Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिर्डीत गुरुवारी ‘शासन आपल्या दारी’, 30 हजारापेक्षा जास्त लाभार्थी राहणार उपस्थित; महसूल तथा पालकमंत्र्यांकडून प्रशासनाला या सूचना
प्रशासन

शिर्डीत गुरुवारी ‘शासन आपल्या दारी’, 30 हजारापेक्षा जास्त लाभार्थी राहणार उपस्थित; महसूल तथा पालकमंत्र्यांकडून प्रशासनाला या सूचना

कार्यक्रमाची जय्यत तयारी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/08/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

शिर्डी – काकडी विमानतळाजवळील मैदानावर होणाऱ्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला अखेर मुहूर्त लाभला आहे. गुरुवारी होत असलेल्या या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहे. त्यामुळे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवत जबाबदारीचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना संबंधित यंत्रणांना अहमदनगरचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या आहेत.

नियोजन पूर्व बैठक: शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी 30 हजारापेक्षा जास्त लाभार्थी उपस्थित राहणार असल्याने पालकमंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रमस्थळी मंगळवारी नियोजन बैठक झाली.

हे अधिकारी होते उपस्थित: यावेळी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवाशंकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी प्रत्यक्ष तर तालुक्यातील तहसीलदार, गटविकास दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

अशी असेल तयारी: पालकमंत्री विखे म्हणाले, कार्यक्रमाच्या दिवशी लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी एस.टी. महामंडळाच्या बसेसचे योग्य प्रकारे नियोजन करण्यात येवून प्रत्येक बसमध्ये ग्रामसेवक, मंडळ अधिकारी यांच्यावर समन्वयक म्हणून जबाबदारी सोपविण्यात यावी. जेणे करून लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी आणणे व परत घेवून जाणे सोयीचे होईल. त्याचप्रमाणे कार्यक्रमस्थळी व पार्कींगच्या ठिकाणी स्वच्छतागृहांची व्यवस्था, डॉक्टरांच्या टीम व रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात यावी. तसेच लाभार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था, कार्यक्रमस्थळी पिण्याचे पाणी याबाबतदेखील नियोजन देखील करण्यात यावे. लाभार्थ्यांच्या वाहतूक व्यवस्थेबाबत सर्व यंत्रणेमध्ये समन्वय राखण्यात यावा. लाभार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेत कुठेही असुविधा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.

योजनांची मिळणार माहिती: कार्यक्रमापूर्वी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांत शासकीय योजनांची माहिती उपस्थित नागरिकांना देण्यात येईल. यांचे नियोजन करण्यात यावे. कार्यक्रमस्थळी व लाभार्थ्यांच्या प्रत्येक बसेसमध्ये आरोग्य पथके कार्यरत ठेवण्यात यावी. कार्यक्रमस्थळी लावण्यात आलेल्या स्टॉल्सवर शासकीय योजनांची सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात यावी, असे विखे यांनी म्हटले आहे.

कार्यक्रम स्थळाची पाहणी: बैठकीनंतर पालकमंत्री विखे यांनी कार्यक्रमस्थळाची पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी कार्यक्रमासाठी तयार करण्यात येणारी मंडप व्यवस्था, विविध शासकीय कार्यालयांचे स्टॉल्स, लाभार्थ्यांच्या आसन व्यवस्था याची पाहणी केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 768
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

14/08/2026

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

12/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर विधानसभा मतदारसंघातील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेनंतर…

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.