Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरचे दूध उत्पादक शेतकरीही आता स्मार्ट; राजहंस दूध संघाची योजना नांदुरी दुमाला येथील कार्यक्रमात कार्ड वाटप
शेती व सहकार

संगमनेरचे दूध उत्पादक शेतकरीही आता स्मार्ट; राजहंस दूध संघाची योजना नांदुरी दुमाला येथील कार्यक्रमात कार्ड वाटप

शेतकरी हिताचे निर्णय घेणारा दूध संघ
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/08/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आता स्मार्ट कार्डच्या माध्यमातून एक पाऊल पुढे टाकले आहे. या कार्डच्या माध्यमातून त्याचे वर्षभराचे दुधाचे प्रगती पुस्तक समोर असेल. याशिवाय अन्य माहिती त्याला उपलब्ध होणार आहे.
देशमुख यांच्या हस्ते कार्ड वितरण: राजहंस दूध उत्पादक प्रक्रिया संघाच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्मार्ट कार्ड योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेचा शुभारंभ संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला येथे करण्यात आला असून येथील कृषीकन्या सहकारी दूध संस्थेच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना संगमनेर तालूका सहकारी दुध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
शेतकऱ्यांचे हित जोपासले: देशमुख म्हणाले, कॉंग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून राजहंस दुध संघाने कायम शेतकऱ्यांचे हित जोपासले. दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी विविध योजना दूध संघाच्या माध्यमातून राबविण्यात येतात. आता स्मार्ट कार्डची योजना शेतकऱ्यांसाठी राबवत आहे. या स्मार्ट कार्डमध्ये शेतकऱ्याची संपूर्ण माहिती, वर्षभराची दुधाची उलाढाल, आर्थिक उलाढाल, व्यवहारांची व दुधाचा दर याची माहिती स्मार्ट कार्डमध्ये समाविष्ट असणार आहे.
या माहितीचा समावेश: शेतकरी कोणत्या दुध संस्थेचा आहे, दूध संघाचा सदस्य आहे ही शेतकऱ्याची ओळख निर्माण होणार आहे. तसेच पशुवैद्यकीय सेवा माहिती समाविष्ट होणार आहे. यात गाईंचे औषधोपचार याबाबत सर्व काही माहितीचा समावेश असणार आहे. औषध उपचारासाठी औषधे दूध उत्पादक, सभासद शेतकऱ्यांना पाच टक्के सवलतीच्या दरात मिळणार आहे. संघाचे अधिकृत उपपदार्थ पाच टक्के सवलतीमध्ये मिळणार आहे. हे कार्ड फक्त दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी असणार आहे. पशुखाद्य सवलतीच्या दरात या कार्डवर मिळणार आहे. त्यामध्ये एक लाखाचे विमा कवच मिळणार आहे. भविष्यात अनेक योजनांचा लाभ कार्डवर मिळणार आहे.
उपस्थिती: जेष्ठ नेते पांडूरंग घूले, साहेबराव कवडे, रमेश गुंजाळ, विलास वर्पे, संतोष मांडेकर, भास्करराव सिनारे, तुकाराम दातीर, संजय पोकळे, प्रमोद पावसे, गोरक्षनाथ नवले, कार्यकारी संचालक डॉ. खिलारी, तान्हाजी नेहे, बाळासाहेब शेटे, लक्ष्मण शेळके, भाऊसाहेब नेहे, तुकाराम कवडे, निवृत्ती शेटे, भास्कर गोपाळे, मनिष गोपाळे, सतिष खताळ, ॲड. मिनानाथ शेळके, सरपंच अर्चनाताई शेळके, उपसरपंच सोमनाथ पथवे, सोन्याबापू नेहे, बादशहा कवडे, सिताराम शेटे, मारूती कवडे, दशरथ कदम तसेच कृषीकन्या सह दूध संस्थेचे सर्व संचालक,दुध उत्पादक युवक, महिला, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दुध संघाचे संचालक विलास कवडे यांनी केले. सिताराम शेटे यांनी आभार मानले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 704
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

18/07/2026

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

15/07/2026

सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना: ३१ जुलैपर्यंत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

13/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- कमी पावसामुळे संकटात सापडलेली खरीप पिके आणि आगामी गणेशोत्सवाची…

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.