिष…

दुष्काळ, जिल्हा बँक आणि राजकारण : नाण्याच्या दोन बाजू एकत्र आल्या! पुढे काय…

29/09/2026

मंगळवार २९ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026

मुलांऐवजी पालकांसाठी संस्कार शिबिर घ्या! — डॉ. संजय कळमकर यांचा घणाघाती टोला; बालकुमार साहित्य संमेलनात रंगली वैचारिक चर्चा

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.