Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026

आज, रविवार १९ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शरद पवार देशातील उत्तुंग नेते असतानाही त्यांना एक हाती सत्ता… मंत्री दिलीप वळसे पाटील तुम्हीही शरद पवार यांच्या आसपासचे नेते होता मग… रोहित पवार
राजकारण

शरद पवार देशातील उत्तुंग नेते असतानाही त्यांना एक हाती सत्ता… मंत्री दिलीप वळसे पाटील तुम्हीही शरद पवार यांच्या आसपासचे नेते होता मग… रोहित पवार

तर राजकारणात पंचायत होऊ शकते... असं का म्हणाले वळसे पाटील
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरAugust 21, 2023Updated:August 21, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

पुणे – आपण शरद पवार हे उत्तुंग नेते आहेत म्हणतो. त्यांच्या आसपास फिरकणारा नेताही देशात नाही म्हणतो. पण मायावती, ममता बॅनर्जी मुख्यमंत्री होतात. त्यांच्या राज्यात एकहाती सत्ता आणतात. पण शरद पवार उत्तुंग नेते असूनही त्यांना राज्यात एकहाती सत्ता आणता आली नाही, असा थेट हल्लाच मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पवारांवर चढवला आहे.

स्वतःच्या ताकतीवर मुख्यमंत्री: वळसे पाटील मंचर येथील एका कार्यक्रमात बोलत होते. शरद पवार यांच्या उंचीचा नेता देशामध्ये नाही असं आपण म्हणतो. परंतु महाराष्ट्रामध्ये त्यांना एकट्याच्या ताकतीवर आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रातील जनतेने एकदाही बहुमत दिले नाही. एकदाही स्वतःच्या ताकतीवर मुख्यमंत्री केलं नाही.

भाजप सोबत का: एकीकडे ममता बॅनर्जी, मायावती या मुख्यमंत्री होतात. अनेक राज्यात प्रादेशिक पक्ष पुढे जात आहेत. आणि आपले नेते उतुंग नेते असताना आमचे 60 ते 70 आमदार निवडून येतात आणि कोणासोबत तरी आघाडी करावी लागते. त्यामुळेच आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचा खुलासा दिलीप वळसे पाटील यांनी केला.

तर राजकारणात पंचायत: आपण भाजप सोबत गेलेलो नाही तर आपला पक्ष राष्ट्रवादी काँगेस हाच असून आपण अजूनही राष्ट्रवादी काँगेसमध्येच आहोत. चिन्ह कोणाला मिळेल, नाव कोणाला मिळेल याबाबत निवडणूक आयोग निर्णय देईल. त्यांचा निर्णय आल्यानंतर राज्याच्या राजकारणात एक पंचायत होऊ शकते, असं सूचक विधानही वळसे पाटील यांनी केलं.

आश्चर्य: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं बोट धरून राजकारणात आलेल्या राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनीच शरद पवार यांच्या राजकारणाची चिरफाड केली. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

लोक विचारतील तेव्हा तुमच्याकडे: दरम्यान वळसे पाटील यांच्या या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील चांगला समाचार घेतला आहे. ते म्हणाले, मला आश्चर्य वाटतंय. तुम्हीही शरद पवार यांच्या आसपासचे नेते होता, तुम्ही का नाही जबाबदारी पार पाडली असं लोक म्हणतील तेव्हा वळसे पाटील यांच्याकडे काय उत्तर असेल असा सवाल रोहित पवार यांनी केला.

ते सुद्धा जबाबदार: ज्यांना पवार साहेबांनी उभं केलं. आता अशा काळात पवार साहेबांच्या सोबत तीच लोकं नसतील आणि पवार साहेबांचे ज्यांनी विचारही सोडले आहेत त्यांना पवारांवर बोलण्याचा अधिकार काय आहे? जर राष्ट्रवादीचा स्वबळावर मुख्यमंत्री बनला नसेल, तर त्याला काही अंशी ते सुद्धा जबाबदार आहेत असं मला वाटतं, असं रोहित पवार म्हणाले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 506
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

राम मंदिरातील लूटमारीनंतर भाजपच्या राज्यात शैक्षणिक घोटाळा… नसलेल्या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांना पदव्या

July 14, 2026

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संगमनेर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर; अमर कतारी यांच्याकडे तालुकाप्रमुखपदाची धुरा, नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये यांचा समावेश

July 14, 2026

‘दुर्गाताई, आता आत्मपरीक्षणाची गरज; लाभार्थ्यांना बाजूला करा!, ताईंवर चिखलफेक होत असताना काँग्रेसचे २८ नगरसेवक गप्प का? – शिवसेनेचे अमर कतारी यांचा महाविकास आघाडीला घरचा आहेर

July 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पत्रकारिता

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

By अनंत पांगारकरJuly 19, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मोहसीन शेख | संगमनेर अतिक्रमण निर्मूलनाच्या नावाखाली प्रशासनाने हातावर पोट असणाऱ्या…

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026

आज, रविवार १९ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 19, 2026

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

July 18, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.