Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये शिवरायांचे भव्य अश्वारूढ स्मारक साकारणार; संगमनेरकरांची अश्वारूढ स्मारकाला पसंती, जनमताचा आदर करत पालिकेच्या सभेत ठरावावर शिक्कामोर्तब
इतिहास

संगमनेरमध्ये शिवरायांचे भव्य अश्वारूढ स्मारक साकारणार; संगमनेरकरांची अश्वारूढ स्मारकाला पसंती, जनमताचा आदर करत पालिकेच्या सभेत ठरावावर शिक्कामोर्तब

५ ते ७ मार्च दरम्यान झालेल्या या मतदान प्रक्रियेत १२ हजारहून अधिक नागरिकांनी आपला हक्क बजावला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर

संगमनेर शहराच्या अस्मितेचा आणि गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेलाछत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा प्रश्न आता प्रत्यक्ष कृती आराखड्याच्या टप्प्यावर पोहोचला आहे. नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत यासंदर्भातील महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला असून, शहरवासीयांनी दिलेल्या कौलानुसार संगमनेर बसस्थानक परिसरात महाराजांचे भव्य ‘पूर्णाकृती अश्वारूढ स्मारक’ उभारले जाणार असल्याचे आता निश्चित झाले आहे.

या स्मारकाचा प्रवास संघर्षाचा आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा राहिला आहे. २०१८ मध्ये तत्कालीन नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी बसस्थानक परिसरातील मोक्याची जागा स्मारकासाठी मिळावी, अशी अधिकृत मागणी करत या लढ्याची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यानंतर तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी हा प्रस्ताव शासनदरबारी ताकदीने मांडला. मात्र, एसटी महामंडळाच्या धोरणानुसार बसस्थानक परिसरात स्मारके उभारण्यास तांत्रिक अडचणी येत असल्याने हा विषय दीर्घकाळ रखडला होता.

२०२३ मध्ये आमदार सत्यजीत तांबे यांनी या प्रश्नात वैयक्तिक लक्ष घालून विशेष पाठपुरावा सुरू केला. त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेऊन, ही लोकभावनेची बाब असल्याचे पटवून दिले. मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत ‘विशेष बाब’ म्हणून बसस्थानक समोरील जागा नगरपालिकेकडे वर्ग करण्यास मंजुरी दिली. ही जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल समस्त संगमनेरकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष आभार मानले आहेत.

जागा निश्चित झाल्यानंतर स्मारकाच्या स्वरूपावरून संभ्रम निर्माण होऊ नये,यासाठी नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाही मार्गाने जनमत चाचणी घेण्याचा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. ५ ते ७ मार्च दरम्यान झालेल्या या मतदान प्रक्रियेत १२ हजारहून अधिक नागरिकांनी आपला हक्क बजावला.

काल जाहीर झालेल्या निकालानुसार, ६ हजार ५६४ नागरिकांनी अश्वारूढ स्मारकाला पहिली पसंती दिली, तर उभ्या स्मारकासाठी ४ हजार ७६१ आणि सिंहासनाधीश्वर स्मारकासाठी ७६१ मते पडली. या निकालाचा आदर करत नगरपालिकेने अश्वारूढ स्मारकाचा ठराव मंजूर केला.

आमदार सत्यजीत तांबे यांनी या स्मारकाच्या उभारणीबाबत माहिती देताना सांगितले की, या भव्य स्मारकासाठी अंदाजे दीड कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा निधी केवळ शासकीय योजनांवर अवलंबून न राहता, लोकसहभागातून आणि शासनाच्या मदतीने उभा केला जाईल. सर्व संगमनेरकरांच्या सहभागातून हे स्मारक शहराच्या वैभवात भर घालणारे आणि येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देणारे ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ठराव मंजूर झाल्यामुळे आता प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार असून शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 921
छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा मतदान मैथिली तांबे सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पुरस्कार

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय आणि गुजरात सरकारच्या संयुक्त विद्यमाने…

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.