Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १३ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 13, 2026

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

August 12, 2026

संगमनेरमध्ये ‘बाजारपेठ व्यापारी मित्र मंडळा’चा ऐतिहासिक निर्णय; यंदा गणपती वर्गणीसाठी वापरणार ‘डिजिटल पावती ॲप’

August 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दूधगंगा पतसंस्था 81 कोटीचा अपहार; वृत्तपत्रातील व्यक्तिगत शुभेच्छा जाहिरातींसाठी भाऊसाहेब कुटेने केली ठेवीदारांच्या पैशाची उधळपट्टी…
पत्रकारिता

दूधगंगा पतसंस्था 81 कोटीचा अपहार; वृत्तपत्रातील व्यक्तिगत शुभेच्छा जाहिरातींसाठी भाऊसाहेब कुटेने केली ठेवीदारांच्या पैशाची उधळपट्टी…

ठेवीदार न्यायाच्या प्रतीक्षेत...
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरAugust 31, 2023Updated:August 31, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – स्वतःसह कुटुंबातील सदस्य व अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने तब्बल 81 कोटी रुपयांच्या अपहारात सहभागी असलेल्या मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे याने स्वतःच्या व्यक्तिगत शुभेच्छांच्या लाखो रुपयांच्या जाहिराती ठेवीदारांच्या पैशातून वृत्तपत्रांना दिल्याचे समोर आले आहे.

कारनामे: दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेचा तब्बल 81 कोटी रुपयांचा घोटाळा समोर आल्यानंतर या घोटाळ्यामागील मुख्य आरोपी असलेल्या भाऊसाहेब कुटे याचे एक-एक कारनामे समोर येत आहे. यातील बहुतेक कारनामे पोलिसांकडे दाखल असलेल्या फिर्यादीत (FIR मध्ये) नोंदविण्यात आले आहे.

कुटुंबातील सात जणांचा समावेश: संगमनेरच्या सहकारी पतसंस्था विश्वातील सर्वात मोठा आर्थिक अपहार म्हणून दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या 81 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराकडे बघितले जाते. विशेष म्हणजे या अपहारामध्ये जिल्हा परिषदेचा माजी सदस्य असलेल्या व संस्थेचा अध्यक्ष असलेल्या भाऊसाहेब कुटे याच्यासह त्याच्या कुटुंबातील सात जणांचा समावेश असून यात पत्नी, मुले, सून यांच्याशिवाय राहुरीतील कदम कुटुंबीय, व्यवस्थापक भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ, चीफ अकाउंटंट भाऊसाहेब संतू गायकवाड, चेतन नागराज बाबा कपाटे उर्फ सुदर्शन महाराज, संदीप दगडू जरे अशा सतरा जणांचा मुख्य आरोपीमध्ये समावेश आहे.

लेखापरीक्षकांचे घोटाळ्यास सहाय्य: याशिवाय 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2021 या कालावधीत बँकेत रोखपाल म्हणून काम बघणाऱ्या चौघांसह दोन वैधानिक लेखापरीक्षकांनी या आर्थिक घोटाळ्यास सहाय्य केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दोन्ही लेखापरीक्षक हे नाशिकस्थित आहेत.

व्यक्तिगत शुभेच्छा जाहिरातीची उधळपट्टी: दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेचा चेअरमन असलेल्या भाऊसाहेब कुटे याने संस्थेच्या पैशातून स्वतःच्या व्यक्तिगत शुभेच्छा जाहिरातीची उधळपट्टी केली असून या जाहिरातींवरील खर्च संस्थेच्या महसुली खर्चात दाखविण्यात आल्या आहे. जाहिरातींची ही रक्कम 6,90,719/- रुपये एवढी असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. प्रत्यक्षात ही रक्कम फिर्यादीत नोंदविलेल्या रकमेपेक्षाही अधिक असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,870
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

जिल्हाधिकारी साहेब एकदा रस्त्यावर पायी फिराच! संगमनेरातील अतिक्रमण हटाव मोहीम दिखावा की केवळ समाधान?

August 5, 2026

संगमनेरमध्ये रेशनच्या धान्याचा काळा बाजार? पोलीस अन् पुरवठा विभागाच्या संशयास्पद भूमिकेने संभ्रम!

August 5, 2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १३ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By अनंत पांगारकरAugust 13, 20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन…

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

August 12, 2026

संगमनेरमध्ये ‘बाजारपेठ व्यापारी मित्र मंडळा’चा ऐतिहासिक निर्णय; यंदा गणपती वर्गणीसाठी वापरणार ‘डिजिटल पावती ॲप’

August 12, 2026

हॉटेल सुरभीपर्यंत पोहोचले बनावट दारूचे धागेदोरे; आस्थापना कायमस्वरूपी सील करा, शिवसेनेच्या (ठाकरे गट) अमर कतारी यांची मागणी

August 12, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.