महाराष्ट्र संवाद न्यूज
बुलढाणा – आता आमचं दुकान चांगलं सुरू आहे. सध्या आमच्या दुकानात गिऱ्हाईकांची कमी नाही. मात्र खरे जुने गिऱ्हाईक दिसेना. भारतीय जनता पक्ष बाबतचा केंद्रीय मंत्री भाजप नेते नितीन गडकरी यांचे हे विधान चांगलंच चर्चेत आल आहे.
बदलत्या परिस्थितीवर भाष्य: गडकरी शुक्रवारी बुलढाणा येथे बोलत होते. त्यांनी भाजपच्या आजच्या बदलत्या परिस्थितीवर भाष्य करत चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, दुकान चालायला लागत तेव्हा दुकानात गिऱ्हाईकांची कमी नसते. मात्र या गदारोळात खरं जुन गिऱ्हाईक दिसत नाही.
माझ्यासारख्या लोकांनी कायम हे लक्षात ठेवलं पाहिजे की, “आज आम्ही जरी शिखरावर असलो, तरी सर्व जुन्या कार्यकर्त्यांनी स्वतःला गाडून घेतल नसतं, तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शिखरावर जाण्याची संधी कधीच मिळाली नसती. आज आम्ही जे काही आहोत ते त्यांच्यामुळेच आहोत.”
आजचा दिवस आम्हाला पाहायला मिळाला तो केवळ आमच्या कर्तृत्वामुळे नाही. असंख्य लाखो कार्यकर्त्यांनी प्रवाहाच्या विरोधात, सत्तेच्या विरोधात आणीबाणीत दोन-दोन वर्ष तुरुंगवास सहन केला. अनेक संकट सहन केली, अनेक आंदोलन केली. लाठ्या खाल्ल्या. या अनेक लोकांच्या तपश्चर्येतून, बलिदानातून आम्ही आज सत्तेत पोहोचलो आहोत. असेही नितीन गडकर्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
भारतीय जनता पार्टी बद्दल गडकरी यांनी केलेले हे विधान राजकीय वर्तुळात चांगलच चर्चेत आल आहे.

