Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

28/09/2026

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » चिंचवडमध्ये जिव्हेश्वर जन्मोत्सव विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा
सामाजिक

चिंचवडमध्ये जिव्हेश्वर जन्मोत्सव विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/09/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

पिंपरी चिंचवड – दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साळी समाजाच्यावतीने भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव चिंचवडगाव येथे मंचर येथील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. मोहन साळी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

विविध उपक्रम: यावेळी आरोग्य शिबिर, तज्ञ डॉक्टरांचा सन्मान, विविध क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या समाजातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच समाजातील तरुण तरुणींच्या युवा मंचची स्थापना करण्यात आली.

या मान्यवरांची होती उपस्थिती: रविवारी 3 सप्टेंबरला चिंचवडगाव येथील प्रभू रामचंद्र सभागृहात झालेल्या या कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड परिसरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश माथेसुळ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते. याशिवाय लोणावळा नगर परिषदेचे कर अधिकारी राजेंद्र पांढरपट्टे, पुण्याच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग एमआयटी कॉलेजचे हेड ऑफ डिपार्टमेंट शिवप्रकाश बर्वे, पिंपरी चिंचवडच्या अभिषेक विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष गुरुराज चरंतीमठ यावेळी उपस्थित होते.

आरोग्य शिबिर: डॉ. मनस्वी धंदल आणि डॉ. भक्ती भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली फूल बॉडी चेक-अप, ब्लड शुगर, हिमोग्लोबीन इत्यादी सर्व समावेशक असलेल्या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित समाजबांधवांनी त्याचा लाभ घेतला. मुख्य कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन तसेच भगवान श्री जिव्हेश्वर प्रतिमा पुजनाने करण्यात आली.

यांचा केला सन्मान: पिंपरी-चिंचवड परिसरातील जवळ-जवळ ३६ विविध क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांचा प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. विविध क्षेत्रात अतुलनीय कार्य करणारे समाजबांधव गिरीष सांगळे, प्रदीप तुंगारे, सचिन वाशिमकर, पद्माकर जांभळे, अजित महादार, मुकेश उपरे, हरिश्चंद्र टपळे, मयुरेश भागवत, कियांश झडप, विनिता हाडके, सोनाली कोदे, हेमांगी टपळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मान्यवरांचा शुभहस्ते समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

युवा मंचची स्थापना: यावेळी युवक व युवतींची युवा मंच साळी समाज या नविन संघटनेची ओंकार महेश भागवत यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना करण्यात आली. सर्वच मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात कार्यक्रमाचे कौतुक करुन समाज एकसंध रहावा म्हणून आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते याचा समाज बांधवांनी लाभ घेतला.

यांनी घेतले परिश्रम: कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन बिचकर, धनंजय भागवत, रामदास एखे, कैलास एखे, अंकुर निळे, शरद जाळिंद्रे, अविनाश खोपे, किशोर दिवाणे, सचिन बिचकर, रुपेश साळी इत्यादींनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन हेमांगी टपळे यांनी केले, समाजाचे अध्यक्ष विष्णू निचळ यांनी आभार मानले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 438
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026

‘संगमनेर फेस्टिव्हल’ हा संगमनेरकरांचा सांस्कृतिक मानबिंदू : मनीष मालपाणी १८ व्या संगमनेर फेस्टिव्हलचा सांगता सोहळा उत्साहात; विनोदी नाटकाने प्रेक्षकांना हसवले मनमुराद

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

By Annant Ppangarkar28/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरातील बहुचर्चित एम.डी. (M.D.) ड्रग्ज तस्करीत दररोज नवनवीन आणि धक्कादायक…

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.