Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026

आज शनिवार ३ ऑक्टोबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घेऊया

03/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांच्या उभारणीला गती
इतिहास

संगमनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांच्या उभारणीला गती

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार असून, दोन्ही महापुरुषांच्या भव्य स्मारकांचा मार्ग मोकळा झाला आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/07/2026Updated:01/07/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर:
संगमनेर शहरात छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांच्या उभारणीसाठी हालचालींना वेग आला आहे. या प्रकल्पांसाठी नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांनी विशेष पुढाकार घेतला असून, संगमनेर नगर परिषदेने या कामासाठी अधिकृत निविदा प्रसिद्ध केली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार असून, दोन्ही महापुरुषांच्या भव्य स्मारकांचा मार्ग मोकळा झाला आहे.
नगर परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर बस स्थानकाच्या आवारात प्रस्तावित चौथर्‍यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पंधरा फूट उंचीचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणार आहे. हा पुतळा ब्राँझ गनमेटल या धातूपासून बनविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, शिवाजी चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सद्यस्थितीत असलेल्या पुतळ्याच्या ठिकाणी बारा फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे नियोजन आहे. हा पुतळा देखील ब्राँझ गनमेटल धातूचाच असेल. मुख्याधिकारी दयानंद गोरे, नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांनी यासंबंधीची निविदा प्रसिद्धीस दिली आहे.
नगर परिषदेने या कामांसाठी ई-निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक आणि पात्र कंत्राटदार ‘महाटेंडर्स’च्या संकेतस्थळावरून या निविदेबाबतची अधिक माहिती घेऊ शकतात. एक जुलै २०२६ पासून निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली असून, दहा जुलै २०२६ पर्यंत ऑनलाइन निविदा सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 427
छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा निविदा संगमनेर नगरपरिषद
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात; १५७ बालगांधींच्या प्रभात फेरीने शहर दुमदुमले, गांधीजींच्या विचारांमुळे जगात भारताची मोठी ओळख: मा. आमदार डॉ. सुधीर तांबे

02/10/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026

संगमनेरमध्ये स्मारकांचा मार्ग मोकळा! शिवसेनेच्या (ठाकरे) पाठपुराव्याला यश, नगरपरिषदेकडून निविदा प्रसिद्ध; उपजिल्हाप्रमुख कतारी यांनी केले स्वागत

01/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

By Annant Ppangarkar03/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- बदलते हवामान, वाढते तापमान आणि राज्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती यावर…

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026

आज शनिवार ३ ऑक्टोबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घेऊया

03/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.