Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पशुधनाच्या शंभर टक्के लसीकरणासाठी मंत्री विखे पाटलांचा यंत्रणांना अल्टिमेटम
आरोग्य

पशुधनाच्या शंभर टक्के लसीकरणासाठी मंत्री विखे पाटलांचा यंत्रणांना अल्टिमेटम

सचिव तुकाराम मुंढे यांच्या उपस्थितीत बैठक
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/08/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सर्व पशुधनाचे लसीकरण सात दिवसात पूर्ण करा

राज्यातील लम्पी उपाय योजनांचा मंत्र्यांकडून आढावा

महाराष्ट्र संवाद न्यूज

अहमदनगर – राज्यातील गोवंशीय पशुधनामध्ये विषाणूजन्य व संसर्गजन्य लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. या रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात ७३ टक्के लम्पी चर्मरोग प्रतिबंधात्मक लसीकरण झाले असून, उर्वरित लसीकरण येत्या ७ दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.

आढावा मंत्री:  विखे पाटील यांनी राज्यातील लम्पी चर्मरोगाविषयी दूरदृष्य प्रणालीव्दारे आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंडे उपस्थित होते. दुरदृष्य प्रणालीव्दारे आयुक्त डॉ. हेमंत वसेकर यांच्यासह सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित होते.

नियोजनाच्या सूचना: लसीकरण करून घेण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली असल्याचे सांगत विखे पाटील म्हणाले, राज्यात १ कोटी ४१ लाख गोवर्गीय पशुधन आहे. आतापर्यंत ७३ टक्के गोवर्गीय पशुधनाचे गोट पाॅक्स लसीकरण झाले. (१.०२ कोटी) उर्वरीत लसीकरण एक आठवड्यात पूर्ण करणेसाठी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी बैठकीत दिल्या.

अशी आहे स्थिती: राज्यात मार्च २०२३ ते २० आँगस्ट २०२३ पर्यंत एकूण ३२ हजार ७० पशुधन लंम्पी बाधित आहे. त्यापैकी २० हजार ८९८ बरे झाले असून सक्रिय रुग्ण ८ हजार ६२३, मृत पशुधन २ हजार ७७५ सक्रिय पशुरुग्ण असणारे जिल्हे २५, सन २०२३-२४ मध्ये १.४१ कोटी लस उपलब्ध असल्याचे त्यांनी बैठकी दरम्यान सांगितले.

उपाय योजना: ग्रामपंचायत व नगर पंचायत यांचे कडील यंत्रणेच्या मदतीने बाह्य कीटक नियंत्रणासाठी (Vector Control) उपाययोजना तातडीने व नियमितपणे राबविण्याच्या आवश्यकता आहे. यासाठी परिसरामध्ये वेळोवेळी फवारणी व स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

काय काळजी घ्यावी: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने सदर रोगाबाबत पशुपालकामध्ये जागरुकता निर्माण करणे आवश्यक असून, ज्यामध्ये रोगाची माहिती त्वरित देणे, बाधित जनावरांचे विलगीकरण, गोठ्यांची व परिसराची स्वच्छता इत्यादी बाबत पशुपालकांना ग्रामसभांच्या माध्यमातून माहिती देण्याबाबत गांभीर्याने निर्णय करण्याचे आदेश त्यांनी दिले. रोगाने मृत्युमुखी पडणाऱ्या पशुधनाची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने करणेसाठी ग्रामपंचायत यंत्रणेचा सहभाग घ्यावा. केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे उपचार, विलगीकरण, प्रतिबंधात्मक उपाय योजना व मृत पशुधनाची विल्हेवाट ईत्यादीबाबत काटेकोर पालन करतानाच, सन २०२३-२४ मध्ये सदर आजाराने मृत पावलेल्या पशुधनाच्या मालकांना नुकसान भरपाई देणेबाबत जिल्हास्तरीय समिती कडून पात्र प्रस्तावाना मान्यता देणेबाबतची कार्यवाही तात्काळ करावी.

निर्देश: आंतरराज्य आंतरजिल्हा बाधित जनावरांच्या वाहतूकीच्या अनुषंगाने या गोवर्गीय पशुंचे २८ दिवसापूर्वी लसीकरण झालेले नाही, अशा पशुधनाच्या वाहतूकीस प्रतिबंध करण्यासंबंधीचे तसेच आवश्यकतेनुसार बाजार भरविण्यासंदर्भात प्रतिबंध करण्यासंबंधीचे निर्देश सर्व जिल्हाधिका-यांना दिले असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 489
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

19/07/2026

मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; आगामी दौरे आणि कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलले

04/07/2026

केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे बदापूर येथील शेती धोक्यात; विहिरींचे पाणी दूषित, तलावातील मासे मृत

11/06/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

By Annant Ppangarkar10/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेशी जोडलेल्या तरुणांशी थेट संवाद साधण्याच्या आणि त्यांच्या आशा-आकांक्षा…

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.