Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

July 19, 2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नान्नज दुमालातील सलून व्यावसायिकाची आत्महत्या; पोलीस उपअधीक्षकांकडे सखोल चौकशीची मागणी
गुन्हेगारी

नान्नज दुमालातील सलून व्यावसायिकाची आत्महत्या; पोलीस उपअधीक्षकांकडे सखोल चौकशीची मागणी

आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरAugust 25, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – तालुक्यातील नान्नज दुमाला येथील जयवंत विलास कडवे (वय २२) या तरुण सलून व्यावसायिकाने शुक्रवारी (ता. १८ ऑगस्ट) आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपविली. मात्र, त्यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्या आईसह नातेवाईकांनी केला असून, या संदर्भात चौकशी व्हावी यासाठी संगमनेरच्या उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांकडे (DYSP) निवेदन देण्यात आले आहे.

काय झाले: नान्नज दुमाला येथे जयवंत विलास कडवे हा तरुण आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होता. शुक्रवारी त्याने राहत्या घरातील अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. याची माहिती संतोष सुखदेव वाघ यांनी कडवे यांच्या मामास रवींद्र भाऊसाहेब वाघ यांना फोनवरुन कळविली. त्यानंतर वाघ तात्काळ संगमनेर बसस्थानकावरुन घरी परतले. त्यानंतर त्यांनी त्याला गळफास घेतलेल्या अवस्थेतून खाली घेऊन खासगी रुग्णवाहिकेतून घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून मृत असल्याचे घोषित केले.

काय आहे आरोप: त्यावरुन संगमनेर तालुका पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. परंतु, मयत जयवंतला गावातीलच त्याच्या एका मित्राने आर्थिक देवाण-घेवाणीतून मारहाण केली. शिवाय तो सतत त्याला त्रास द्यायचा. त्याच्या त्रासाला वैतागून अखेर जयवंतने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आईसह नातेवाईक आणि नाभिक समाज बांधवांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे.

कोणी केली मागणी: सदर निवेदनावर महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब जाधव, कचरु भालेकर, संजय बिडवे, प्रकाश बिडवे, खंडू वाघ, रावसाहेब वाघ, लक्ष्मण वाघ, संतोष बिडवे, वैभव बिडवे, गोरख शिंदे, सतीष वाघ, गोरक्षनाथ मदने, प्रकाश बिडवे, रमेश सस्कर आदिंच्या सह्या आहेत.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 974
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

कोतुळमध्ये ६ लाखांचा गुटखा व कार जप्त; पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची मोठी कारवाई

July 17, 2026

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026

संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

July 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आरोग्य

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

By अनंत पांगारकरJuly 19, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील बेफिकीर आणि ढिसाळ कारभाराचा प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतर…

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026

आज, रविवार १९ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 19, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.