Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना; ३ वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग करून तिच्या आईवर हल्ला करणाऱ्या नराधम चुलत्याला अटक, १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना; ३ वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग करून तिच्या आईवर हल्ला करणाऱ्या नराधम चुलत्याला अटक, १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

या प्रकरणाचा पुढील तपास संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक फराहनाज पटेल करत आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/04/2026Updated:15/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:

संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. आपल्या साडेतीन वर्षांच्या पुतणीचा विनयभंग करून तिच्या आईवर (भावजयीवर) जीवघेणा हल्ला करणाऱ्या एका नराधम चुलत्याला पोलिसांनी अटक केली आहे. संतोष शंकर राऊत (वय ३४, रा. घुलेवाडी, संगमनेर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

अटक केलेल्या आरोपीला बुधवारी न्यायालयात हजर केले असता, सहाय्यक सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायाधीश मंदार नेरलेकर यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी संतोष राऊत याला १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १३ एप्रिल २०२६ रोजी ही घटना घडली. फिर्यादी महिला आपल्या ३ वर्षे ५ महिने वयाच्या चिमुरडीला आंघोळ घालून बेडवर ठेवून स्वतः आंघोळीला गेली होती. याच संधीचा फायदा घेऊन आरोपी संतोष राऊत याने पीडित चिमुरडीच्या गुप्तांगाला स्पर्श करून तिचा विनयभंग केला.

महिला बाथरूममधून बाहेर आली असता, तिला हा धक्कादायक प्रकार दिसला. तिने जाब विचारला असता आरोपीने तिच्याशी अश्लील भाषेत बोलून तिचा विनयभंग केला. इतकेच नाही तर, मी तुझ्या मुलीशी संबंध ठेवीन अशी धमकी देत त्याने पीडितेच्या छातीवर दाब देऊन तिला ढकलून दिले. आरोपीने घरातील चाकूने महिलेवर वार करण्याचा प्रयत्न केला आणि रागाच्या भरात पाण्याचा माठ तिच्या अंगावर फेकून मारला. महिलेच्या आरडाओरड्यामुळे शेजारी धावून आल्याने मोठा अनर्थ टळला.

घटनेनंतर फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलिसांनी आरोपी विरोधात तात्काळ गुन्हा रजिस्टर नंबर ३००/२०२६ दाखल केला. आरोपीवर भारतीय नागरिक संहिता २०२३ मधील कलम ६४(२)(I)(F), ६५(२), ७४, ७५, ११८(१), ३५१(२), ३५२ आणि पोक्सो कायद्याच्या कलम ४, ६, ८ व १२ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक फराहनाज पटेल यांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचे लोकेशन शोधून त्याला अकोले येथून शिताफीने ताब्यात घेतले. १४ एप्रिलच्या मध्यरात्री त्याला अधिकृतपणे अटक करण्यात आली.

या गुन्ह्याचे स्वरूप अत्यंत गंभीर असून आरोपीने गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त करणे, पीडित बालिकेच्या अंगावरील कपडे जप्त करणे आणि आरोपीची वैद्यकीय तपासणी करणे अद्याप बाकी आहे. या तपासासाठी पोलिसांनी न्यायालयात ५ दिवसांची पोलीस कोठडी मागितली असता न्यायालयाने १८ एप्रिल पर्यंत आरोपीला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक फराहनाज पटेल करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,314
पोक्सो बाल लैंगिक अत्याचार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

By Annant Ppangarkar14/10/20260

माझा गाव माझा अभिमान… राजापूर भाऊसाहेब गणपत हासे, अध्यक्ष, महात्मा गांधी तंटामुक्ती समिती, राजापूर. (मो.…

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.