Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मध्यरात्रीच्या कारवाईत नासिक-पुणे मार्गावर संगमनेर पोलिसांनी पकडले अडीच लाखाचे गोमांस; साडेसहा लाखाचा मुद्देमाल हस्तगत
गुन्हेगारी

मध्यरात्रीच्या कारवाईत नासिक-पुणे मार्गावर संगमनेर पोलिसांनी पकडले अडीच लाखाचे गोमांस; साडेसहा लाखाचा मुद्देमाल हस्तगत

हजारो किलो गोमांस दररोज जाते शहराबाहेर
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/08/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – शुक्रवारी मध्यरात्री नासिक-पुणे महामार्गावर संगमनेरनजीक कऱ्हे घाटाजवळ एका संशयास्पद वाहनातून मुंबईच्या दिशेने जाणारे गोमांस पकडण्यात तालुका पोलिसांना यश मिळाले आहे.

साडेसहा लाखाचा मुद्देमाल: या कारवाईत पोलिसांनी एका टाटा कंपनीच्या वाहनासह तब्बल साडेसहा लाख रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. यात अडीच लाख रुपये किमतीच्या एक हजार किलो गोवंश जनावरांची कत्तल केलेल्या गोमांसाचा समावेश असून पोलिसांनी या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांना अटक केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

यांना पकडले: मुज्जफ्फर जाकीर हुसेन कुरेशी (वय २८ वर्ष, रा. दादामिया इस्लामी चाळ, कुरेशीनगर, कुर्ला (पूर्व) मुंबई) आणि असलान अस्लम कुरेशी (वय २२वर्ष, रा. अल्ताफ बिल्डिंग, कब्रस्तान रोड, कुरेशीनगर, कुर्ला (पूर्व) मुंबई) अशी पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.

गुन्हा दाखल: राज्यात गोवंश जनावरांची कत्तल करण्यास बंदी असतानादेखील कत्तल केलेले गोवंश जनावरांचे गोमांस वाहतूक करताना आढळून आल्याने पहाटे तीन वाजता संगमनेर तालुका पोलिसांनी मुज्जफ्फर जाकीर हुसेन कुरेशी आणि असलान अस्लम कुरेशी या दोघा जणांविरोधात पोलीस शिपाई बाबासाहेब केशव शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय दंड विधान कलम २६९, ४२९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ चे कलम ५(अ), ५(क), ९ (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

तपास: दरम्यान संगमनेरातील कत्तलखान्यातून हे गोमांस मुंबईला जात असल्याचा संशय असून पोलीस यासंबंधीची माहिती घेत आहेत. परिविक्षाधिन पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 836
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा…

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.