Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १३ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 13, 2026

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

August 12, 2026

संगमनेरमध्ये ‘बाजारपेठ व्यापारी मित्र मंडळा’चा ऐतिहासिक निर्णय; यंदा गणपती वर्गणीसाठी वापरणार ‘डिजिटल पावती ॲप’

August 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘इलेक्शन बिलेक्शन’
इतिहास

‘इलेक्शन बिलेक्शन’

पुस्तक परीक्षण - महेश भा. भोसले
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरAugust 25, 2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

देशातील व विशेषतः महाराष्ट्रातील सामाजिक चळवळींचा इतिहास उज्वल आहे. सामाजिक सुधारणांचा स्त्रोत जिथे सुरू झाला आणि तिथे महाराष्ट्र शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांनी ज्या गतीने पुढे नेला त्या महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीकडे मोठ्या आशेने पाहिले जाते. अभिमानास्पद उत्तम भविष्यासाठी पोषक आणि चिकित्सक वातावरण महाराष्ट्र भुमीने नेहमी दिले आहे, पण सद्य राजकारणात महाराष्ट्राला नेहमी डावलले जाते आणि अभ्यासू, तत्वज्ञानी उमेदवारांना महाराष्ट्रातील, देशातील खरे शासक संसदेत पोहचू देत नाही. आजही मतदारांना आपल्या देशातील खऱ्या शासकांचा पत्ता देखील लागलेला दिसत नाही. पुर्वी मतपत्रिकेत घोळ होत आता ई.व्हि.एम‌.मध्ये छेडछाड करुन निकालच बदलले जाऊ शकतात.

लोकशाहीची व्याख्या राज्यशास्त्र वेत्ते, लेखक, समाजशास्त्र आणि इतर कित्येक लोकांनी आपापल्यापरीने केलेली आहे वॉल्टर बेगहोट याने इंग्लिश संविधानावर (English Constitution) एक सुप्रसिद्ध ग्रंथ लिहिला. त्यात लोकशाहीचे सुस्पष्ट ‌चित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला. चर्चेवर आधारलेली शासनसंस्था म्हणजे लोकशाही अशी त्यांनी व्याख्या केली. लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात क्रांतिकारक बदल रक्तविरहित मार्गानी घडवून आणणारी शासनपद्धती म्हणजे लोकशाही होय, अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीची व्याख्या केली.

निवडणूका म्हणजे लोकशाहीचा उत्सव असतो आणि हाच १९५२ ते २०१९ चा उत्सव लेखक हिरालाल पगडाल यांनी आपल्या ‘इलेक्शन बिलेक्शन’ ‌ह्या पहिल्या वहिल्या पुस्तकात संक्षिप्त पण ‌माहितीपुर्ण मांडला आहे.

लेखक हिरालाल पगडाल हे शिक्षक नेते आहेत त्यांची भाषा साधी सोपी आणि लालित्यपूर्ण आहे ते बोली भाषेत निवडणूकांचे विश्लेषण ‌करतात कोरोना काळात, लॉकडाऊनमध्ये असतांना त्यांनी सोशल मीडियावर हि लेखमाला लिहिली. लॉकडाऊनच्या काळात घरात सगळेजण अडकून पडले होते अशातच त्यांनी हे लेख लिहून खुप मोलाचे काम केले. इलेक्शन बिलेक्शन असे गंमतीदार शिर्षक असलेल्या या पुस्तकात १९५२ ते २०१९ या सुमारे सत्तर वर्षांचा निवडणूकांचा लेखाजोखा मांडताना लेखक हिरालाल पगडाल यांनी सतरा लोकसभा व पंधरा विधानसभा निवडणूका केंद्रबिंदु मानून हे पुस्तक लिहिले आहे पुस्तकात गल्ली ते दिल्लीपर्यतचे अनेक संदर्भ आहेत.

