Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कौशल्याला मिळणार शैक्षणिक मान्यता; जयहिंद लोकचळवळच्या उपक्रमातून रोजगाराच्या नव्या संधी – माजी आमदार डॉ. सुधीर तांबे
सामाजिक

कौशल्याला मिळणार शैक्षणिक मान्यता; जयहिंद लोकचळवळच्या उपक्रमातून रोजगाराच्या नव्या संधी – माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

या उपक्रमामुळे संगमनेर आणि परिसरातील अनेक हातांना आता शैक्षणिक मान्यतेसह सन्मानाची नवी संधी उपलब्ध झाली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर 

समाजातील विविध स्तरावर कौशल्याधारित काम करणाऱ्या नागरिकांना त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाच्या आधारे आता अधिकृत शैक्षणिक प्रमाणपत्र प्राप्त होणार असून, यामुळे अनेकांसाठी रोजगाराची नवीन दारे उघडली जाणार आहेत. या महत्त्वपूर्ण उपक्रमामुळे अनुभवाचे रूपांतर शैक्षणिक पात्रतेत होऊन सर्वसामान्य नागरिकांना प्रगतीची नवी दिशा मिळेल, असा विश्वास माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि जयहिंद लोकचळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या पूर्व शिक्षण मान्यता मूल्यांकन केंद्राच्या माध्यमातून या प्रक्रियेला गती देण्यासाठी संगमनेर येथील सह्याद्री महाविद्यालयात एका विशेष प्राथमिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीचे आयोजन जयहिंद लोकचळवळचे समन्वयक उबेद शेख, सुनिता कांदळकर आणि अंजुम बागवान यांनी केले होते. या बैठकीला जयहिंद लोकचळवळचे संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्यासह पूर्व शिक्षण मान्यता केंद्राचे संचालक डॉ. राम ठाकर, विद्यार्थी सेवा विभागाचे डॉ. प्रकाश देशमुख आणि जयहिंद महिला मंचच्या अध्यक्षा दुर्गाताई तांबे यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे प्रशासकीय संयोजक अतिक शेख, नगरसेवक डॉ. दानीश शेख, ज्ञानेश्वर नाईक, फैजान तांबोळी, मोहसीन शेख आणि आवेज खान या मान्यवरांनी उपस्थित राहून या उपक्रमाच्या नियोजनावर चर्चा केली.

अनेकांकडे उपजत कौशल्य असूनही केवळ आर्थिक अडचणींमुळे त्यांना औपचारिक शिक्षण पूर्ण करता येत नाही. असे अनेक तरुण-तरुणी इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, मेकॅनिक, वायरमन तसेच विणकाम, शिवणकाम आणि टेलरिंग यांसारख्या विविध तांत्रिक व व्यावसायिक क्षेत्रांत अत्यंत निपुणतेने काम करत असतात.

मात्र, हाताशी अधिकृत शैक्षणिक प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांना मोठ्या कंपन्यांमधील नोकरीच्या संधी किंवा शासकीय लाभ मिळवताना अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर जयहिंद लोकचळवळ आणि मुक्त विद्यापीठाने उचललेले हे पाऊल अशा कुशल नागरिकांना त्यांच्या कामाची अधिकृत ओळख मिळवून देणार आहे.

या प्रमाणपत्रामुळे संबंधित नागरिकांना केवळ रोजगारच नव्हे, तर समाजात एक वेगळा सन्मान आणि आर्थिक स्थैर्य मिळवण्याचा मार्ग मोकळा होईल, असेही डॉ. तांबे यांनी यावेळी नमूद केले.

जयहिंद लोकचळवळचे मासिक…

जयहिंद लोकचळवळच्या सामाजिक कार्याचा विस्तार आता केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित न राहता राज्यभर पसरत असून, संस्थेचे अधिकृत मासिक आता महाराष्ट्रभरात पोहोचत आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या चळवळीशी जोडून घ्यावे आणि माहितीसाठी ८७९३५६२६६५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही या बैठकीच्या निमित्ताने करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे संगमनेर आणि परिसरातील अनेक हातांना आता शैक्षणिक मान्यतेसह सन्मानाची नवी संधी उपलब्ध झाली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 288
जयहिंद लोकचळवळ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

संगमनेरात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात; १५७ बालगांधींच्या प्रभात फेरीने शहर दुमदुमले, गांधीजींच्या विचारांमुळे जगात भारताची मोठी ओळख: मा. आमदार डॉ. सुधीर तांबे

02/10/2026

महात्मा गांधी जयंतीनिमित्त संगमनेरमध्ये जयहिंदच्या वतीने विविध उपक्रम; १५७ विद्यार्थ्यांची प्रभात फेरी अन् ‘जवाहरलाल हाजीर हो’ पुस्तकाचे प्रकाशन

30/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.