Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

July 19, 2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » स्वातंत्र्यदिनीही सुरु होता संगमनेरातील बेकायदा कत्तलखान्यात हा उद्योग… डीवायएसपींच्या पथकाला मिळाला एवढ्या लाखाचा मुद्देमाल
गुन्हेगारी

स्वातंत्र्यदिनीही सुरु होता संगमनेरातील बेकायदा कत्तलखान्यात हा उद्योग… डीवायएसपींच्या पथकाला मिळाला एवढ्या लाखाचा मुद्देमाल

वारंवार निष्पन्न होत आहेत तेच-तेच आरोपी
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरAugust 16, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – पोलीस उपअधिक्षकांच्या पथकाने स्वातंत्र्यदिनी सुरु असलेल्या कत्तलखान्यावर छापा टाकत केलेल्या कारवाईत गोवंश जनावरांच्या गोमांसासह सुमारे साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून कारवाई दरम्यान कत्तलखाना चालक आणि वाहन चालक पळून जाण्यात यशस्वी झाले. दरम्यान यातील तिघा आरोपींविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोवंश हत्या बंदी कायद्याचे उल्लंघन: संगमनेरातील बेकायदा कत्तलखान्याचा प्रश्न सरकारपर्यत जावूनही कत्तलखान्याला विरोध करणाऱ्या सरकार आणि प्रशासनाला येथील कत्तलखाने बंद करण्यात आले आहे. येथील कत्तलखाने राजरोसपणे स्वातंत्र्यदिनाच्या दिवसासह धार्मिक सणाच्यादिवशीदेखील सुरुच असतात. त्यांच्यासाठीचा प्रशासनाचा बंदी आदेश कागदावरच असतो. कोणत्याही आदेशाला आणि कारवाईला न जुमानणाऱ्या कत्तलखाना चालकांकडून बंदी असलेल्या गोवंश जनावरांच्या कत्तली खुलेआम सुरु असल्याचे वारंवार होणाऱ्या पोलीस कारवाईतून समोर येत आहे.

टीप मिळाली आणि सापडले असे काही: संगमनेरचे पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांना स्वातंत्रदिनी संगमनेरमधील मदिनानगरमधील बेकायदा कत्तलखान्यात गोवंश जनावरांची कत्तल केली जात असल्याची रात्री माहिती मिळाली होती. वाघचौरे यांनी लगेचच पोलीस कर्मचारी सारबंदे आणि डोके यांना घटनास्थळी पाठविले. रात्री साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान त्यांनी माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा टाकला असता तेथे शेख शाहीद हाफीज याच्या पत्र्याच्या शेडमध्ये तसेच तेथे उभ्या असलेल्या एमएच ०४ डीजे ८१२९ या इनोव्हा कारमध्ये मोठ्या प्रमाणात जनावरांची कत्तल केलेले गोमांस आढळून आले.

सुमारे साडेपाच लाखाचा मध्यमान ताब्यात आणि आरोपी फरार: पोलिसांनी घटनास्थळी मिळालेल्या मांसाची मोजदाद केली असता बाजारभावाने त्याची किंमत १,४०,००० रुपये असल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय चार लाख रुपये किमतीची इनोव्हा पोलिसांनी ताब्यात घेतली. विशेष म्हणजे पोलिसांचा छापा पडताच कारवाई दरम्यान नेहमीप्रमाणे आरोपी घटनास्थळावरुन पळून गेल्याची माहिती मिळाली.

यांच्या विरोधात दाखल केला गुन्हा: दरम्यान पोलीसांनी आरोपींची नावे निष्पन्न केली असून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात शेख शाहीद हाफीज (रा. मदिनानगर, संगमनेर), मुदस्सर अब्दुल एलीस हाजी कुरेशी (रा. भारतनगर, संगमनेर) व मोहमंद साहील कुरेशी या तिघांविरोधात भारतीय दंड विधान कलम २६९, ४२९ सह महाराष्ट्र पशू संरक्षण अधिनियम १९९५ चे कलम ५ (क), ५ (अ), ९ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक वाघचौरे यांच्याकडून देण्यात आली.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 718
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

कोतुळमध्ये ६ लाखांचा गुटखा व कार जप्त; पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची मोठी कारवाई

July 17, 2026

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026

संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

July 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आरोग्य

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

By अनंत पांगारकरJuly 19, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील बेफिकीर आणि ढिसाळ कारभाराचा प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतर…

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026

आज, रविवार १९ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 19, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.