Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेत ‘एक विद्यार्थी, एक बेंच’ उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद; आठवडाभरात ६८ हजारांच्या लोकसहभागातून ४० बेंचचे लोकार्पण

08/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सोशल मीडिया वरून दोन समाजात तेढ निर्माण करणारी अफवा पसरविणाऱ्या विरुद्ध शहर पोलिसांनी…
गुन्हेगारी

सोशल मीडिया वरून दोन समाजात तेढ निर्माण करणारी अफवा पसरविणाऱ्या विरुद्ध शहर पोलिसांनी…

प्रशासनाने दाखवली होती सतर्कता
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/08/2023Updated:22/08/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – समाज माध्यमातून चुकीचा मेसेज व्हायरल करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणारी अफवा पसरविल्याचा कारणावरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल: अभिषेक पांडुरंग जोर्वेकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या संदर्भात पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात भादवी कलम 505 (2) अन्वये मंगळवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय होता नेमका प्रकार: रविवारी सायंकाळी शहरातील जोर्वेनाका भागात एका हायमॅक्सच्या खांबावर पाकिस्तानचा ध्वज फडकविल्याचे मेसेज समाज माध्यमातून व्हायरल झाल्याने दोन समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. हा व्हायरल मेसेज अनेकांच्या मोबाईलवर आल्याने कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली होती.

हे अधिकारी पोहोचले घटनास्थळी: दरम्यान या प्रकाराची माहिती मिळताच संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. यामुळे देखील वातावरण बिघडण्याची चिन्हे निर्माण झाली होती.

प्रशासनाने ताब्यात घेतला झेंडा: पोलिसांनी या संदर्भात घटनास्थळी जात खात्री केली असता सदरचा झेंडा हा पाकिस्तानचा नसून इस्लाम धर्माचा असल्याचे तसेच त्याच्यावर चांद तारा असल्याचे दिसून आले. पोलीस प्रशासनाने नगरपालिकेच्या मदतीने हा झेंडादेखील काढून ताब्यात घेतला. पोलिसांनी वेळीच दखल घेतल्याने मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी पोलीस निरीक्षक मथुरे यांनी समाज माध्यमातून या संदर्भात वस्तुस्थितीदर्शक मेसेज प्रसारित करत अफवा पसरविणाऱ्या विरोधात कारवाईचा इशारा दिला होता.

गुन्हा दाखल: दरम्यान व्हायरल झालेल्या मेसेज संदर्भात पोलिसांनी खात्री केली असता जोर्वेनाका येथे पाकिस्तानचा झेंडा लागला या आशयाचा अनेकांपर्यंत पोहोचलेला हा मेसेज हिंदू प्रतिष्ठान, जोर्वे या व्हाट्सअप ग्रुपवर अभिषेक पांडुरंग जोर्वेकर या इसमाने कोणतीही शहानिशा न करता खोटा संदेश प्रसारित केल्याचे समोर आल्याने या संदर्भात शहर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,022
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026

कोपरगाव आणि संगमनेरमधील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस; दोन सराईत चोरट्यांकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, अहिल्यानगर एलसीबीची कामगिरी

08/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

By Annant Ppangarkar08/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शहरातील महिलांची सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने संगमनेर नगर…

शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेत ‘एक विद्यार्थी, एक बेंच’ उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद; आठवडाभरात ६८ हजारांच्या लोकसहभागातून ४० बेंचचे लोकार्पण

08/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026

कोपरगाव आणि संगमनेरमधील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस; दोन सराईत चोरट्यांकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, अहिल्यानगर एलसीबीची कामगिरी

08/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.