Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

28/09/2026

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » साखर कारखानदारी अडचणीतून जात असतानाही सहकारासाठी मापदंड ठरलेल्या थोरात कारखान्याने सुरू केला सीएनजी पंप
शेती व सहकार

साखर कारखानदारी अडचणीतून जात असतानाही सहकारासाठी मापदंड ठरलेल्या थोरात कारखान्याने सुरू केला सीएनजी पंप

थोरात कारखान्याचे पुढचे पाऊल
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/08/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – साखर कारखानदारीत सहकारासाठी मापदंड ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने स्वच्छ व गुणवत्तेच्या पेट्रोलबरोबर आता नव्याने गरजेचा असलेल्या पर्यावरण पूरक सीएनजी पंप कार्यान्वित केला आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते या सीएनजी पंपाचा शुभारंभ करण्यात आला.

यांची होती उपस्थिती: सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळ येथे हा सीएनजी पंप सुरू करण्यात आला असून यावेळी कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, रामहरी कातोरे, बीपीसीचे गोविंद जागीर, संचालक गणपतराव सांगळे, संपतराव गोडगे, मीनानाथ वर्पे, विनोद हासे, माणिकराव यादव, ॲड. दादासाहेब हजारे, तानाजी आहेर, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सेक्रेटरी किरण कानवडे, सरपंच निर्मला राऊत, पेट्रोल पंप विभागाचे एकनाथ काळे आदींसह विविध मान्यवर विभाग प्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.

थोरात म्हणाले, थोरात कारखान्याने कायम काळानुरूप बदल केले आहे. पेट्रोल व डिझेलसाठी सीएनजी हा मोठा पर्याय आहे. इथेनॉल निर्मितीतून पेट्रोलला सक्षम पर्याय तयार होत आहे. वाढलेली वाहने आणि त्यामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान याकरता सीएनजीचा वापर गरजेचा ठरणार आहे. थोरात सहकारी साखर कारखान्याने कायम आदर्शवत काम केले असून अत्याधुनिक प्रणालींचा वापर केला आहे. ऊस उत्पादक, सभासद, शेतकरी, कामगार या सर्वांचा या कारखान्यावर मोठा विश्वास असून उपपदार्थ निर्मितीवरही कारखान्याने भर दिला असल्याचेही ते म्हणाले.

बाबा ओहोळ म्हणाले, काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात कारखान्याने आपली गुणवत्तेची परंपरा राखताना कायम उच्चांकी भाव दिला आहे. वाहनांना पेट्रोल मोठ्या प्रमाणात लागत असून पर्यावरण पूरक सीएनजी पंप कारखान्याने सुरू करून एक चांगली सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

थोरातानी पहिल्या वाहनात भरला सीएनजी: कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. सेक्रेटरी किरण कानवडे यांनी सूत्रसंचालन केले. एकनाथ काळे यांनी आभार मानले. याप्रसंगी आमदार थोरात यांच्या हस्ते पहिल्या गाडीला सीएनजी भरून देऊन हा पेट्रोल पंप कार्यान्वित करण्यात आला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,043
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

By Annant Ppangarkar28/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरातील बहुचर्चित एम.डी. (M.D.) ड्रग्ज तस्करीत दररोज नवनवीन आणि धक्कादायक…

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.