Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘योगासन’ भारताने जगाला दिलेले रिटर्न गिफ्ट: आमदार सत्यजित तांबे
क्रिडा व कला

‘योगासन’ भारताने जगाला दिलेले रिटर्न गिफ्ट: आमदार सत्यजित तांबे

ध्रुव ग्लोबल स्कूल; राज्यस्तरीय योगासन अजिंक्यपद स्पर्धेचा शुभारंभ
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/08/2023Updated:18/08/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – योगासन, आयुर्वेद आणि निसर्गोपचाराला हजारों वर्षांची परंपरा आहे. ब्रिटीशांनी आपल्याला क्रिकेटचा खेळ दिला, त्याबदल्यात भारताने योगासनांच्या माध्यमातून जगाला रिटर्न गिफ्ट दिले आहे. राज्य शासनाने योगासनांचा समावेश आता शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांमध्ये केल्याने भविष्यात या खेळातून पुढे येणार्‍या विद्यार्थ्यांना मोठ्या संधी प्राप्त होतील,असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी केले.
स्पर्धा शुभारंभ: संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये चौथ्या राज्यस्तरीय योगासन अजिंक्यपद स्पर्धेचा शुभारंभ आमदार तांबे यांच्या उपस्थितीत झाला, याप्रसंगी ते बोलत होते.
यांची होती उपस्थिती: शुभारंभावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, तालुका क्रीडा अधिकारी ज्ञानेश्‍वर खुरंगे, क्रीडाधिकारी भाऊसाहेब वीर, असोसिएशनचे उपाध्यक्ष सतीष मोहगांवकर, सचिव राजेश पवार व स्पर्धा संयोजक महेश कुंभार आदी उपस्थित होते.
योगासनांच्या माध्यमातून मालपाणींचे देशभरात काम: तांबे म्हणाले, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात संगमनेरचे मोठे योगदान आहे. डॉ. संजय मालपाणी यांनी योगासनांच्या माध्यमातून देशभरात मोठे काम उभे केले असून विद्यार्थ्यांमध्ये या खेळाविषयी आकर्षण निर्माण झाले. संगमनेरच्या शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा आणि सांस्कृतिक चळवळीला मालपाणी परिवाराने नेहमीच पाठबळ देण्याचे काम केले आहे. त्यातून घडलेले विद्यार्थी, कलाकार आणि खेळाडूंनी संगमनेरचे नाव देशाच्या पटलावर पोहोचवले आहे.
दायित्व: जे जे चांगले आणि उत्तम आहे ते देण्याचा प्रयत्न, त्यासाठी विविध स्पर्धा भरवणं, त्याला अधिष्ठान प्राप्त करुन देण्यासाठी संघटना चालवणं अतिशय कठीण काम आहे. मात्र मालपाणी परिवाराने आपले सामाजिक दायित्त्व पूर्ण करताना अशा वेगवेगळ्या उपक्रमातून समाजाला सतत काहीतरी देण्याचा प्रयत्न केल्याचे गौरोद्गारही आमदार तांबे यांनी काढले.
योगा खेळाडूंना उज्वल भविष्य: जिल्हा क्रीडाधिकारी श्रीमती बिले यांनी गेल्या तीन वर्षांपासून योगासनांमध्ये महाराष्ट्राने केलेल्या कामगिरीचा उल्लेख करीत आनंद व्यक्त केला. खेळात नैपूण्य प्राप्त केल्याने विविध संधी प्राप्त होत असल्याकडेही त्यांनी उपस्थित स्पर्धकांचे लक्ष वेधले. पूर्वी शासनाकडून खेळाडूंना फारशा सुविधा उपलब्ध नसल्याचे सांगतांना आज मात्र परिस्थिती बदलल्याने खेळाडूंचे भविष्य उज्ज्वल असल्याचे त्यांनी सांगितले.
आढावा: प्रास्तविकात डॉ. संजय मालपाणी यांनी योगासनांना खेळाचा दर्जा प्राप्त झाल्यापासूनचा धावता आलेख मांडला. गेल्या तीन वर्षात झालेल्या तालुका स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंतच्या नऊ स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंची यशोगाथा विशद करतांना राज्यातील शाळांमधून निवडलेले प्रतिभावंत खेळाडू, त्यांना मिळालेले प्रशिक्षण आणि प्रत्येक स्पर्धेत पंचांनी निरपेक्ष भावनेतून घेतलेले निर्णय यामुळे योगासनांमध्ये महाराष्ट्राचा दबदबा निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
शपथ: खेलो इंडिया स्पर्धेत दोन सुवर्ण पदके मिळवणार्‍या योगपटू स्वरा गुजरने सर्व स्पर्धकांना शपथ दिली. यावेळी अक्षय बाहेती याने ध्येयगीत प्रस्तृत केले. या स्पर्धेतील सर्वात लहान वयाच्या अंश मयेकर (अहमदनगर) व रोहन तायडे (मुंबई) या दोघा योगासन खेळाडूंनी अतिशय अवघड आणि चित्तथरारक अशा योगासन प्रकारांचे प्रात्यक्षिक सादर केले. नीतिन सूर्यवंशी व सुचिता ठाकूर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर महेश कुंभार यांनी आभार मानले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 500
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जयहिंद कला महोत्सव: १२ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

08/09/2026

संगमनेरात बालकला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; बालगोपाळांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ!

07/09/2026

संगमनेरात जयहिंद लोकचळवळीच्या वतीने उद्या आणि परवा बालकला महोत्सवाचे आयोजन; विविध उपक्रमांसह रंगभरण स्पर्धेची पर्वणी

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

By Annant Ppangarkar12/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – समृद्धी महामार्गावर गाडी दुरुस्त करणाऱ्या मॅकेनिकला चाकूचा धाक दाखवून मारहाण…

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

आज शनिवार १२ सप्टेंबर रोजीचे राशी भविष्य

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.