Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिर्डीचा भावी खासदार शिवसेना (ठाकरे) पक्षाचाच; मविआ आणि India आघाडीला धोका पोहोचेल असे वक्तव्य कोणी करू नये: अमर कतारी
राजकारण

शिर्डीचा भावी खासदार शिवसेना (ठाकरे) पक्षाचाच; मविआ आणि India आघाडीला धोका पोहोचेल असे वक्तव्य कोणी करू नये: अमर कतारी

आघाडीत काँग्रेसचे ज्येष्ठ व संयमी नेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रामाणिक नेतृत्वावर विश्वास
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/08/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – शिर्डी लोकसभा मतदारसंघातून सातत्याने शिवसेनेचा उमेदवार विजयी होत आला आहे. शिवसेनेचा हा पारंपारिक मतदार संघ असल्याने यावेळी देखील येथून शिवसेना उद्धव बाळासाहेब (ठाकरे) पक्षाचाच खासदार निवडून जाईल. त्यामुळे मविआ आणि India आघाडीला धोका पोहोचेल असे वक्तव्य कोणी करू नये, असे शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमर कतारी यांनी म्हटले आहे.

काँग्रेसच्या बैठकीमुळे निर्माण झाला गोंधळ: दोन दिवसांपूर्वी संगमनेरमध्ये शिर्डी लोकसभा मतदार संघाचे काँग्रेसचे निरीक्षक माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसने शिर्डी लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. तसेच गद्दार खासदारांबद्दल बोलताना शिवसेना (ठाकरे) पक्षाचीदेखील खिल्ली उडविण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर कतारी यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.

भाजपच्या राजकारणाला शह देत महाविकास आघाडी सत्तेत येणार: शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार सातत्याने विजयी झाला आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शेतकरी कामगार सामान्य नागरिक अशा सर्वांना सोबत घेत शिवसेना ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करत आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने केलेल्या विश्वासघाताच्या राजकारणामुळे जनता संतप्त आहे. शिवसेनेच्या वाईट काळात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससह मित्र पक्षांनी एकत्रित येत महाविकास आघाडी स्थापन केली. भाजपचे राज्यातील पक्ष फोडाफोडीचे राजकारण बघता येत्या निवडणुकीत ही महाविकास आघाडीच पुन्हा सत्तेत येणार आहे.

आघाडीत बिघाडीची खोड नको: भाजपाने केलेल्या कुरघोडीला उत्तर देण्यासाठी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभे राहून नागरिक मतदान करणार आहेत. मात्र आघाडी म्हणायची आणि बिघाडी करायची खोड जर कोणी करणार असेल तर केवळ ठाकरे या एकमेव ब्रँड वर देखील अधिक जागा जिंकण्याची ताकद ठाकरेंच्या शिवसैनिकांकडे आहे, असा इशारा देखील त्यांनी दिला.

बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वावर विश्वास: काँग्रेसचे ज्येष्ठ व संयमी नेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रामाणिक नेतृत्वावर आम्हाला विश्वास असून उद्धव ठाकरे व सामान्य शिवसैनिकांना त्रास होईल असा कोणताही निर्णय ते घेणार नाहीत अशी आशा आहे मात्र पक्षाने जबाबदारी दिली म्हणून कोणी काहीही बरळत राहिल्यास आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपरिषदा, महापालिका निवडणुकांमध्ये एकत्रपणे कसे लढायचे? भाजपच्या हुकुमशाही विरोधात कसे उभे राहायचे? याचा देखील विचार होणे आवश्यक आहे. त्यामुळे मविआ आणि India आघाडीला धोका पोहोचेल असे वक्तव्य कोणी करू नये.

आठवलेंचा पराभव, वाकचौरे यांना शिवप्रसाद आणि लोखंडे यांचे गाठोडे मुंबईला: याउलट एकदिलाने उभे राहून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे पक्षाचा उमेदवार निवडून देण्यासाठी प्रयत्न व्हावेत. या मतदारसंघात भाजपचे सहयोगी केंद्रीय मंत्री असलेले रामदास आठवले यांचा पराभव झाला आहे. शिवसेनेसोबत गद्दारी करणाऱ्या भाऊसाहेब वाकचौरे यांना शिवप्रसाद देत दाखवून दिलेली शिवसेना काय असते ते दाखवून दिले. आणि आता शिवसेनेच्या बळावर खासदार झालेल्या व गद्दारी केलेल्या सदाशिव लोखंडे यांना देखील या निवडणुकीनंतर आपले गाठोडे बांधून मुंबईला परतावे लागणार असल्याचे कतारी यांनी म्हटले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 475
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा…

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.