Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » 3 सप्टेंबरपासून संगमनेर तालुक्यातील गावागावात काँग्रेसची जनसंवाद यात्रा… या मान्यवरांचा असेल सहभाग
राजकारण

3 सप्टेंबरपासून संगमनेर तालुक्यातील गावागावात काँग्रेसची जनसंवाद यात्रा… या मान्यवरांचा असेल सहभाग

नियोजनासंदर्भात झाली बैठक
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/08/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – काँग्रेसचे नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली 3 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर या कालावधीमध्ये संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात व वाडी वस्तीवर व संगमनेर शहरातील प्रत्येक वार्डात काँग्रेसची जनसंवाद यात्रा होणार असून या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या अपयशाचा उलगडा केला जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे व शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी दिली आहे.

येथे झाली बैठक: यशोधन कार्यालय येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने आयोजित जनसंवाद यात्रेच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या अपयशाचा पाढा वाचणार: केंद्र सरकार हे संपूर्ण आघाड्यावर अपयशी ठरले असून देशांमध्ये बेरोजगारी व महागाई वाढली आहे. मणिपूर अशांत असताना सरकार मात्र शांत आहे. फक्त फसव्या घोषणा दिलेल्या या सरकारने जनमत गमावले असून या सरकारचा अपयशाचा पाढा वाचला जाणार आहे. याचबरोबर महाराष्ट्रात अत्यंत दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून विद्यमान सरकार मात्र आरोप प्रत्यारोप करत आहेत.

आढावा घेणार: मागील वर्षीचे नुकसानीचे कोणतेही भरपाई शेतकऱ्याला मिळाली नाही. कांद्याचे अनुदान मिळाले नाही. उलट यावर्षी सर्वत्र दुष्काळामुळे टंचाई निर्माण झाली. याबाबत सरकारकडून कोणत्याही ठोस उपाययोजना होत नाही. यामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना अनुदान मिळावे. सर्वसामान्य दिलासा मिळावा यासाठी महागाई कमी व्हावी. युवकांना रोजगार मिळावा या विविध मागण्यांसह काँग्रेसने 75 वर्षात केलेल्या दैदिप्यमान कारकिर्दीचा आढावा घेतला जाणार आहे.

हे मान्यवर असतील उपस्थित: या जनसंवाद पदयात्रेत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, इंद्रजीत थोरात, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्यासह संगमनेर तालुक्यातील सर्व संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर गावांमधील व शहरांमधील प्रत्येक वार्डात होणाऱ्या पदयात्रेत सहभागी होणार आहे.

अभियानाची ही असेल वेळ: प्रत्येक गावात सकाळी 9 ते 11 या वेळेत जनसंवाद यात्रेअंतर्गत पदयात्रा व घरोघरी भेटी अभियान होणार आहे. याचबरोबर प्रत्येक गावात कॉर्नर सभा होणार आहे. तर शहरामध्ये सायंकाळी 6 ते 8 या वेळेत पदयात्रा होणार आहे. या जनसंवाद यात्रेत तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गावातील पदाधिकारी, नगरसेवक, युवक नागरिक व महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संगमनेर तालुका काँग्रेस व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 947
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar मुंबई: माहिती अधिकाराचे प्रणेते आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे…

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.