Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026

आज, सोमवार २७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » विद्यार्थी, प्रवाशांची गैरसोय करत एसटी महामंडळाच्या बसेस सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या दिमतीला… संगमनेर बस स्थानकातून बसेसच्या अनेक फेऱ्या रद्द
प्रशासन

विद्यार्थी, प्रवाशांची गैरसोय करत एसटी महामंडळाच्या बसेस सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या दिमतीला… संगमनेर बस स्थानकातून बसेसच्या अनेक फेऱ्या रद्द

ग्रामीण भागासोबत शहरी भागातील बसेस राहणार बंद
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरAugust 16, 2023Updated:August 16, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – गुरुवारी शिर्डी मध्ये होत असलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी एसटी महामंडळाच्या संगमनेर डेपोतील तब्बल 62 एसटी बसेस या सरकारी कार्यक्रमाच्या दिमतीला देण्यात आल्या आहे. त्यामुळे या बसेसच्या फेऱ्या रद्द केल्याने गुरुवारी विद्यार्थी आणि प्रवाशांचे मोठे नुकसान होणार आहे. विद्यार्थी आणि प्रवाशांना वेठीस धरून होत असलेल्या या कार्यक्रमाबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.

16, 17 ऑगस्टला होणार गैरसोय: दरम्यान संगमनेर डेपोतून 16 ऑगस्टला अन्य ठिकाणी मुक्कामी जाणाऱ्या एसटी बसेस रद्द करण्यात आले असून 17 ऑगस्टला देखील या बसेसच्या फेऱ्या आगार प्रमुखांनी रद्द केल्याचे जाहीर केले आहे.

विद्यार्थ्यांनी शाळा महाविद्यालयात जायचे नाही का: शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी संगमनेर डेपोतील एसटी बसेस वापरल्या जाणार असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शाळा कॉलेजला जायचे नाही का? ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी प्रवास करायचा नाही का? असे प्रश्न छात्र भारती या विद्यार्थ्यांच्या संघटनेचे राज्य कार्यवाह अनिकेत घुले यांनी उपस्थित केले आहे.

एसटी ऐवजी खाजगी बसेस वापराव्या: घुले म्हणाले, गुरुवारी एसटी बसेसच्या ग्रामीण भागातील पूर्णतः आणि जिल्हा अंतर्गत व मोठ्या शहरातील बहुतांशी फेऱ्या आगारप्रमुखांनी रद्द केल्याने सरकारला या मुलांच्या शिक्षणाबद्दल गांभीर्य आहे का? एसटी बसेस बंद झाल्या तर 70 टक्के पेक्षा जास्त विद्यार्थी शाळा, महाविद्यालयात जाऊ शकणार नाही. एसटी बस बंद असेल तर मुलींचे शाळा महाविद्यालय थेट बंद होते. सरकारने शालेय मुलांचे नुकसान करून एसटी बसेस वापरण्यापेक्षा खाजगी प्रवासी गाड्यांची व्यवस्था का केली नाही.

विद्यार्थ्यांचे नुकसान नको: एसटी बसेस बंद राहणार असल्याने मुलांच्या पासचा उपयोग होणार नाही उलट त्यांना खासगी गाड्यांसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार असून विद्यार्थी प्रवाशांचे आर्थिक नुकसान देखील होणार आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान करू नये, अशी मागणी घुले यांनी केली आहे.

शासन आपल्या दारी उपक्रमासाठी मोठा खर्च…

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होणार आहे. या खर्चाचा भार काही अंशी महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर पडला आहे. तलाठी कोतवाल सर्कल यांच्याकडून देखील यासाठी पैसे गोळा केले जात असल्याची चर्चा संगमनेरमध्ये सुरू आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,012
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

पोलीस दलातील बहुचर्चित अंमलदार चौधरी यांचे निलंबन, एसपींचा मोठा निर्णय

July 15, 2026

या कारणासाठी संगमनेरच्या ‘हॉटेल रंगीला पंजाब’चा परवाना ३० दिवसांसाठी निलंबित; जिल्हाधिकाऱ्यांची कडक कारवाई

July 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

By अनंत पांगारकरJuly 27, 20260

संगमनेर: तहसील, प्रांत, दिवाणी व जिल्हा न्यायालय आणि अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात विजय…

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026

आज, सोमवार २७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची मोठी घोषणा: माजी सैनिक समितीसाठी थोरात कारखान्याची ४२ गुंठे जागा; संगमनेरमध्ये उभारणार राज्यातील सर्वात सुंदर स्वातंत्र्य सैनिक स्मारक

July 26, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.