Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गुरुवारी संगमनेरात शिवजयंतीनिमित्त ‘रायबा हेच का आपले स्वराज्य’ महानाट्याचे जयहिंद लोकचळवळीकडून आयोजन
इतिहास

गुरुवारी संगमनेरात शिवजयंतीनिमित्त ‘रायबा हेच का आपले स्वराज्य’ महानाट्याचे जयहिंद लोकचळवळीकडून आयोजन

महानाट्य सर्वांसाठी विनामूल्य असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी आणि इतिहासाची ही गौरवगाथा अनुभवण्यासाठी संगमनेर शहर व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/02/2026Updated:17/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी –

संपूर्ण जगाचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून जयहिंद लोकचळवळीच्या वतीने गुरुवारी, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह येथे ‘रायबा हेच का आपले स्वराज्य’ या भव्य महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.

आमदार सत्यजित तांबे यांनी या कार्यक्रमाबाबत माहिती दिली असून, ४० कलावंतांच्या संचात सादर होणारे हे महानाट्य शिवभक्तांसाठी एक विशेष पर्वणी ठरणार आहे. या सोहळ्याला काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे आणि उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

प्राध्यापक प्रकाश वाघमारे लिखित आणि संगमनेरचे सुपुत्र डॉ. सागर फापाळे यांच्या मुख्य भूमिकेने सजलेल्या या महानाट्याने संपूर्ण राज्यात मोठी लोकप्रियता मिळवली आहे. या नाटकातून केवळ इतिहासच नव्हे, तर वर्तमान काळातील सामाजिक स्थितीवरही भाष्य करण्यात आले आहे. विशेषतः भ्रष्टाचार, महिलांची असुरक्षितता, तरुणांमधील व्यसनाधीनता आणि जातीयवाद यांसारख्या ज्वलंत विषयांवर या प्रयोगातून प्रकाश टाकला जाणार आहे.

महानाट्याचे मुख्य आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ साहेब आणि बाल शिवबा यांचे प्रेरणादायी प्रसंग, मोगलांशी झालेले रोमांचक संघर्ष, मर्दानी खेळ आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा भव्य राज्याभिषेक सोहळा. यासोबतच फटाक्यांची नेत्रदीपक आतिषबाजी कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहे.

हे महानाट्य सर्वांसाठी विनामूल्य असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी आणि इतिहासाची ही गौरवगाथा अनुभवण्यासाठी संगमनेर शहर व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जयहिंद लोकचळवळीच्या वतीने करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 676
जयहिंद लोकचळवळ महानाट्य रायबा हेच का आपले स्वराज्य सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
बैठक

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुका विस्ताराने मोठा असून यंदा पावसात झालेल्या मोठ्या घटीमुळे तालुक्यात…

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.