Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

28/09/2026

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राज्यस्तरीय योगासन स्पर्धा : अहमदनगर संघाला अजिंक्यपद नागपूर दुसऱ्या तर मुंबई तिसऱ्या स्थानी
क्रिडा व कला

राज्यस्तरीय योगासन स्पर्धा : अहमदनगर संघाला अजिंक्यपद नागपूर दुसऱ्या तर मुंबई तिसऱ्या स्थानी

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/08/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या क्रीडा संकुलामध्ये सुरू असलेल्या चौथ्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत अहमदनगरच्या संघाला अजिंक्यपद मिळाले. सब ज्युनिअर आणि ज्युनियर वयोगटातील चार प्रकारात झालेल्या या स्पर्धेत अहमदनगर संघातील योगा खेळाडूंनी अवघड श्रेणीतील योगासनांच्या सादरीकरणातून परीक्षकांना अचंबित करत तब्बल 12 सुवर्णपदकांसह 21 पदकांची कमाई केली.

याशिवाय एक सुवर्ण आणि पाच रौप्य पदकांसह दहा पदके मिळविणाऱ्या नागपूर संघाने दुसरे तर दोन सुवर्णपदकांसह सहा पदके मिळवणाऱ्या मुंबई संघाने या स्पर्धेत तिसरे स्थान मिळविले आहे.

महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनने संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूल मध्ये या स्पर्धांचे आयोजन केले होते.

पारंपारिक योगासनांच्या सब ज्युनिअर गटात नगरच्या तृप्ती डोंगरे व मुलांच्या गटात मुंबईच्या रोहन तायडेने सुवर्णपदक मिळविले. वैदेही मयेकर व अंश मयेकर या नगर संघातील भावंडांनी दोन्ही गटातील रौप्य पदक तर याच प्रकारात मुलींच्या गटात नागपूरच्या तेजस्विनी खिंची व अहमदनगरच्या आर्यन खरात यांनी कांस्यपदकांची कमाई केली.

ज्युनिअर गटात अहमदनगरच्या युगांका राजम व सुमील बंडाळे यांनी सुवर्ण, तनवी रेड्डीने व नागपूरच्या तेजस सावरकरने रौप्य, आणि सुहानी गिरीपुंजे व पुण्याच्या अरविंद साबवत यांनी कांस्यपदके मिळविली.

कलात्मक एकेरी प्रकारात ज्युनिअर गटात अहमदनगरच्या रुद्राक्षी भावे व प्रणव साहु यांच्यासह सबज्युनिअर गटातील प्रांजल व्हन्ना यांनी सुवर्ण पदकांवर नाव कोरले. मुलांच्या सबज्युनिअर गटात मुंबईच्या रोहन तायडेने बाजी मारली. ज्युनिअर गटातील दोन्ही रौप्य पदके नगरच्या स्वरा गुजर व रुपेश सांगे यांनी तर, सबज्युनिअर गटात नागपूरच्या तेजस्वीनी खिंची व मुंबईच्या स्वराज फिसके यांनी पटकाविली. याच गटात कोल्हापूरच्या श्रिया खोंडरे व पुण्याच्या अरविंद साबवत यांनी तर, सबज्युनिअर गटात अहमदनगरच्या निरल वाडेकर व अंश मयेकर यांनी कांस्य पदके मिळवली.

कलात्मक दुहेरी प्रकारात सबज्युनिअर गटात अहमदनगरच्या वैदेही मयेकर व निरल वाडेकर आणि तन्मय म्हाळसकर व आर्यन खरात यांनी सुवर्ण कामगिरी केली. ज्युनिअर गटातील मुलांमध्ये अहमदनगरच्या संघाचेच वर्चस्व राहीले. प्रणव साहु व यश लगड यांनी सुवर्ण पटकावले मात्र मुलींच्या गटात कोल्हापूरच्या सेजल सुतार व श्रिया खोंडरे या जोडीने निकराची झुंज देत पहिला क्रमांक खेचून घेतला. नगरच्या तन्वी पवार व रुद्रांक्षी भावे आणि नागपूरच्या तेजस सावरकर व तन्मय सलोकर यांना रौप्य तर, नागपूरच्याच श्रावणी गोलाईत व रचना अंबुलकर आणि मुंबईच्या यश कारगुटकर व राहुल कोणे यांनी कांस्य पदकं मिळवले.

याच प्रकारातील सबज्युनिअर गटात नागपूरच्या निसर्गा भगत व आर्या इंगळे, मुंबईच्या स्वराज फिसके व कृष्णा गुप्ता या जोडीने रौप्य, फिनत मोमीन व स्वराध्या एरंडोले आणि कोल्हापूरच्या जयवर्धन खोत व नैतिक पाटील यां जोडीने कांस्य पदकं मिळवले. तालात्मक योगासनांच्या दुहेरी प्रकारातील ज्युनिअर गटात युगांका राजम् व स्वरा गुजर आणि पीत बोरकर व निबोध पाटील यांनी अहमदनगर संघाला सुवर्ण पदके मिळवून दिली. नागपूरच्या सुहानी गिरीपूंजे व रचना अंबुलकर आणि सोलापूरच्या ऋषीकेश पेड्डूल्लू व ऋषीकेश पुत्था यांनी रौप्य, सोलापूरच्याच जानवी चंदनशिवे व प्रणाली शिंदे आणि नाशिकच्या रोहित कदम व पवन अहिरे यांच्या जोडीने कांस्य पदकांची कमाई केली.

सबज्युनिअर गटातही अहमदनगरच्या मुलींनी बाजी मारतांना तृप्ती डोंगरे व देवांशी वाकळे या जोडीने सुवर्ण पदकं मिळवले. मुलांमध्ये नागपूरच्या यज्ञेश वानखेडे व खूश इंगोले या जोडीने सुवर्ण, मुंबईच्या आर्या साप्ते व रुर्ग्वेदा मूळगांवकर आणि कोल्हापूरच्या ओम जगताप व धनंजय हिरेमठ यांनी रौप्य, नागपूरच्या निधी हडके व पूर्वा मानकर आणि रत्नागिरीच्या श्‍लोक दळवी व श्री दळवी या भावंडांच्या जोडीने कांस्य पदके मिळवले. या संपूर्ण स्पर्धेत बारा सुवर्ण, सहा रौप्य व तीन कांस्य पदकांसह 21 पदकांची कमाई करणार्‍या अहमदनगरच्या योगासन संघाला अजिंक्यपद देण्यात आले.

माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, उद्योजक मनीष मालपाणी, असोसिएशनचे उपाध्यक्ष सतीष मोहगांवकर, सचिव राजेश पवार, प्राचार्या अर्चना घोरपडे व स्पर्धा संयोजक महेश कुंभार आदींच्या उपस्थितीत विजेत्या स्पर्धकांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 405
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जयहिंद कला महोत्सव: १२ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

08/09/2026

संगमनेरात बालकला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; बालगोपाळांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ!

07/09/2026

संगमनेरात जयहिंद लोकचळवळीच्या वतीने उद्या आणि परवा बालकला महोत्सवाचे आयोजन; विविध उपक्रमांसह रंगभरण स्पर्धेची पर्वणी

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

By Annant Ppangarkar28/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरातील बहुचर्चित एम.डी. (M.D.) ड्रग्ज तस्करीत दररोज नवनवीन आणि धक्कादायक…

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.