Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

28/09/2026

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर मर्चन्ट्स बँकेकडून ‘इस्त्रो’च्या अभिनंदनाचा ठराव! 58 वी वार्षिक सर्वसाधारण सभा; संस्थेला 8 कोटी 31 लाखांचा निव्वळ नफा
शेती व सहकार

संगमनेर मर्चन्ट्स बँकेकडून ‘इस्त्रो’च्या अभिनंदनाचा ठराव! 58 वी वार्षिक सर्वसाधारण सभा; संस्थेला 8 कोटी 31 लाखांचा निव्वळ नफा

व्यापाऱ्यांची आर्थिक कामधेनु
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/08/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – केवळ संगमनेरच नव्हेतर आसपासच्या चार जिल्ह्यांमधील उद्योग, व्यवसाय आणि व्यापार क्षेत्राला नवसंजीवनी देवून देशाच्या अर्थकारणात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या संगमनेर मर्चन्ट्स सहकारी बँकेची 58 वी सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. गतआर्थिक वर्षाचे चेअरमन ओंकार सोमाणी व विद्यमान चेअरमन संतोष करवा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) चांद्रयान 3 मोहीमेत मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदनाचा ठरावही करण्यात आला. मावळलेल्या आर्थिक वर्षात संस्थेला 8 कोटी 31 लाखांचा विक्रमी नफा झाल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. यावर्षी संस्थेच्या सभासदांना 12 टक्के लाभांश वाटप केले जाणार आहे.

प्रतिमा पूजन: प्रारंभी संस्थेचे ज्येष्ठ सभासद डॉ.अशोक पोफळे, नीलेश जाजू, नंदकुमार भडांगे, ललित देसाई यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन व संस्थेचे संस्थापक (स्व.) ओंकारनाथ मालपाणी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला. यावेळी अहवाल कालावधीत निधन झालेल्या सभासद व देशातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना आदरांजली वाहण्यात आली. सर्वसाधारण बैठकीच्या सुरुवातीलाच ज्येष्ठ संचालक राजेश मालपाणी यांनी भारताची चांद्रयान 3 मोहीम यशस्वी करणार्‍या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) शास्त्रज्ञांचे अथीनंदन करणारा ठराव मांडला, त्याला उपस्थित सभासदांनी उभे राहुन टाळ्यांच्या गजरात जोरदार प्रतिसाद देत बहुमताने तो मंजुर केला. 

ओंकार सोमाणी यांनी दिली माहिती: यावेळी चलचित्र व आकडेमोडीतून संस्थेची आर्थिक घोडदौड, सभासदांना करण्यात आलेली आर्थिक मदत, विमा सुरक्षा, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सेवा, रोकड भार, ठेवीवरील व्याजदर, बसस्थानक सीसीटीव्ही, डिजीटल बँकींग अशा वेगवेगळ्या सेवा-सुविधांवर प्रकाश टाकण्यात आला. यावेळी 31 मार्च अखेर मर्चन्ट्स बँकेत 396 कोटींच्या ठेवी आणि 262 कोटींचे कर्ज वितरण झाल्याची आणि सरलेल्या आर्थिक वर्षात संस्थेला 8 कोटी 31 लाखांचा नफा झाल्याचे माहिती ओंकार सोमाणी यांनी दिली. संस्थेचा एनपीए शून्य असल्याचे व ऑडिट वर्ग ‘अ’ असल्याचेही त्यांनी सांगितले.

बारा टक्के लाभांश देणार: यावेळी संचालक मंडळाने 12 टक्के लाभांश वाटपाचा प्रस्ताव मांडताच सभासदांनी त्याला टाळ्यांच्या गजरात मंजुरी दिली, त्यानंतर काही मिनिटांतच सभासदांच्या खात्यात लाभांश रक्कम जमा करण्यात आली. या दरम्यान अनेक सभासदांनी मौलीक व उपयुक्त सूचना केल्या. बँकेचे पारदर्शी काम आणि त्यातून संस्थेने केलेल्या प्रगतीबद्दल सभासदांकडून संचालक मंडळाचे कौतुकही करण्यात आले. यावेळी सभासदांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्‍नांना ज्येश्ठ संचालक राजेश मालपाणी व तज्ज्ञ संचालक सीए संजय राठी यांनी समर्पक उत्तरे दिली.

यांनी केल्या महत्त्वपूर्ण सूचना: दिनेश सोमाणी, गणेश बाहेती, ओमप्रकाश आसावा, मदनलाल गांधी, संजय क्षत्रिय, श्रीकांत मणियार, रामनाथ भंडारी, मनोज पोफळे, डॉ. जी. पी. शेख, धिरज आसावा, बद्रीनारायण इंदाणी, अनिष मणियार, कैलास कलंत्री, डॉ. अनिल राठी, ओंकारनाथ भंडारी यांनी अभ्यासपूर्ण मुद्दे व प्रश्‍नांवर चर्चा केली. माजी चेअरमन ओंकार सोमाणी, विद्यमान चेअरमन संतोष करवा, ज्येष्ठ संचालक राजेश मालपाणी, सीए संजय राठी, बँकेचे कार्यकारी अधिकारी विनय दुनाखे, सहाय्यक मुख्य व्यवस्थापक विजय बजाज यांनी त्याला समाधानकारक उत्तरे दिल्याने सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

सभा यशस्वी होण्यासाठी माजी-आजी चेअरमनसह मावळत्या व्हा. चेअरमन ज्योती पलोड, विद्यमान व्हा. चेअरमन प्रकाश कलंत्री, संचालक मंडळाचे सर्व सदस्य, बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. ज्योती पलोड यांनी आभार मानले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 700
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

By Annant Ppangarkar28/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरातील बहुचर्चित एम.डी. (M.D.) ड्रग्ज तस्करीत दररोज नवनवीन आणि धक्कादायक…

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.