महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – अखंड भारत संकल्प दिवसानिमित्त संगमनेर तालुक्यातील चिकणी या गावी विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या शाखेची स्थापना करण्यात आली.
समाजात जनजागृतीची आवश्यकता: बजरंग दल तालुका संयोजक कुलदिप ठाकूर यांनी यावेळी चिकणी गाव व पंचक्रोशीमध्ये यापूर्वी लव्ह जिहादची अनेक प्रकरणे समोर आल्याने याबाबत समाजामध्ये जनजागृती होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.
देवधर यांचे व्याख्यान: तसेच मंगळवारी (१५ ऑगस्ट) सायंकाळी ५ वाजता मालपाणी लॉन्स, संगमनेर या ठिकाणी सुनील देवधर यांच्या ‘राष्ट्रीयत्व व महिला सुरक्षा’ या विषयावर होणाऱ्या व्याख्यानासाठी कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
यांच्या झाल्या निवडी: यावेळी विश्व हिंदू परिषदेच्या चिकणी शाखा अध्यक्षपदी विशाल गुंजाळ, कार्याध्यक्षपदी सुधीर मुटकुळे, उपाध्यक्षपदी सार्थक वर्पे, मंत्री संकल्प वर्पे, सहमंत्री अमोल वर्पे, सहमंत्री अमोल भोर, कोषाध्यक्षपदी अमोल भाऊसाहेब वर्पे, बजरंग दल संयोजकपदी राहुल पाटोळे, बजरंग दल सहसंयोजकपदी संस्कार वर्पे, सेवा प्रमुखपदी रणजित वर्पे, गोरक्षा प्रमुखपदी अनिकेत शिंदे, धर्म प्रसार प्रमुखपदी संदीप वर्पे, प्रचार व प्रसिद्ध प्रमुखपदी गौरव अनिल वर्पे, समरसता प्रमुखपदी गौरव नवनाथ वर्पे, सत्संग प्रमुखपदी आशितोष ज्ञानेश्वर वर्पे आदींच्या दायित्वाची घोषणा जिल्हा सहमंत्री विशाल वाकचौरे यांनी यावेळी केली.
हे होते उपस्थित: यावेळी प्रशांत बेल्हेकर, दीपक मेहेत्रे, वैभव मेहेत्रे, अविनाश शहा, ओम बिल्लाडे, आनंद मिसाळ, रवी मंडलिक, शाम नाईकवाडी, संदीप वारे, सचिन कानकाटे, विशाल वाकचौरे, कुलदीप ठाकूर, शुभम कपिले, आदित्य गुप्ता, पंकज शिंदे, आकाश मेहेरकर, प्रसाद थोरात आदींची उपस्थिती होती.

