Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!

29/09/2026

दुष्काळ, जिल्हा बँक आणि राजकारण : नाण्याच्या दोन बाजू एकत्र आल्या! पुढे काय…

29/09/2026

मंगळवार २९ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कोपरगावच्या चासनळी घटनेची राज्य महिला आयोगाने घेतली सुमोटो दखल… आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रूपवते कोपरगावमध्ये
आरोग्य

कोपरगावच्या चासनळी घटनेची राज्य महिला आयोगाने घेतली सुमोटो दखल… आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रूपवते कोपरगावमध्ये

आपतकालीन सेवांना अधिक बळकट करण्याची गरज
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/08/2023Updated:12/08/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

अहमदनगर – गाव पातळीवर असलेल्या प्रत्येक यंत्रणेने सतर्क आणि संवेनशीलतेने काम करण्याची आवश्यकता आहे. यापुढे निष्काळजीपणामुळे एकही जीव जाऊ नये यासाठी प्रशासनाने सतर्क राहायला हवे. अशा सूचना राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रुपवते यांनी प्रशासनाला केल्या. 

घेतली अधिकाऱ्यांची बैठक: कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घडलेल्या घटनेची राज्य महिला आयोगाने सुमोटो दखल घेतली आहे. आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रुपवते यांनी शुक्रवारी कोपरगाव तालुक्याचा दौरा करत याप्रकरणी प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांची तहसील कार्यालयात बैठक घेत या प्रकरणी आढावा घेतला.

काय होती घटना: वडाळी (नाशिक) येथील रहिवासी असलेली रेणुका किरण गांगुर्डे ही महिला आपल्या माहेरी कारवाडी (ता. कोपरगाव) येथे आली होती. 3 ऑगस्टला सकाळी तिला बाळंतपणासाठी चासनळी येथील प्राथमिक केंद्रात आणण्यात आले होते. यावेळी तेथे वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने आरोग्य सेवक असलेल्या कर्मचाऱ्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. साहिल खोत यांच्याशी संपर्क केला असता या महिलेला त्यांनी बाळंतपणासाठी कोपरगावच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यास सांगितले.

महिलेचा झाला मृत्यू: त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रातील चालक संजय शिंदे यांनी रुग्णवाहिकेमध्ये पुरेसे इंधन नसल्याचे कारण सांगत या महिलेला पुढील उपचारासाठी घेऊन जाण्यास उशीर केला. त्यानंतर या महिलेला रुग्णवाहिकेतून धामोरी येथील उपकेंद्रात दाखल करण्यात आले. तेथे या महिलेची प्रसूती करण्यात आली. मात्र महिलेची प्रकृती अत्यवस्थ असल्याने तिला कोपरगावच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र तत्पूर्वीच संबंधित महिलेचा मृत्यू झाला.

संबंधितांवर झाली कारवाई: या घटनेची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी गंभीरतेने दखल घेत चासनळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी साहील त्रिंबकराव खोत यांचे निलंबन केले तर द्वितीय बंधपत्रीत वैद्यकीय अधिकारी डॉ. साक्षी सेठी आणि वाहन चालक संजय शिंदे यांची सेवा समाप्त केली. त्यानंतर या तिघांविरोधात कोपरगाव पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. तर धामोरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका सी. एल. आरखडे आणि समुदाय आरोग्य अधिकारी नेहा वाघमारे यांच्याविरुद्ध जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी प्रशासकीय कारवाई केली आहे.

रुपवते यांचा संवाद: दरम्यान राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते यांनी चासनळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत नव्याने रुजू झालेल्या वैद्यकीय अधिकारी, स्टाफ व आशा सेविकांशी संवाद साधला. त्यानंतर मयत झालेल्या महिलेच्या कारवाडी येथील घरी भेट देऊन परिवाराची विचारपूस केली. मयत गांगुर्डे यांच्या बाळाला योग्य त्या सरकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रशासनाला सूचना त्यांनी केल्या.

दौऱ्यादरम्यान हे अधिकारी होते उपस्थित: यावेळी कोपरगावचे तहसीलदार संदीपकुमार भोसले, गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, बाल विकास प्रकल्प अधिकारी पंडित वाघेरे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी अभिराज सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी व्ही. बी. घोलप, तालुका संरक्षण अधिकारी विकास बागुल, केस वर्कर वन स्टॉप सेंटर अहमदनगरच्या ममिता पावरा, समुपेदशक नितीन थोरात, समुपदेशक वैशाली झालटे उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 830
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

19/07/2026

मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; आगामी दौरे आणि कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलले

04/07/2026

केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे बदापूर येथील शेती धोक्यात; विहिरींचे पाणी दूषित, तलावातील मासे मृत

11/06/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!

By Annant Ppangarkar29/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – नागरिकांच्या अज्ञानाचा आणि अंधश्रद्धेचा फायदा घेत ‘पैशाचा पाऊस’ पाडण्याचे आमिष…

दुष्काळ, जिल्हा बँक आणि राजकारण : नाण्याच्या दोन बाजू एकत्र आल्या! पुढे काय…

29/09/2026

मंगळवार २९ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026

मुलांऐवजी पालकांसाठी संस्कार शिबिर घ्या! — डॉ. संजय कळमकर यांचा घणाघाती टोला; बालकुमार साहित्य संमेलनात रंगली वैचारिक चर्चा

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.