Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर बायपासवर चालत्या कंटेनरला आग; लाखो रुपयांच्या चारचाकी गाड्या जळाल्याने मोठे नुकसान

June 5, 2026

पोलिसांची मोठी कारवाई: कत्तलीसाठी चालवलेल्या गोवंशासह तिघांना पकडले; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

June 5, 2026

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे ‘साने गुरुजी जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित; पुणे येथील सोहळ्यात गौरव

June 5, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » उद्धव ठाकरेंवर १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करत किरीट सोमय्या पुन्हा राजकीय आखाड्यात; काय आहे प्रकरण?
राजकारण

उद्धव ठाकरेंवर १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करत किरीट सोमय्या पुन्हा राजकीय आखाड्यात; काय आहे प्रकरण?

विरोधकांच्या घोटाळ्यांवर केले भाष्य
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरAugust 8, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

मुंबई – काही दिवसांपूर्वी कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल प्रकरणात अडचणीत सापडलेले भाजप नेते किरीट सोमय्या पुन्हा एकदा राजकीय आखाड्यात उतरले आहे. कोरोना काळात उद्धव ठाकरे यांच्या सरकारकडून मुलुंड येथील कोविड सेंटरमध्ये १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी ट्विटर द्वारे केला आहे.

कथित आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणानंतर गेल्या काही दिवसांपासून राजकीय अज्ञातवासात असलेल्या सोमय्या यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच ते पुन्हा एकदा राजकीय दृष्ट्या सक्रिय होत विरोधकांचे आर्थिक घोटाळे समोर आणू लागले आहेत. मंगळवारी त्यांनी ट्विटरवर मुलुंड येथील कोविड सेंटरच्या शंभर कोटीच्या घोटाळ्याबद्दल आरोप केले आहेत. या माध्यमातून ते पुन्हा एकदा आपली तोफ विरोधकांवर डागू लागल्याचे समोर आले.

किरीट सोमय्या यांनी केलं ट्विट: ट्विटमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ‘उध्दव ठाकरे सेनेच्या नेत्याला त्यांच्या संबंधित ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टंसी प्रायवेट लिमिटेड कंपनीला मुंबई महानगरपालिकेने मुलुंड रिचार्डसन क्रूडास मैदानावरील तात्पुरते कोविड हॉस्पिटलच्या नावाने १०० कोटी रुपयांचे गिफ्ट दिले. १८५० खाटांचे तात्पुरते कोविड हॉस्पिटल बांधण्याचे या ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टंसी प्रा. लि. कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले. ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टेंसी प्रा. लि. कंपनी ही एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी होती.

रु. 100 कोटींचा मुलुंड कोविड हॉस्पिटल घोटाळा

1850 खाटांचे तात्पुरते कोविड हॉस्पिटल बांधण्याचा खर्च रु 10.94 कोटी. मुंबई महानगरपालिकेने दर महिने रु. 3,59,78,389 प्रमाणे 25 महिने भाडे दिले

ठाकरे सरकारचे मित्र ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टंसी कंपनीला 100 कोटी रुपये गिफ्ट. चौकशीची होणार pic.twitter.com/qc3SLnJF1P

— Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 8, 2023

१०० कोटींचा घोटाळा: ७ जुलै २०२० ते ३१ जुलै २०२२ असे २५ महिने हॉस्पिटल चालू ठेवण्यात आले. त्यासाठी भाड्यापोटी ओक्स मॅनेजमेंट कॅन्सल्टन्सी कंपनीला ९० कोटी रुपये देण्यात आले. बांधकामासाठी १० कोटी रुपये दिले असे मिळून १०० कोटींचा घोटाळा उद्धव ठाकरे यांनी केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

१५ कोविड सेंटरसाठी ७०० कोटी रुपये भाडे घोटाळे: रिचार्डसन क्रूडास कंपनीकडून भाड्याने घेण्यात आलेल्या जमिनीचा एकही पैसा देण्यात आला नाही. या संदर्भात सोमय्या यांनी मुंबई पोलीस, आयकर विभाग, ईडी कार्यालय यांना तक्रार दिली असल्याचे सांगितले आहे. या कोविड सेंटर प्रमाणे मुंबई मधील १५ कोविड सेंटरसाठी ७०० कोटी रुपये भाडे घोटाळे करण्यात आले आहेत, असा सोमय्याचा आरोप आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 772
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

June 4, 2026

विधानपरिषद निवडणूक : भाजपकडून दिडशे कोटींची सौदेबाजी.. मविआच्या सर्व उमेदवारांची माघार! खा. संजय राऊत यांचा गंभीर आरोप

June 4, 2026

विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून कोट्यवधींच्या ऑफर्स; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघाती आरोप

June 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
अपघात

संगमनेर बायपासवर चालत्या कंटेनरला आग; लाखो रुपयांच्या चारचाकी गाड्या जळाल्याने मोठे नुकसान

By अनंत पांगारकरJune 5, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर बायपास जवळ असणाऱ्या कृष्णा लॉन्स परिसरात…

पोलिसांची मोठी कारवाई: कत्तलीसाठी चालवलेल्या गोवंशासह तिघांना पकडले; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

June 5, 2026

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे ‘साने गुरुजी जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित; पुणे येथील सोहळ्यात गौरव

June 5, 2026

मी आत्महत्या करेन… पानसरेंचा रुसवा आणि विखे-जगतापांचे ‘मास्टर’ नियोजन! अखेर तनपुरे बिनविरोध

June 5, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.