Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमधून जलजीवन मिशन योजनेचे पाईप चोरणारी आंतरराज्य टोळी नगरच्या गुन्हे शाखेकडून जेरबंद!
गुन्हेगारी

संगमनेरमधून जलजीवन मिशन योजनेचे पाईप चोरणारी आंतरराज्य टोळी नगरच्या गुन्हे शाखेकडून जेरबंद!

उत्तर प्रदेशात केली कारवाई; 14 आरोपी निष्पन्न
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/08/2023Updated:17/08/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

अहमदनगर – शासनाच्या जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेच्या तब्बल 43 लाख रुपयांच्या लोखंडी पाईपची चोरी करणारी आंतरराज्य टोळी उघडकीस आणण्यास अहमदनगरच्या गुन्हे शाखेला यश आले. गुन्हे शाखेच्या पथकाने उत्तर प्रदेशात जाऊन या टोळीचा छडा लावला. तसेच चोरी गेलेल्या पाइपापैकी सुमारे 35 लाख रुपये किमतीचे पाईप हस्तगत करण्यात यश मिळाले.

काय होती घटना: संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे व वीस गावांच्या जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू होते. या कामावरील 43,05,523/- रुपये किमतीचे लोखंडी पाईप कोणीतरी चोरून नेले. या संदर्भात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात लक्ष्मी सिविल इंजीनियरिंग सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, कोल्हापूर यांच्यामार्फत आर. एम. कातोरे अँड कंपनीचे साईट इंजिनिअर सचिन रेवगडे यांनी फिर्याद दिली होती.

हे आहेत आरोपी: संगमनेर पोलिसांसह नगरच्या गुन्हे शाखेचे पोलीस यासंदर्भात समांतर तपास करत होते. मुख्य आरोपी शिवकुमार नानकऊ सरोज (रा. गौरीयाबाद, गौरीगंज, उत्तर प्रदेश) याच्यासह अरशद हसन खान (राजस्थान), मोबीन जगमाल खान, अहमद उस्मान खान, खलीलमोहम्मद इसराइल खान, सुनील रामअवतार कुमार, खुर्शीद मंगल खान, मोहम्मद अरिफ जोरमल, तय्यब मंगलखान (सर्व रा. मेवात, हरियाणा), हासिम बसरू खान, अलीम करीउद्दीन खान, मोहम्मद अफजल जोरमल (तिघे रा. नूह, हरियाणा) व बबलू (पूर्ण नाव माहित नाही- फरार) अशी या गुन्ह्यातील आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून 34,76,364/- रुपये किमतीचे 367 लोखंडी पाईप हस्तगत करण्यात आले आहे.

या पथकाने केली कामगिरी: गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना या चोरीच्या प्रकरणातील मुख्य आरोपी उत्तर प्रदेशमध्ये असल्याची माहिती मिळाली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या सूचनेवरून आहेर यांच्या नेतृत्वाखालील सोपान गोरे, मनोहर गोसावी, दत्तात्रेय गव्हाणे, देवेंद्र शेलार, रवींद्र कर्डिले, सचिन आडबल, संतोष लोंढे, विजय ठोंबरे, फुरकान शेख, संतोष खैरे, अमृत आढाव, रोहित मिसाळ, किशोर शिरसाठ, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने उत्तर प्रदेशमध्ये जात या गुन्ह्याचा छडा लावला.

आरोपींनी दिली कबुली: पोलिसांनी या घटनेतील आरोपी निष्पन्न केल्यानंतर त्यांनी चोरीची व संगमनेर येथून चोरी केलेले पाईप तीन ट्रकमध्ये भरून नेले असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,947
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा…

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.