Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर बायपासवर चालत्या कंटेनरला आग; लाखो रुपयांच्या चारचाकी गाड्या जळाल्याने मोठे नुकसान

June 5, 2026

पोलिसांची मोठी कारवाई: कत्तलीसाठी चालवलेल्या गोवंशासह तिघांना पकडले; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

June 5, 2026

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे ‘साने गुरुजी जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित; पुणे येथील सोहळ्यात गौरव

June 5, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या नगर, संगमनेरमध्ये बैठका; निरीक्षक माजी मंत्री चंद्रकांत हंडोरेंची प्रमुख उपस्थिती
राजकारण

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या नगर, संगमनेरमध्ये बैठका; निरीक्षक माजी मंत्री चंद्रकांत हंडोरेंची प्रमुख उपस्थिती

काँग्रेसची निवडणूक तयारी सुरू
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरAugust 10, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

मुंबई – काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वपूर्ण बैठक पार पडली असून राज्यातील ४८ मतदारसंघांमध्ये काँग्रेसने पूर्वतयारी सुरू केली आहे. नगर दक्षिण व शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी निरीक्षक म्हणून माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. येत्या रविवारी (दि. १३) नगर शहरात दक्षिण मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांची तर संगमनेरमध्ये उत्तरेची बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे व शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिली आहे.

हे राहणार उपस्थित: या बैठकीसाठी निरीक्षक हंडोरे यांच्यासह दक्षिण मतदारसंघाचे नवनियुक्त समन्वयक वीरेंद्र किराड (पुणे), शिर्डी मतदारसंघाचे समन्वयक ज्ञानेश्वर गायकवाड (नाशिक), आमदार लहू कानडे, यांच्यासह जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांमधील नगर शहर जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, ग्रामीण जिल्हा कार्यकारणी, विविध सेल, फ्रंट, विभागांचे प्रमुख, प्रदेश पदाधिकारी यांची उपस्थिती असणार आहे. बैठकीची जय्यत तयारी शहर व जिल्हा काँग्रेसच्यावतीने सुरू आहे.

येथे होणार बैठक: रविवारी सकाळी १० वाजता संगमनेरच्या शासकीय विश्रामगृह येथे तर नगर शहरात नगर मनमाड रोडवरील हॉटेल मेघनंद या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ आहे.

शिर्डीत काँग्रेस आग्रही: मागील निवडणुकीत या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार निवडून आला आहे. मात्र विद्यमान खासदार हे सत्ताधारी शिंदे शिवसेनेसह भाजप बरोबर उघडपणे गेले आहेत. त्यामुळे या जागेवर उत्तरेतील कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा उमेदवार देण्याचा आग्रह सुरुवातीपासून धरला आहे.

नगर दक्षिणवरही दावा: नगर दक्षिणेचा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस गेल्या अनेक वर्षांपासून लढवत आहे. मात्र याही मतदारसंघावर मुंबईत झालेल्या लोकसभा आढावा बैठकीमध्ये काँग्रेसने दावा ठोकला आहे. हा दावा ठेवताना आतापर्यंत बारा वेळा काँग्रेसचा खासदार या मतदारसंघातून निवडून गेला असल्याची आकडेवारी मांडली गेली आहे.

निवडणुकीची पूर्वतयारी: जिल्ह्यातील दोन्ही जागांवर काँग्रेसने दावा ठोकला आहे. त्यातच आता पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या दोन स्वतंत्र बैठकांचे आयोजन करण्यात आल्यामुळे काँग्रेसने लोकसभा निवडणुकीची थेट पूर्वतयारीच सुरू केल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.

तयारी शतप्रतिशत: लवकरच खा. राहुल गांधी इंडियाच्या बैठकीच्या निमित्ताने मुंबईत येत आहेत. त्या आधीच नगर दक्षिण, शिर्डीसह राज्यातील ४८ मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसने मिशन हाती घेतले आहे. लोकसभा ही देशाची निवडणूक आहे. कोणता मतदारसंघ कुणाकडे याचा अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर ठरेल. मात्र जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांमध्ये काँग्रेस शतप्रतिशत तयारी करणार असल्याची माहिती किरण काळे व राजेंद्र नागवडे यांनी दिली आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 602
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

June 4, 2026

विधानपरिषद निवडणूक : भाजपकडून दिडशे कोटींची सौदेबाजी.. मविआच्या सर्व उमेदवारांची माघार! खा. संजय राऊत यांचा गंभीर आरोप

June 4, 2026

विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून कोट्यवधींच्या ऑफर्स; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघाती आरोप

June 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
अपघात

संगमनेर बायपासवर चालत्या कंटेनरला आग; लाखो रुपयांच्या चारचाकी गाड्या जळाल्याने मोठे नुकसान

By अनंत पांगारकरJune 5, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर बायपास जवळ असणाऱ्या कृष्णा लॉन्स परिसरात…

पोलिसांची मोठी कारवाई: कत्तलीसाठी चालवलेल्या गोवंशासह तिघांना पकडले; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

June 5, 2026

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे ‘साने गुरुजी जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित; पुणे येथील सोहळ्यात गौरव

June 5, 2026

मी आत्महत्या करेन… पानसरेंचा रुसवा आणि विखे-जगतापांचे ‘मास्टर’ नियोजन! अखेर तनपुरे बिनविरोध

June 5, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.