Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचा मानवतावादी विचारच देशाला दिशादर्शक : डॉ. सुधीर तांबे
धार्मिक

क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचा मानवतावादी विचारच देशाला दिशादर्शक : डॉ. सुधीर तांबे

संगमनेरमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी; शहरात भव्य स्मारक उभारणार असल्याची आमदार सत्यजित तांबे यांची घोषणा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोषित, वंचित आणि शेतकरी वर्गाच्या प्रश्नांना वाचा फोडत जगाला समता व बंधुतेचा विचार दिला. सर्वधर्मसमभाव जोपासणारा त्यांचा हा मानवतावादी विचारच देशाला प्रगतीच्या पथावर पुढे नेणारा आहे, असे प्रतिपादन जय हिंद लोकचळवळीचे संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.

संगमनेर येथील माळीवाडा भागात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे, ॲड. निशा शिवूरकर, डॉ. नामदेव गुंजाळ, अमजद पठाण यांच्यासह विविध पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. तांबे म्हणाले की, भारतीय लोकशाही आणि राज्यघटनेचा पाया हा छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारलेला आहे. देशातील जातीभेद मिटवून सामाजिक सलोखा राखण्यासाठी या महापुरुषांच्या विचारांची आज देशाला नितांत गरज आहे.

याप्रसंगी दुर्गाताई तांबे यांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. महात्मा फुले यांनी सतीची चाल, केशवपन यांसारख्या अनिष्ट प्रथांविरुद्ध बंड पुकारले आणि सावित्रीबाई फुले यांना शिक्षिका बनवून स्त्री शिक्षणाची दारे उघडली. त्यांच्या याच कार्यामुळे आज महिला सर्व क्षेत्रांत प्रगती करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या ‘यशोधन’ संपर्क कार्यालयातही महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सुरेश थोरात, प्रा. बाबा खरात, डॉ. नितीन भांड, रामदास तांबडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. संपूर्ण शहरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून महात्मा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

📌 महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जगासमोर आणला आणि शिक्षणाची क्रांती घडवली. त्यांचा हा वारसा जपण्यासाठी संगमनेरमध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात आणि डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी जाहीर केले.

 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 248
महात्मा फुले वाडा सत्यजित तांबे सुधीर तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सण-उत्सवांमध्ये वाढणारा डीजेचा कर्णकर्कश आवाज आणि लेझर लाईट्सचा अतिवापर मानवी आरोग्यासाठी…

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

मंगळवार, १३ ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमची रास आज काय सांगते

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.