पुस्तकात एकूण १३ लेख, देश, राज्य आणि जिल्हा पातळीवरील सर्व विजयी आणि पराभुत सदस्याचे नावे, निवडणूक साल योग्य ठिकाणी त्याच काळातील छायाचित्र असल्यामुळे लिखाणात जिवंतपणा वाटतो. केवळ निवडणूकीतील उमेदवारांची नावे, मतदानाची आकडेवारी न देता त्या-त्या निवडणूकीची पार्श्वभूमी विषद करताना लेखकाने जे ऐकले, वाचले आणि बघितले त्या सगळ्याचा सार या पुस्तकात दिसून येतो. निवडणूकीच्या राजकारणात अगदी छोटे-छोटे मुद्दे कसे परिणामकारक ठरतात हे वाचतांना नकळतपणे भारतीय मतदाराचे मानसशास्त्रही उलगडत जाते. महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणूकांची संक्षिप्त माहिती सर्वसामान्य वाचकांना समजेल अशा सरळ साध्या सोप्या भाषेत लेखकाने लिहिले आहे.

तरुण वाचकांना आणीबाणीबद्दल समजेल अशा पद्धतीने लेखकाने पुस्तकात संदर्भ मांडले आहेत. त्यामुळेच हे पुस्तक विद्यार्थी, शिक्षक, राजकीय कार्यकर्ते, पत्रकार, निवडणूक विश्लेषक अभ्यासक या सर्वानाच उपयुक्त ठरेल याबद्दल शंकाच नाही. देशातील पहिल्या सार्वत्रिक निवडणूकांचे आणि महाराष्ट्रातील निवडणूकांचे यथार्थ मांडणी करतांना लेखकाने योग्य तेच मांडले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण हे नात्यागोत्याचे राजकारण आहे. इथल्या साखर सम्राटांनी ‌शोषित वंचित आणि दुर्लक्षित समाजातील नेतृत्व जन्मालाच येऊ दिले नाही.

जयहिंद लोकचळवळतर्फे प्रकाशित हे लेखक हिरालाल पगडाल यांचे पहिलेच पुस्तक आहे. यानिमित्तानेच जयहिंद लोकचळवळीने प्रकाशन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. सुनिल मादास यांनी अगदी दर्जेदार मुखपृष्ठ केले आहे. तर पृष्ठाची संख्या १८४ आहे. प्रत्येकाने आपल्या ग्रंथालयात संग्रहही ठेवावे असे हे इलेक्शन बिलेक्शन पुस्तक मला वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर मिळाले‌. काल परवा ते प्राप्त होताच वाचून काढले. हे पुस्तक खुपच अप्रतिम असुन वाचकांनी हे वाचलेच पाहिजे असे माझे मत निर्माण झाले.

भारतीय लोकशाही जिवंत ठेवणाऱ्या सुज्ञ मतदारांना लेखकाने हे पुस्तक अर्पण केले आहे तर पद्मश्री सन्मानप्राप्त बिहार व त्रिपुराचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे. प्रकाशक माजी आमदार डॉ.सुधीर तांबे या पुस्तकाबद्दल आपले मनोगत व्यक्त करत लेखकाचा व्यक्ती परिचय करून दिला.

इलेक्शन बिलेक्शन

लेखक-हिरालाल पगडाल

प्रकाशक-जयहिंद लोकचळवळ

किंमत-२३०/-

पृष्ठ-१८४

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 846
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांच्या उभारणीला गती

July 1, 2026

संगमनेरमध्ये शिवरायांचे भव्य अश्वारूढ स्मारक साकारणार; संगमनेरकरांची अश्वारूढ स्मारकाला पसंती, जनमताचा आदर करत पालिकेच्या सभेत ठरावावर शिक्कामोर्तब

April 14, 2026

गुरुवारी संगमनेरात शिवजयंतीनिमित्त ‘रायबा हेच का आपले स्वराज्य’ महानाट्याचे जयहिंद लोकचळवळीकडून आयोजन

February 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १३ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By अनंत पांगारकरAugust 13, 20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन…

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

August 12, 2026

संगमनेरमध्ये ‘बाजारपेठ व्यापारी मित्र मंडळा’चा ऐतिहासिक निर्णय; यंदा गणपती वर्गणीसाठी वापरणार ‘डिजिटल पावती ॲप’

August 12, 2026

हॉटेल सुरभीपर्यंत पोहोचले बनावट दारूचे धागेदोरे; आस्थापना कायमस्वरूपी सील करा, शिवसेनेच्या (ठाकरे गट) अमर कतारी यांची मागणी

August 12, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.