Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख: बेसुमार कर्जमाफीची बेशर्मी

30/08/2026

आज रविवार, ३० ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

30/08/2026

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

29/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात वीज उपकेंद्रावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा; ढिसाळ कारभाराविरोधात भर उन्हात चार तास रस्ता रोको
आंदोलन

संगमनेरात वीज उपकेंद्रावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा; ढिसाळ कारभाराविरोधात भर उन्हात चार तास रस्ता रोको

जर ११ तास वीज मिळाली नाही, तर आगामी काळात गुराढोरांसह अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील वीज वितरण विभागाच्या कार्यालयावर पंचक्रोशीतील संतप्त शेतकऱ्यांनी आक्रमक होत मोर्चा काढला. सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड वाढलेली असताना वीज मंडळाच्या ढिसाळ कारभारामुळे वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा आणि अपुरा दाब यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. वीज पुरवठा सुरळीत करावा आणि रोटेशन कालावधीत ११ तास वीज मिळावी, या प्रमुख मागणीसाठी शेतकऱ्यांनी भर उन्हात सुमारे चार तास रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी वीज वितरण विभागाच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला.
या आंदोलनात कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, जिल्हा बँकेचे माधवराव कानवडे, संपतराव डोंगरे, दत्ता कोकणे, शरद कोकणे, मारुती कवडे, सतीश खताळ, शुभम घुले, संगम आहेर, शांताराम गोरडे, देविदास खताळ, सुरेश कातोरे, अण्णा पाटील खताळ, भाऊराव शिरतार, अविनाश खताळ, किशोर खताळ, राजेंद्र बोडके, सरपंच लताताई खताळ, सरपंच नवनाथ कातोरे, अरुण गुंजाळ, राहुल कवडे, ज्ञानेश्वर गोरडे, संदीप ठोंबरे, बाळासाहेब खताळ, सोमनाथ शिंदे, अमोल शिंदे, सचिन खताळ, बाळासाहेब गुंजाळ, अरुण गुंजाळ, मंगेश मतकर, वैभव डोंगरे, संतोष कोकणे, नितीन डोंगरे, किशोर खताळ, प्रभू खताळ, त्रिंबक खताळ, देवराम गुंजाळ आणि भाऊसाहेब शिरतार यांच्यासह धांदरफळ बुद्रुक, धांदरफळ खुर्द, सांगवी, नांदुरी दुमाला, निमज व मिर्झापूर परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेती आणि पशुधनासाठी पाण्याची अत्यंत गरज असताना वीज वितरण विभागाच्या दुर्लक्षामुळे पिके जळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. पूर्वी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीज मिळत होती, मात्र आता परिस्थिती बिकट झाली आहे. अकोलेवरून येणाऱ्या ३३ केव्ही धांदरफळ फिडरचा विद्युत पुरवठा अत्यंत कमी दाबाने होत असून, तो तातडीने सुधारण्याची गरज आहे. तसेच जुने झालेले वीज खांब आणि तारांचे व्यवस्थापन करणे, नदीकाठच्या बंद डीपी सुरू करणे अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. जर ११ तास वीज मिळाली नाही, तर आगामी काळात गुराढोरांसह अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला.
आंदोलनादरम्यान शुभम घुले, संगम आहेर, शांताराम गोरडे, देविदास खताळ, सुरेश कातोरे, अण्णा पाटील खताळ, भाऊराव शिरतार आणि इतर मान्यवरांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. आंदोलनाची दखल घेत वीज विभागाचे उपकार्यकारी अभियंता चव्हाण, मेखे आणि शिलावंत यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी येत्या एक-दोन दिवसांत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आणि रोटेशन काळात ११ तास वीज देण्याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले. भर उन्हात तरुण आणि वृद्ध शेतकऱ्यांची झालेली ही विक्रमी उपस्थिती संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 475
आंदोलन धांदरफळ वीज वितरण विभाग
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

एमआयडीसीच्या जागेवर सौर प्रकल्प चालणार नाही! कौठे मलकापूर येथे भाजपचे आक्रमक आंदोलन; भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

19/08/2026

संगमनेर येथे आदिवासी विद्यार्थ्यांचे अर्धनग्न धरणे आंदोलन सुरुच; जयश्री थोरात यांची आंदोलनस्थळी भेट

17/08/2026

बिरेवाडीत पोल्ट्री शेडवर कारवाईसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरु; मांडवे-बिरेवाडी हद्दीतील तीन पोल्ट्रीचा वाद पेटला

14/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
विश्लेषण

रविवार विशेष लेख: बेसुमार कर्जमाफीची बेशर्मी

By Annant Ppangarkar30/08/20260

Annant Ppangarkar प्रवीण पुरो- घेतलेलं कर्ज फेडणं हे सामान्य कर्जदाराचं कर्तव्य. मात्र येनकेन कारणास्तव हे…

आज रविवार, ३० ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

30/08/2026

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

29/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.