Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १३ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 13, 2026

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

August 12, 2026

संगमनेरमध्ये ‘बाजारपेठ व्यापारी मित्र मंडळा’चा ऐतिहासिक निर्णय; यंदा गणपती वर्गणीसाठी वापरणार ‘डिजिटल पावती ॲप’

August 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » डॉ. जयश्रीताई थोरात यांचा राष्ट्रीय एकता पुरस्काराने दिल्लीत गौरव; प्रतिष्ठेचा पुरस्कार तालुक्यातील ज्येष्ठ महिलांनी स्वीकारला
इतिहास

डॉ. जयश्रीताई थोरात यांचा राष्ट्रीय एकता पुरस्काराने दिल्लीत गौरव; प्रतिष्ठेचा पुरस्कार तालुक्यातील ज्येष्ठ महिलांनी स्वीकारला

संगमनेर तालुक्यातील ज्येष्ठ महिलांनी स्वीकारला पुरस्कार
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरAugust 13, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – महिला सबलीकरण व ग्रामीण महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती तसेच कोरोना संकटात कॅन्सर हॉस्पिटलमध्ये रात्रंदिवस काम करणाऱ्या कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या कार्याचा दिल्ली सरकारने राष्ट्रीय एकता पुरस्कार देऊन गौरव केला आहे.

यांच्या उपस्थितीत यांनी स्वीकारला पुरस्कार: नवी दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन क्लब हॉलमध्ये झालेल्या शानदार कार्यक्रमात ओबीसी आयोगाचे अध्यक्ष जगदीश यादव, पंडित बल देवराज वर्मा, जीएसटीचे कमिशनर सारांश महाजन, धरमपाल भारद्वाज, जसबीरसिंग करारा, अनुप चावला यांच्या उपस्थितीमध्ये डॉ. थोरात यांच्यावतीने हा राष्ट्रीय एकता पुरस्कार संगमनेर तालुक्यातील सोनोशी येथील जेष्ठ महिला केशरबाई कचरू सानप व साकुर येथील रेऊबाई नान्नर यांनी स्वीकारला.

सोळा राज्यातील व्यक्तींना पुरस्कार: भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या दिनानिमित्त देशातील १६ राज्यांमधील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन या कार्यक्रमात गौरव करण्यात आला.

आयोगाचे अध्यक्ष जगदीश यादव म्हणाले, देश भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहे. विविध क्षेत्रात देशांने मोठी प्रगती केली आहे. अजूनही देशामध्ये अनेक गोरगरीब विकासापासून वंचित आहे. या पुरस्कार विजेत्यांनी हे वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करावे.

महाराष्ट्रात सहकारातून प्रगती साधली असून सहकार क्षेत्रात थोरात परिवाराचे नाव मोठे आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ. जयश्रीताई थोरात यांनी टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या माध्यमातून दुर्दम्य अशा ब्लड कॅन्सर विभागात काम करताना अनेकांना जीवदान दिले आहे. ग्रामीण व आदिवासी महिलांमध्ये आरोग्याबाबत जनजागृतीचे त्यांचे कार्य नक्कीच प्रेरणादायी ठरणारे आहे. अहमदनगर जिल्हा हा सहकाराचा जिल्हा म्हणून ओळखला जात असून शिर्डी व शनिशिंगणापूर हे प्रसिद्ध देवस्थान एकतेचा संदेश देत असल्याचेही ते म्हणाले.

अनुप चावला म्हणाले, एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण भागात महिला आरोग्यासाठीची मोठी चळवळ उभारून डॉ. थोरात यांनी आदर्श निर्माण केला आहे.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर केशरबाई सानप म्हणाल्या, आमदार बाळासाहेब थोरात यांचा संस्कार घेऊन डॉ. जयश्रीताई काम करत आहे. आमदार थोरात व डॉ. जयश्रीताई यांचा दिल्लीत होणारा गौरव हा संगमनेर तालुका व महाराष्ट्राची छाती अभिमानाने फुलवणारा आहे.

रेवुबाई नान्नर म्हणाल्या, माझ्यासारख्या ग्रामीण महिलेला दिल्लीत मानाचा पुरस्कार घेण्याची ही मोठी संधी आ. थोरात यांच्यामुळे मिळाली.

राष्ट्रीय पुरस्काराने काम करण्यास अधिक ऊर्जा: डॉ. जयश्रीताई थोरात

लोकांची सेवा करत राहणे हा थोरात परिवाराने दिलेला संस्कार आहे. त्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य, महिला सबलीकरण, व युवकांसाठी आपण काम करत आहोत. या पुरस्काराने नक्कीच अधिक ऊर्जा मिळेल.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,238
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांच्या उभारणीला गती

July 1, 2026

संगमनेरमध्ये शिवरायांचे भव्य अश्वारूढ स्मारक साकारणार; संगमनेरकरांची अश्वारूढ स्मारकाला पसंती, जनमताचा आदर करत पालिकेच्या सभेत ठरावावर शिक्कामोर्तब

April 14, 2026

गुरुवारी संगमनेरात शिवजयंतीनिमित्त ‘रायबा हेच का आपले स्वराज्य’ महानाट्याचे जयहिंद लोकचळवळीकडून आयोजन

February 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १३ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By अनंत पांगारकरAugust 13, 20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन…

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

August 12, 2026

संगमनेरमध्ये ‘बाजारपेठ व्यापारी मित्र मंडळा’चा ऐतिहासिक निर्णय; यंदा गणपती वर्गणीसाठी वापरणार ‘डिजिटल पावती ॲप’

August 12, 2026

हॉटेल सुरभीपर्यंत पोहोचले बनावट दारूचे धागेदोरे; आस्थापना कायमस्वरूपी सील करा, शिवसेनेच्या (ठाकरे गट) अमर कतारी यांची मागणी

August 12, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.