Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘पुणे–नाशिक रेल्वे संगमनेरमार्गेच व्हावी’; पुण्यात लवकरच विशेष रेल्वे परिषदेचे आयोजन

August 14, 2026

बिरेवाडीत पोल्ट्री शेडवर कारवाईसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरु; मांडवे-बिरेवाडी हद्दीतील तीन पोल्ट्रीचा वाद पेटला

August 14, 2026

लावणीचा युवक महोत्सवात लोकनृत्य म्हणून समावेश करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार : पद्मश्री रघुवीर खेडकर

August 14, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » तिकिटाच्या दोन रुपयांसाठी कंडक्टर सोबत हुज्जत घालणे तिघा तरुणांना पडले महागात… न्यायालयाने ठोठावली कारावासाची शिक्षा!
न्यायालय

तिकिटाच्या दोन रुपयांसाठी कंडक्टर सोबत हुज्जत घालणे तिघा तरुणांना पडले महागात… न्यायालयाने ठोठावली कारावासाची शिक्षा!

संगमनेर तालुक्यातील साकुर फाट्यावर घडली होती घटना
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरSeptember 6, 2023Updated:September 6, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज 

संगमनेर – दोन रुपयासाठी एसटी कंडक्टर सोबत हूज्जत घालने तिघा तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने या तिघा तरुणांना तीन महिने कारावास आणि 21 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

यांना झाली शिक्षा: सोमेश उर्फ सोमनाथ सुखदेव बोंबले, शुभम सुखदेव बोंबले व शुभम पांडुरंग गुंजाळ अशी न्यायालयात गुन्हा सिद्ध झालेल्या तिघा आरोपींची नावे आहेत. या तिघांविरोधात संगमनेरच्या जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात न्यायाधीश योगेश मनाठकर यांच्यासमोर खटला सुरू होता. सरकार पक्षाच्यावतीने ॲड. बी. जी. कोल्हे यांनी काम बघितले.

अशी होती घटना: 11 जून 2016 रोजी संगमनेर-साकुर या बसमधून प्रवास करणाऱ्या एका तरुणाने साकुर फाट्यापर्यंतची दोन तिकिटे कंडक्टरकडून घेतली. या बदल्यात त्याने कंडक्टरला 44 रुपये दिले होते. सदर तिकिटाची रक्कम 46 रुपये होत असल्याने कंडक्टरने अतिरिक्त दोन रुपयांची मागणी या तरुणाकडे केली असता त्याने पैसे खाली उतरताना देतो असे सांगत कंडक्टर किसन श्रीहरी घुमरे यांच्याशी वाद घातला. बस मधून प्रवास करणाऱ्या या दोघा तरुणांनी आणखी एका तरुणाला साकुर फाट्यावर बोलावून घेतले होते.

कंडक्टरला केली लाथा बुक्क्याने मारहाण: साकुर फाट्यावर उतरताना दोन रुपयावरून या तरुणांनी कंडक्टर सोबत हूज्जत घातली. तिघा तरुणांनी कंडक्टर घुमरे यांना बस बाहेर काढत लाथाबुक्याने बेदम मारहाण केली. तसेच त्यांच्या हातातील तिकिटाचे मशीन सोडले खिशातील पैसे उधळून लावले यात घुमरे यांच्याकडे 893 रुपये का झाले होते तसेच युनिफॉर्मचे नुकसान झाले होते. घटनास्थळावरून तिघेही करून शिवीगाळ करत निघून गेले.

घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा: या संदर्भात किसन घुमरे यांनी घारगाव पोलीस ठाण्यात सोमेश उर्फ सोमनाथ बोंबले याच्यासह आणखी दोघा तरुणांविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून भारतीय दंड विधानसहिता कलम 353, 323, 504, 506, 427 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

न्यायालयात काय घडले: न्यायालयात सरकार पक्षातर्फे ॲड. बी. जी. कोल्हे यांनी पाच साक्षीदारांच्या साक्षी न्यायालयासमोर नोंदविल्या. फिर्यादी व तपास अधिकाऱ्यासह चौघांच्या साक्षी या खटल्यात महत्त्वपूर्ण ठरल्या. सरकार पक्ष आणि आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश मनाठकर यांनी तिन्ही आरोपींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली.

यांचीही झाली मदत : आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी साक्षीदारांना योग्य साक्ष देण्यासाठी सरकारी वकील कोल्हे यांना पैरवी अधिकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण डावरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल रामभाऊ भुतांबरे, महिला पोलीस कॉन्स्टेबल दिपाली दवंगे, प्रतिभा थोरात, स्वाती नायकवाडी, नयना पंडित यांची मदत झाली.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 729
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; आमदारकी टांगणीला

July 30, 2026

‘दत्तधाम’च्या गडगे महाराजाच्या पत्नी अन् मुलाला दिलासा; सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

July 22, 2026

संगमनेर पोलिसांचा धक्कादायक कारनामा; १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलाला २० वर्षांचा दाखवून तब्बल पाच महिने डांबले जेलमध्ये; न्यायालयानं बजावली नोटीस, तपासी अधिकारी अडचणीत!

July 1, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

‘पुणे–नाशिक रेल्वे संगमनेरमार्गेच व्हावी’; पुण्यात लवकरच विशेष रेल्वे परिषदेचे आयोजन

By अनंत पांगारकरAugust 14, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  पुणे: पुण्यात वास्तव्यास असणाऱ्या संगमनेरच्या भूमिपुत्रांनी संगमनेरमार्गे पुणे–नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे…

बिरेवाडीत पोल्ट्री शेडवर कारवाईसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरु; मांडवे-बिरेवाडी हद्दीतील तीन पोल्ट्रीचा वाद पेटला

August 14, 2026

लावणीचा युवक महोत्सवात लोकनृत्य म्हणून समावेश करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार : पद्मश्री रघुवीर खेडकर

August 14, 2026

शुक्रवार, १४ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 14, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.