Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेत ‘एक विद्यार्थी, एक बेंच’ उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद; आठवडाभरात ६८ हजारांच्या लोकसहभागातून ४० बेंचचे लोकार्पण

08/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » तुमचा भोंगा हा कायम शिव्या शाप देण्यासाठी वाजतो पण आमचा भोंगा… मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर निशाणा
राजकारण

तुमचा भोंगा हा कायम शिव्या शाप देण्यासाठी वाजतो पण आमचा भोंगा… मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर निशाणा

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत परभणीत 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/08/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

आम्ही एक झटका दिला आणि त्यांना ऑनलाईनवरुन थेट लाईनवर आणलं…

काही लोक पाटण्यात जमले आणि द्वेषाची खिचडी शिजवू लागले

अजित पवारच सरकारमध्ये आले आणि सरकार आणखी मजबूत झाले

महाराष्ट्र संवाद न्यूज

परभणी – “तुमचा भोंगा हा कायम शिव्या शाप देण्यासाठी वाजतो पण आमचा भोंगा हा शासन आपल्या दारीच्या माध्यमातून लोकांसाठी वाजतो.” ‘काही लोक पाटण्यात जमले आणि द्वेषाची खिचडी शिजवू लागले’, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी सांगत रविवारी विरोधकांवर निशाणा साधला.

शासन आपल्या दारी: रविवारी परभणीमध्ये ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर विशेषतः उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शासन आपल्या दारी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आत्तापर्यंत दीड कोटी लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हे काम सुरू असून यात प्रत्येक लाभार्थ्याला लाभ मिळतोय. या माध्यमातून आत्तापर्यंत बावीस हजार ट्रॅक्टर, साडेबावीस हजार रोटरव्हेटर वाटले आहे. चार लाख विद्यार्थ्यांना 1351 कोटी रुपयांचं वाटप आतापर्यंत केले. महिलांना त्यांचं कुटुंब सांभाळताना स्वतःच्या पायावर उभा करण्याची जबाबदारी शासनाने घेतली असून महिला बचत गटाची योजना देखील अधिक मजबूत करण्याचे काम शासन आता करत आहे. महिलांसाठी केवळ बचत गटच नाही तर शक्तीगट तयार करण्यात आले असल्याचे ते म्हणाले.

आम्ही एक झटका दिला आणि… “यापूर्वी काही लोक घरात बसून राज्याचा कारभार ऑनलाईन करत होते, परंतु आम्ही त्यांना एक झटका दिला आणि ऑनलाईनवरून त्यांना थेट लाईनवर आणलं आहे.”तुमचा भोंगा हा कायम शिव्या साफ देण्यासाठी वाचतो पण आमचा भोंगा हा शासन आपल्या दारीच्या माध्यमातून लोकांसाठी वाजतो, असे ते म्हणाले.

विरोधक द्वेष स्वार्थाची खिचडी शिजवताहेत: लोकसभा निवडणुकीत एनडीएला रोखण्यासाठी बिहारची राजधानी पाटणामध्ये विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक झाली होती. यावर देखील मुख्यमंत्र्यांनी हल्ला चढविला. ते म्हणाले, आपण पाटणापासून (शासन आपल्या दारी) सुरुवात केली. त्यानंतर काही लोक पाटणांमध्ये जमा झाले आणि तेथे द्वेषाची, स्वार्थाची खिचडी शिजवू लागले आहेत.

सरकार आणखी मजबूत झाले: सरकार पडणार, मुख्यमंत्री बदलणार अशा खोट्या बातम्या सतत पसरविल्या जात आहे. पण या बातम्या पसरवता-पसरवता आता अजित पवारच सरकारमध्ये आले आणि सरकार आणखी मजबूत झाले. सध्या या लोकांकडून राजकारणात गोंधळ निर्माण करण्याचं काम केलं जात असून आमचं सरकार ‘सर्वसामान्यांचे सरकार’ असल्याचं ते म्हणाले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 398
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

By Annant Ppangarkar08/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शहरातील महिलांची सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने संगमनेर नगर…

शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेत ‘एक विद्यार्थी, एक बेंच’ उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद; आठवडाभरात ६८ हजारांच्या लोकसहभागातून ४० बेंचचे लोकार्पण

08/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026

कोपरगाव आणि संगमनेरमधील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस; दोन सराईत चोरट्यांकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, अहिल्यानगर एलसीबीची कामगिरी

08/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.