Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमच्याशी पंगा घेऊ नका, एक दिवस तुमचा तर उरलेले दिवस आमचेच; पोलीस अधीक्षकांनी (SP) यांना दिला सज्जड इशारा
प्रशासन

आमच्याशी पंगा घेऊ नका, एक दिवस तुमचा तर उरलेले दिवस आमचेच; पोलीस अधीक्षकांनी (SP) यांना दिला सज्जड इशारा

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी घेतली बैठक
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/08/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

गणेशोत्सवात कायदा मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही. कायदा सर्वांना सारखाच आहे. त्याच पालन सर्वांनी करणे गरजेचे आहे. एक दिवस तुमचा तर उरलेले 364 दिवस आमचेच आहेत, असा सज्जड इशारा कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी साऊंड ऑपरेटर चालक-मालकांना दिला आहे.

बैठक: गणेशोत्सव महिनाभरावर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमधील गणेश मंडळ तयारीला लागले असून त्याच अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी कोल्हापूर जिल्हा पोलीस दल आणि जिल्ह्यातील साऊंड मालक-चालक, ऑपरेटर यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली यावेळी पंडित बोलत होते.

सहकार्याचे आश्वासन: यावेळी कोल्हापूर जिल्हा साऊंड ऑपरेटर असोसिएशनच्या वतीने जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्यात येईल असे सांगण्यात आले. विविध परवानगी तसेच नियम मंडळांना घालून देण्यात येत असून गणेशोत्सवाच्या आगमना दिवशी आणि विसर्जनाच्या दिवशी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांना देखील नियम घालून देण्यात आले आहे.

गेल्या वर्षी घडले असे काही: पंडित यांनी बैठकीत सर्वांना कायद्याचे महत्त्व सांगत नियमाचे उल्लंघन न करण्याचे आवाहन केले. तसेच जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या साऊंड सिस्टिमला आळा घालण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या बॉर्डरवर चेक पोस्ट उभारणार असल्याचे सांगितले. गेल्या वर्षी विसर्जना वेळी मोठ्या प्रमाणात दोन्ही प्रदूषण झाले. तसेच वेळेत पुढे न गेल्याने मिरवणूक तब्बल दोन दिवस रेंगाळली. तर लेझर लाईटमुळे अनेकांच्या डोळ्याला दुखापत झाली. मोबाईलचे कॅमेरे देखील खराब झाले. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात लेझर लाईटवर बंदी घालण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यकर्त्यांच्या दबावाला बळी पडू नका: गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचा कितीही दबाव आला तरी कायद्यानुसार 45 डेसिबलच्यावर डॉल्बी किंवा साऊंडचा आवाज जाता कामा नये. याची काळजी व्यावसायिकांनी घ्यावी, अन्यथा आमच्याकडून कारवाई अटळ आहे. आमच्याशी पंगा घेऊ नका, एक दिवस तुमचा असेल पण उरलेले 364 दिवस आमचेच आहेत. हे लक्षात ठेवा, असा इशारा त्यांनी दिला.

नियमावली: मिरवणुकीसाठी प्रत्येक मंडळाला परवानगी आवश्यक आहे. साऊंड सिस्टिम देताना मंडळाने अशी परवानगी घेतली आहे की नाही याची खात्री साऊंड सिस्टीम चालकांनी करावी. मिरवणुकीत वापरण्यात येणाऱ्या ट्रॅक्टर आणि ट्रेलर यांच्यासाठी लायसन्स आवश्यक असून लायसन्स नसल्यास चालक आणि मालक दोघांनाही प्रत्येकी पाच हजार रुपये दंड केला जाणार आहे. ट्रॅक्टर ट्रेलर वरील देखावा उभारण्यासाठीचे स्ट्रक्चर तीन मीटर पेक्षा जास्त उंचीचे नसावे 8 बाय 10 या आकारांमध्येच स्ट्रक्चर उभे केले जावे. असे देखील एसपी पंडित यांनी बैठकीत सांगितले.

हे अधिकारी होते उपस्थित: बैठकीवेळी अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, शहर उपाध्यक्ष अजित टिके, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुरव आदींसह पोलिस अधिकारी उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,240
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

14/08/2026

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

12/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर विधानसभा मतदारसंघातील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेनंतर…

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.