Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

28/09/2026

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भंडारदर्‍याच्या वर्षा पर्यटन महोत्सवाची आदिवासी बोहाडा नृत्याने सांगता
सामाजिक

भंडारदर्‍याच्या वर्षा पर्यटन महोत्सवाची आदिवासी बोहाडा नृत्याने सांगता

पाच दिवस सुरू होता वर्षा महोत्सव
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/08/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

भंडारदरा – भंडारदरा या निसर्गरम्य ठिकाणी गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या वर्षा पर्यटन महोत्सवाची बुधवारी आदिवासी बोहाडा नृत्याने शानदार सांगता झाली. या पाच दिवसांमध्ये पर्यटकांनी निसर्गरम्य परिसराच्या भेटी सोबतच आदिवासी पारंपारिक लोककलांचा आस्वाद घेतला. त्यामुळे हा पर्यटन महोत्सव यशस्वी झाल्याची प्रतिक्रिया पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील यांनी व्यक्त केली.

पाच दिवस सुरू होता महोत्सव: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा आणि घाटघर या अतिशय निसर्गरम्य परिसरात गेल्या पाच दिवसांपासून राज्य पर्यटन विभागाच्यावतीने वर्षा पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीच्या दोन दिवसांमध्ये स्थानिक कलावंतांच्या आदिवासी नृत्याबरोबरच बांबू पेंटिंग आणि आदिवासी वारली पेंटिंग या विषयांवरील कार्यशाळांना पर्यटकांनी उत्तम प्रतिसाद दिला.

परराज्यातील व्यावसायिकांची उपस्थिती: या पर्यटन महोत्सवाला परराज्यातील व्यावसायिक आणि प्रभावक यांनी लावलेली हजेरी ही अतिशय जमेची बाजू होती. यावेळी या व्यावसायिकांनी निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद घेतला. त्यासोबतच आदिवासी लोककला पाहून मंत्रमुग्ध झालेल्या या व्यवसायिकांनी या परिसरातील पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली, असे पर्यटन सहसंचालक सुशील पवार यांनी सांगितले.

कळसुबाईच्या ट्रेकिंगचा आनंद: पर्यटन महोत्सवाच्या चौथ्या दिवशी पर्यटकांनी कळसुबाई या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखराच्या ट्रेकचाही आनंद घेतला. अतिशय धुंद अशा पावसाळी वातावरणात या ठिकाणी करण्यात आलेला ट्रेक पर्यटकांचा आणि पर्यटन महोत्सवासाठी सहभागी झालेल्या अन्य उपस्थितांचा आनंद द्विगुणित करणारा ठरला.

बोहाडा नृत्याने सांगता: पर्यटन महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी घाटघर कोकणकडा येथे बोहाडा हे अतिशय लोकप्रिय असे आदिवासी नृत्य सादर करण्यात आले. तसेच महिला फुगडी सादर करण्यात आली. या नृत्य प्रकारांना मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या पर्यटकांनी जोरदार प्रतिसाद दिला. तर अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आर्नी सायकलिंग ग्रुप यवतमाळ तर्फे देशभक्तीपर गीतांवर आधारित डान्सला तसेच झुंबा डान्सला पर्यटकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले.

भंडारदरा शेंडी परिसरात उपक्रम: भंडारदरा शेंडी आणि घाटघर या परिसरात गेल्या पाच दिवसांपासून अनेक उपक्रम पर्यटन विभागाच्या माध्यमातून या पर्यटन महोत्सवात राबविण्यात आले स्थानिक आदिवासी बांधव तसेच पर्यटकांनी मोठ्या उत्साहाने या पर्यटन महोत्सवात सहभागी होऊन या महोत्सवाची शोभा वाढवली. या उत्साहाच्या वातावरणातच भंडारदरा वर्षा महोत्सवाची बुधवारी पर्यटन संचालनालयाचे सह संचालक पवार यांच्या उपस्थितीत सांगता करण्यात आली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 750
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026

‘संगमनेर फेस्टिव्हल’ हा संगमनेरकरांचा सांस्कृतिक मानबिंदू : मनीष मालपाणी १८ व्या संगमनेर फेस्टिव्हलचा सांगता सोहळा उत्साहात; विनोदी नाटकाने प्रेक्षकांना हसवले मनमुराद

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

By Annant Ppangarkar28/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरातील बहुचर्चित एम.डी. (M.D.) ड्रग्ज तस्करीत दररोज नवनवीन आणि धक्कादायक…

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.