Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमधील भेसळखोरांना कोणाचे अभय? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतरही संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन सुस्तच! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा प्रशासनाला सवाल; आंदोलनाचा इशारा

June 9, 2026

यशोधन कार्यालयात ‘एसटी स्मार्ट कार्ड’ सुविधेचा शुभारंभ; ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात मिळणार मोठी सवलत

June 9, 2026

…अन् थेट कोर्टातच झाली घोषणाबाजी!संगमनेरमधील ‘त्या’ प्रकाराने खळबळ, २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

June 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » योगसोपान उपक्रमात २५ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग… विद्यार्थ्यांना योगासनांमधून करिअरची संधी: डॉ. संजय मालपाणी
क्रिडा व कला

योगसोपान उपक्रमात २५ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग… विद्यार्थ्यांना योगासनांमधून करिअरची संधी: डॉ. संजय मालपाणी

योगाला खेळाचा दर्जा
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरAugust 24, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – जगातील सर्वच क्षेत्रात आज स्पर्धा वाढली आहे, अशावेळी शिक्षणक्षेत्रही त्याला अपवाद राहिलेले नाही. धावपळीच्या जीवनात जगताना शरीरस्वास्थाकडेही तितक्याच गांभीर्याने पाहण्याची गरज असते. विद्यार्थ्यांनी तर लहान वयापासूनच योगासनांची सवय लावली पाहिजे. कारण आपण बुद्धीने कितीही तेज असलो तरीही आपले स्वास्थ उत्तम नसेल तर आपल्यातली पूर्ण क्षमता आपण सिद्ध करु शकत नाही. आता तर केंद्र सरकारने योगासनांचे महत्व लक्षात घेवून त्याला खेळाचा दर्जा दिल्याने विद्यार्थ्यांना त्यातूनही करिअर करण्याची संधी मिळाल्याचे प्रतिपादन गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी केले.

योग सोपान उपक्रमाचा संकल्पपूर्ती सोहळा: गीता परिवार व अखिल भारतीय माहेश्‍वरी महिला संघटनच्या संस्कार सिद्धा समितीने राबविलेल्या ‘योगसोपान’ उपक्रमाच्या संकल्पपूर्ती सोहळ्यात ते बोलत होते. या उपक्रमासाठी सहाय्य करणारे पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड, सुवर्णा फटांगरे, संगमनेर मर्चन्ट्स बँकेचे चेअरमन संतोष करवा, आनंदऋषी पतसंस्थेचे चेअरमन राजकुमार गांधी, शारदा पतसंस्थेचे चेअरमन राजेश लाहोटी, संस्कार सिद्धा समितीच्या अनुराधा मालपाणी आदी उपस्थित होते.

2 हजार उपक्रम: योगासनांचा प्रचार-प्रसार व्हावा व विद्यार्थ्यांना त्याची गोडी लागावी यासाठी बालसंस्कार व योग क्षेत्रात कार्यरत असलेल्या गीता परिवाराने अखिल भारतीय माहेश्‍वरी महिला संघटनच्या संस्कार सिद्धा समितीच्या सहकार्याने देशभरातील दोन हजार शाळांमध्ये योगसोपान उपक्रमाचेे आयोजन करण्याचा संकल्प केला होता. त्यासाठी गेल्या जूनमध्ये शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबिरांचेही आयोजन करण्यात आले होते.

पाचशे शिक्षकांना प्रशिक्षण: तालुक्यातील पाचशेहून अधिक शिक्षकांना त्याद्वारे प्रशिक्षण दिले गेले. प्रशिक्षित शिक्षकांनी त्यानंतरच्या पुढील दोन महिन्याच्या कालावधीत सलग 21 दिवस ती आसने विद्यार्थ्यांना शिकवावी असे या उपक्रमाचे स्वरुप होते. स्वातंत्र्यदिनी यासर्व शाळांमधून संगीतमय योगासनांची प्रात्यक्षिके करण्यात आली.

25 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग: संगमनेर तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील तीनशे शाळांमधील 25 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. त्यातील निवडक सातशे विद्यार्थी आणि तिनशे शिक्षकांच्या उपस्थितीत मालपाणी लॉन्स येथे योगसोपानचा संकल्पपूर्ती सोहळा रंगला होता. यावेळी योग सोपानमधील पहिल्या स्तराच्या सोळा आसनांचे संगीतमय प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले.

यांनी घेतली मेहनत: या उपक्रमात सहभागी विद्यार्थी, शिक्षक व शाळांना प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले. देशभरात राबविण्यात आलेल्या या उपक्रमाच्या समन्वयकाची भूमिका दत्ता भांदुर्गे यांनी पार पाडली. योगशिक्षक प्रवीण पाठक, वैष्णव कोरडे व दीपांशु सोलंकी यांनी शाळांशी समन्वय साधला. श्रीकांत कासट, अभिजीत गाडेकर, प्रमोद मेहेत्रे, वैभव कुलकर्णी, भोलेश्‍वर गिरी, अंकित वाघमारे, अनिरुद्ध रहाणे यांनी परिश्रम घेतले. गीता परिवाराचे संगमनेर शाखाध्यक्ष संजय कर्पे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 468
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

पंतप्रधानांच्या ‘व्हिजन टू आर्ट’ स्पर्धेत संगमनेरच्या आनंद गायकवाड यांचे यश; ७५ उत्कृष्ट कलाकारांमध्ये निवड

April 22, 2026

संगमनेरात ‘बोलक्या बाहुल्यां’ना बालचमूंचा प्रतिसाद; डिसेंबरमध्ये रंगणार राज्यस्तरीय बालकुमार साहित्य संमेलन

March 29, 2026

महिलांच्या कर्तृत्वाला एकविरा फाउंडेशनचे मोठे व्यासपीठ: थोरात ४४२५ खेळाडूंच्या सहभागाने क्रीडा महोत्सवाचा दिमाखदार शुभारंभ

March 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

संगमनेरमधील भेसळखोरांना कोणाचे अभय? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतरही संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन सुस्तच! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा प्रशासनाला सवाल; आंदोलनाचा इशारा

By अनंत पांगारकरJune 9, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज | संगमनेर: एकीकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे (FDA) धडक आयुक्त तुकाराम…

यशोधन कार्यालयात ‘एसटी स्मार्ट कार्ड’ सुविधेचा शुभारंभ; ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात मिळणार मोठी सवलत

June 9, 2026

…अन् थेट कोर्टातच झाली घोषणाबाजी!संगमनेरमधील ‘त्या’ प्रकाराने खळबळ, २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

June 9, 2026

उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना मोठा झटका; अनुदानित गॅस सिलिंडरची संख्या ९ वरून थेट ४ वर

June 9, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.